1
देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा प्रषित होण्याकरिता निवडलेला, मी पौल आणि बंधु सोस्थनेस यांजकडून
देवाच्या सेवेला समर्पित केलल्या करिंथ येथील मंडळीस तसेच देवाने पवित्र होण्यास बोलाविलेल्या (पाचारलेल्या) व येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणऱ्या सर्व बंधूजनांस:
देव पिता आणि त्यांचा व आपला प्रभु (येशू ख्रिस्त) यांजपासून कृपा व शांति असो.
मी नेहमीच माझ्या देवाचे तुमच्यासाठी उपकार मानतो. कारण ख्रिस्त येशूमध्ये देवाची कृपा तुम्हांला मिळाली आहे,
तुम्ही कोणत्याही दानात कमी पडत नाही, कारण तुम्ही ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहता.
तो सुद्धा आपल्या प्रभु येशूच्या दिवशी शेवटपर्यंत तुम्हांस निर्दोष असे प्रस्थापित करील.
ज्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त, आपला प्रभु याच्या सहभागीपणात तुम्हांला बोलावले होते तो देव विश्वासनीय आहे.
परंतु बंधूनो, प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावांमध्ये मी तुम्हांस विनंति करतो की, तुम्ही सर्वांनी सारखेच बोलावे आणि तुमच्यात मतभेद असू नयेत, तर तुम्ही एकाच विचाराने व एकाच हेतूने परिपूणे व्हावे.
कारण क्लोअच्या घरातील माणसांकडून मला असे कळविण्यात आले की, तुमच्यात भांडणे आहेत,
माझे म्हणणे असे आहे की तुमच्यातील प्रत्येक जण म्हणतो, “मी पौलाचा आहे.” “मी अपुल्लोचा आहे,” “मी पेत्राचा आहे,” “मी ख्रिस्ताचा आहे.”
ख्रिस्त विभागला गेला आहे का? पौल वधस्तंभावर तुमच्यासाठी खिळला गेला होता का? पौलाच्या नावाने तुमचा बाप्तिस्मा, झालाय का?
मी देवाचे आभार मानतो की, क्रिस्प व गायस यांच्याशिवाय मी कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही.
यासाठी की कोणीही म्हणू नये की, माझ्या नावात तुमचा बाप्तिस्मा करण्यात आला.
स्तेफनाच्या घरच्यांचासुद्धा मी बाप्तिस्मा केला, पण उरलेल्यांविषयी म्हणाल, तर इतर कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही.
कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यासाठी नाही तर सुवार्ता सांगण्यासाठी पाठविले, ती भाषणाच्या ज्ञानाने नव्हे, तर अशासाठी की, ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे सामर्थ्य निरर्थक होऊ नये.
कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे, अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे.
कारण पवित्र शास्त्रांत असे लिहिले आहे, “शहाण्यांचे शहाणपण मी नष्ट करीन, आणि बुद्धिवंतांची बुध्दि मी बाजूला करीन.” यशया 29:14
ज्ञानी मनुष्य कोठे आहे? विद्वान कोठे आहे? या जगातील वाद घालणारा कोठे आहे? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले नाही का?
म्हणून, देवाच्या ज्ञानात असतानाही, जगाला स्वत:च्या ज्ञानाने देवाला ओळखता आले नाही, आम्ही जो “मूर्खपणाचा” संदेश गाजवितो त्यामुळे जे विश्वासणारे आहेत त्यांचे तारण करण्याचे देवाने निवडले.
कारण अनेक यहूदी लोक चमत्काराची चिन्हे विचारतात आणि ग्रीक लोक ज्ञानाचा शोध घेतात,
परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण, आणि यहूदीतरांसाठी मूर्खपणा असा आहे.
परंतु ज्यांना बोलावलेले आहे, अशा यहूदी व ग्रीक दोघांसही ख्रिस्त हा संदेश आहे तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असाही आहे.
तथापि ज्यांस तुम्ही देवाचा ‘मूर्खपणा’ म्हणता ते मानवप्राण्याच्या शहाणपणापेक्षा अधिक शहाणपणाचे आहे. आणि ज्यांस तुम्ही देवाचा ‘दुर्बळपणा’ समजता ते मानवप्राण्याच्या सशक्तपणाहून अधिक शक्तितशाली आहे.
तर आता बंधुभागिनींनो, देवाने तुम्हांला केलेल्या पाचारणाबद्दल विचार करा. मानवी दृष्टिकोनातून तुमच्यातील पुष्कळसे शहाणे नव्हते. तुमच्यापैकी पुष्कळसे सामर्थ्यशाली नव्हते. तुमच्यापैकी पुष्कळसे उच्च कुळातले नव्हते,
त्याऐवजी जगातले जे मूर्ख पण त्यांना त्याने निवडले, यासाठी की, शहाण्या माणसास फजित करावे.
आणि देवाने दीन, तुच्छ मानलेले, जे “नगण्य” त्यांना निवडले. यासाठी की जे “काहीतरी” आहेत त्यांना नगण्य करावे.
यासाठी की कोणीही देवासमोर बढाई मारु नये.
कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे. व तो देवाची देणगी म्हणून आपले. ज्ञान, आपले नीतिमत्व, आपले पवित्रीकरण आणि आपली खंडणी असा झाला.
यासाठी की शास्त्रात असे लिहिले आहे, “जो बढाई मारतो त्याने देवाविषयी बढाई मारावी.”
2
म्हणून बंधूनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो, तेव्हा मी देवाचे रहस्यमय सत्य मानवी ज्ञानाने किंवा वक्तृत्वकलेने सांगण्यासाठी आलो नाही.
कारण तुमच्यामध्ये असताना फक्त येशू ख्रिस्त आणि तोही वधस्तंभावर खिळलेला याशिवाय कशाचेही ज्ञान असू नये असा मी निश्र्च्य केला आहे.
तेव्हा मी तुमच्याकडे अशक्तपणाने, भीतियुक्त असा व थर थर कापत आलो आहे.
माझे भाषण व संदेश हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते, ते आत्मा आणि सामर्थ्य यांचा पुरावा असलेले होते.
यासाठी की, तुमचा विश्वास मानवी ज्ञानावर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यवर असावा.
परंतु जे प्रौढ आहेत त्यांना आम्ही ज्ञान देतो. या युगाच्या अधिकाऱ्यांना नव्हे, ज्यांचा शेवट करण्यासाठी आणण्यात येत आहे.
त्याऐवजी, जे लपविलेले आहे, आणि हे युग सुरु होण्यापूर्वी देवाने आमच्या गौरवासाठी नेमले होते ते देवाचे रहस्यमय ज्ञान देतो.
जे या युगाच्या कोणाही सत्ताधीशाला माहीत नव्हते, कारण जर त्यांना कळले असते, तर त्यांनी गौरवी प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते.
परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही, आणि मनुष्याच्या अंत:करणाने जे उपजविले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.” यशया 64:4
परंतु देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपणांस प्रकट केले आहे. कारण आत्मा हा प्रत्येक गोष्टीचा शौध घेतो, एवढेच नव्हे तर तो देवाच्या सखोलतेच्या गुप्ततेचाही शोध घेतो.
कारण मनुष्याच्या आत्म्याशिवाय त्या मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा दुसरा कोण मनुष्य आहे? याप्रमाणेच देवाच्या आत्म्याशिवाय देवाचे विचार कोणीच ओळखू शकत नाही.
परंतु आम्हांला जगाचा आत्मा मिळाला नाही, तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे. यासाठी की, देवाने ज्या गोष्टी फुकट दिल्या आहेत त्यांचे आम्हांला ज्ञान व्हावे.
मानवी ज्ञानाने शिकविलेल्या शब्दांनी आम्ही या गोष्टी सांगत नाही, तर आत्म्याने शिकविलेल्या शब्दांनी, आध्यात्मिक शब्द उपयोगात आणून आध्यात्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करतो.
स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याने प्रगट झालेल्या गोष्टी ग्रहण करीत नाही. कारण त्या त्याला मूर्खपणाच्या आहेत. आणि त्या त्याला समजत नाहीत, कारण त्यांची आध्यात्मिक रितीने पारख केली जाते.
परंतु आध्यात्मिक मनुष्य सर्व गोष्ट पारखू शकतो कारण त्याची पारख करणे कोणालाही शक्य नसते, कारण पवित्र शास्त्र म्हणते,
“प्रभूचे मन कोण जाणतो, जो त्याला शिकवू शकेल?” यशया 40:13 परंतु आमच्या ठायी ख्रिस्ताचे मन आहे.
3
परंतु बंधूंनो आध्यात्मिक लोक म्हणून मी तुमच्याशी बोलू शकत नव्हतो. त्याऐवजी मला तुमच्याशी देहिक लोकांसारखे आणि ख्रिस्तामधील बालकासारखे बोलावे लागले.
मी तुम्हांला पिण्यासाठी दूध दिले, जड अन्र दिले नाही. कारण तुम्ही जड अन्र खाऊ शकत नव्हता. व आतासुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही.
कारण तुम्ही अजूनसुद्धा दैहिक आहात. कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत, तर तुम्ही दैहिक नाही काय, व जगातील लोकांसारखे वागत नाही काय?
कारण जेव्हा काही म्हणतात, “मी पौलाचा आह,” आणि इतर दुसरे म्हणतात, “मी अपुल्लोसाचा आहे,” तेव्हा तुम्ही जगिक लोकांसारखे वागत नाही काय?
तर मग अपुल्लोस कोण आणि पौल कोण? आम्ही केवळ सेवक आहोत, ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वासणारे झाला आणि आम्हा प्रत्येकाला देवाने जे काम नेमून दिले ते काम आम्ही केले.
मी बी लावले, अपुल्लोसाने त्याला पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली.
म्हणून जो बी पेरतो तो किंवा जो पाणी घालतो तो महत्त्वाचा नाही, तर देव जो त्याची वाढ करतो तो महत्त्वाचा आहे.
जे बी पेरतात व पाणी घालतात ते एक आहेत व प्रत्येकाला त्याच्या फळावर आधारित अशी मजूरी मिळेल
कारण देवा समवेत आपण सर्वजण कामगार आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात.
आणि देवाच्या दानाप्रमाणे जे मला दिले होते त्याप्रमाणे सूज्ञ, कुशल बांधणाऱ्यांप्रमाणे पाया घातला. पण दुसरा कोणी तरी त्यावर बांधतो, परंतु प्रत्येकाने आपण त्यावर कसे बांधतो याविषयी खबरदारी घ्यावी.
येशू ख्रिस्त जो पाया आहे त्याच्यावाचून इतर कोणीही दुसरा पाया घालू शकत नाही.
जर कोणी त्या पायावर सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत किंवा पेंढा यांनी बांधतो,
तर प्रत्येक व्यक्तीचे काम स्पष्ट दिसून येईल. कारण तो दिवस ते स्पष्ट करील, तो दिवस अग्नीने प्रगट होईल व तोच अग्नि प्रत्येक माणसाचे काम कसे आहे हे ठरविण्यासाठी परीक्षा घेईल.
ज्या कोणाचे बांधकाम, जे त्या पायावर बांधलेले आहे ते टिकेल.
त्याला बक्षीस मिळेल जर एखाद्याचे काम जळून गेले, तर त्याचे नुकसान होईल, परंतु जेव्हा तो इमारतीला लागलेल्या अग्नीपासून बचावासाठी पळून जाईल तेव्हा तो तारला जाईल.
तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो हे तुम्हांला माहीत नाही काय?
जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात.
कोणीही स्वत:ला फसवू नये. जर कोणी स्वत:ला या जगाच्या दृष्टिकोणानुसार शहाणा समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी “मूर्ख” व्हावे.
कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे. असे लिहिले आहे, “देव शहाण्यांना हुशारीमध्ये पकडतो.”
आणि पुन्हा “देव जाणतो की, शहाण्यांचे विचार निरर्थक आहेत.”
म्हणून मनुष्यांविषयी कोणीही फुशारकी मारु नये. कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत.
तर तो पौल, अपुल्लोस, पेत्र, जग, जीवन किंवा मरण असो, वर्तमानकाळाच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळाच्या गोष्टी असोत, सर्व गोष्टी तुमच्या आहेत.
तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.
4
एखाद्या व्यक्तीने आम्हाविषयी अशा प्रकारे समजावे: ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी.
आणखी असे की, जबाबदारी असलेल्या कारभाऱ्याने विश्वासू असले पाहिजे.
पण तुम्हांकडून किंवा कोणा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्याय व्हावा याबद्दल मला काही वाटत नाही, किंवा मी माझा स्वत:चादेखील न्याय करीत नाही.
कारण माझी विवेकबुद्धी शुद्ध आहे, पण त्यामुळे मी निर्दोष ठरत नाही. प्रभु हाच माझा न्यायनिवाडा करतो.
म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभु येईपर्यंत न्यायनिवाडा करु नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंत: करणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.
बंधूनो, तुमच्यासाठी मी या गोष्टी माझ्याकरीता व अपुल्लोसाभरीता लागू केल्या आहेत. यासाठी की ‘पवित्र शास्त्र सांगते त्यापलीकडे जाऊ नका,ʆ हे आमच्या उदाहरणावरुन तुम्ही शिकावे व तुम्ही गर्वाने फुगून जाऊ नये म्हणजे एखाद्याला चांगली वागणूक देऊन दुसऱ्याला विरोध करु नये.
कोण म्हणतो की तू दुसऱ्यापेक्षा चांगला आहेस? आणि तुझ्याजवळ असे काय आहे जे तुला मिळाले नाही? ज्याअर्थी तुला सर्व मिळाले आहे, तर तुला मिळाले नाही अशी बढाई का मारतोस?
तुम्हांला असे वाटते की, तुम्ही अगोदरच श्रीमंत झाला आहात, तृप्त झाला आहात, तुम्हांला असे वाटते की आमच्याशिवाय तुम्ही राजे झाला आहात आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही खरोखरच राजे होता, यासाठी की आम्ही तुमच्यासह राजे झालो असतो.
कारण मला वाटते की देवाने आम्हांला मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच माणसांना जाहीर प्रदर्शनसारखे झालो आहोत.
आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये किती हुशार आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही किती बलवान आहात! तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही तुच्छ आहोत!
अगदी या क्षणापर्यंत आम्ही भुकेले आणि तहानलेले, फाटकेतुटेके कपडे घातलेले, ठोसे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत.
आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वत:च्या हातांनी काम करतो,
जेव्हा आमची निंदा होते, तेव्हा आम्ही आशीर्वाद दतो. जेव्हा आमचा छळ होतो तेव्हा आम्ही सहन करतो. जेव्हा आमची निंदा होते, आम्ही दयाळूपणे त्यांच्याशी बोलतो, या क्षणापर्यंत आम्ही जगासाठी गाळ आणि कचरा असे झालो आहोत.
मी तुम्हांला हे लाजविण्यासाठी लिहित नाही: तर उलट मी तुम्हांला माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करुन देतो,
कारण जरी तुम्हांला खिस्तामध्ये दहा हजार पालक असले तरी पुष्कळ वडील नाहीत. कारण ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगे मी तुम्हांला जन्म दिला आहे,
यास्तव मी तुम्हांला बोध करतो की, माझे अनुकरण करा.
यासाठीच तिमथ्याला तुमच्याकडे पाठविले आहे. प्रभूमध्ये तो माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. ज्याप्रमाणे मी त्यांना सगळीकडे प्रत्येक मंडळीमध्ये शिकवितो, तसेच तो ख्रिस्तामधील माझ्या शिकवणूकीची आठवण करुन देईल.
पण जणू काय मी तुमच्याकडे येणारच नव्हतो, म्हणून काही जण गर्वाने फुगले होते.
तरीही जर प्रभूची इच्छा असेल तर मी लवकरच तुमच्याकडे येईन. आणि मग मला समजेल की, जे गर्वाने फुगून गेले ते किती चांगले वक्ते आहेत हे नव्हे, तर ते किती सामर्थ्यशाली आहेत, हे मला समजेल.
कारण देवाचे राज्य बोलण्यावर अवलंबून नसते तर सामर्थ्यावर असते.
तुम्हांला कोणते पाहिजे? मी तुमच्याकडे तुम्हांला शिक्षा करण्यासाठी काठी घेऊन यावे की, प्रीतीने व सौम्यतेच्या आत्म्याने यावे?
5
खरोखरच असे सांगण्यात आले आहे की, तुमच्यामध्ये जारकर्म चालू आहे. ते असे की, आपणामध्ये कोणी आपल्या सावत्र आईशी अनैतिक संबंध ठेऊन आहे. वास्तविक असले दुष्कृत्य विदेशी लोकांमध्येही आढळणार नाही.
आणि तरीही तुम्ही गर्वांने फुगला आहात, परंतु तुम्हांला त्याबद्दल शोक व्हायला नको होता का? ज्या कोणी हे कर्म केले असेल त्याला तुमच्यातून काढून टाकले पाहिजे.
कारण जरी मी शरीराने तुमच्यात नसलो तरी आत्म्याने हजर आहे. आणि हजर असल्याप्रमाणे त्यांचा मी अगोदरच न्याय केलेला आहे, ज्याने हे अयोग्य कृत्य केले आहे,
तुमचे बढाई मारणे चांगले नाही. तुम्हांला माहीत नाही का की, ‘थोडेसे खमीर सगळे पीठ फुगविते.ʆ
जुने खमीर काढून टाका. यासाठी की, तुम्ही नवीन पीठाचा गोळा व्हावे आणि ख्रिस्ती लोकांसारखे तुम्ही असे आहात: बेखमीर, कारण ख्रिस्त, आपला वल्हांडणाचा कोकरा आम्हांला शुद्ध करण्यासाठी त्याचे अर्पण झाले.
यासाठी चला आपण वल्हांडणाचा सण पाळू या. जुन्या खमीराच्या भाकरीने नव्हे तर खरेपणाच्या बेखमीर भाकरीने पाळावा.
जे जारकर्मी आहेत त्यांची संगत धरु नये असे मी माझ्या पूर्वीच्या पत्रात लिहिले होते.
माझ्या म्हणण्याचा असा अर्थ नाही की, तुम्ही या जगातील जे लोक जारकर्मी, लोभी, फसविणारे किंवा मूर्तिपूजक यांची संगत धरु नये असे नाही. त्याबाबतीत तुम्हांलाच हे जग सोडून द्यावे लागेल.
परंतु असे आहे की, मी तुम्हांला लिहिले होते, तुम्हांतील जो कोणी स्वत:ला बंधु म्हणतो, परंतु जर तो जारकर्मी, लोभी, मूर्तीपूजक निंदक, मद्यपि, फसविणारा असेल तर त्याची संगत धरु नये. अशा माणसाबरोबर भोजनसुद्धा करु नये.
परंतु जे मंडळीबाहेर आहेत त्यांचा निवाडा करणे माझे काम आहे काय? जे मंडळीत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करीत नाही काय?
देव जे मंडळीबाहेर आहेत त्यांचा न्याय करील. पवित्र शास्त्र म्हणते, “तुमच्यामधून दृष्ट मनुष्याला काढून टाका.”
6
जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याचा दुसऱ्या व्यक्तीबरोबर भांडणतंटा असेल तर ती समस्या (वाद) देवाच्या पवित्र लोकांपुढे न आणता ती व्यक्ति तो वाद न्यायालयात अनीतिमान लोकांसमोर नेण्याचे धाडस का करते?
किंवा तुम्हांला माहीत नाही का की देवाचे पवित्र लोक जगाचा न्याय करतील? आणि जर जगाचा न्याय तुमच्याकडून होणार आहे तर लहानशा बाबींमध्ये त्याचा न्याय करण्यासाठी तुम्ही अपात्र आहात काय?
आपण देवदूतांचा न्याय करणार आहोत हे तुम्हांला माहीत नाही का? तर मग रोजच्या जीवनातील साध्या गोष्टींचा विचारसुद्धा कशाला?
म्हणून जर दररोज तुम्हांला प्रकरणे निकालात काढायची असतील, तर ज्यांना मंडळीत काही पाठिंबा नाही, अशा माणसांना न्यायाधीश म्हणून का नियुक्त करता?
तुम्हांला लाज वाटावी म्हणून मी हे म्हणत आहे. गोष्टी इतक्या वाईट होत आहेत का की, तुमच्यामध्ये एकही सुज्ञ मनुष्य नाही जो त्याच्या (ख्रिस्ती) भावांचा समेट घडवून आणू शकेल?
पण एक भाऊ दुसऱ्या भावाविरुद्ध न्यायालयात जातो आणि तुम्ही हे सर्व अविश्वासणाऱ्यांसमोर करीत आहात?
वास्तविक, तुमचे एकमेकांविरुद्ध खटले आहेत यातच तुमचा संपूर्ण पराभव झाला आहे. त्याऐवजी तुम्ही स्वत:वर अन्याय का होऊ देत नाही? त्याऐवजी तुम्ही स्वत:ची लुबाडणूक का होऊ देत नाही?
उलट तुम्ही स्वत: अन्याय करता व लुबाडणूक करता, आणि तुम्ही हे सर्व तुमच्या ख्रिस्ती बांधवांना करता!
किंवा तुम्हांला माहीत नाही का की, अनीतिमान लोकांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही? तुमची स्वत:ची फसवणूक होऊ देऊ नका! जारकर्मी, मूर्तिपूजक, व्याभिचारी, पुरुषवेश्या (पुरुष जे समलिंगी संबंधास तयार होतात), समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष, किंवा
दरोडेखोर, लोभी, दारुडे, निंदा करणारे, फसविणारे यांपैकी कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करणार नाही.
आणि तुमच्यातील काही असे होते. पण तुम्ही स्वत:स धुतलेले होते, तुम्हाला देवाच्या सेवेला समर्पित केलेले होते. प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही नीतिमान ठरला होता व देवाच्या आत्म्यामध्ये नीतिमान ठरला होता.
“मी काहीही करण्यास मुक्त आहे.” पण प्रत्येक गोष्ट हितकारक नसते, होय, “मी काहीही करण्यास मुक्त आहे, पण कोणत्याही गोष्टीचे वर्चस्व माइयावर होऊ देणार नाही.
“अन्र पोटासाठी आहे व पोट अन्रासाठी आहे.” आणि हे खरे आहे. पण देव अन्राचा व पोटाचा अशा दोघांचाही नाश करील. आणि आमची शरीरे ही जारकर्मसाठी नाही तर देवाच्या सेवेसाठी आणि प्रभूच्या शरीराच्या हितासाठी आहेत.
आणि देवाने केवळ प्रभूलाच मरणातून उठविले असे नाही तर तो आम्हंलाही आपल्या सामर्थ्याने मरणातून उठवील.
तुम्हाला माहीत नाही का की, तुमची शरीरे ख्रिस्ताला जोडलेली आहेत? तर मग जे ख्रिस्ताशी जोडलेले आहे ते घेऊन मी वेश्येला जोडावे काय? निश्चितच नाही! किंवा तुम्हांस ठाऊक नाही काय की, जो वेश्येशी जडतो तो तिच्याशी एकदेह होतो.
“कारण ती दोघे एकदेह होतील असे शास्त्रच सांगते.”
पंरतु जो स्वत: प्रभूशी जडतो तो त्याच्याशी आत्म्यात एक आहे.
जारकर्मापासून दूर पळा. मनुष्य एखादे पाप करणे शक्य आहे ते त्याच्या शरीराबाहेरचे आहे. परंतु जो जारकर्म करतो तो त्याच्या स्वत:च्या शरीराविरुद्ध पाप करतो.
किंवा तुम्हाला हे माहीत नाही काय तुमची शरीरे ही तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे व जो तुम्हांला देवाकडून प्राप्त झाला त्यांचे मंदिर आहे, आणि स्वत:चे असे तुम्ही नाही?
0कारण तुम्हांला किंमत देऊन विकत घेतले आहे. म्हणून तुमच्या शरीराने देवाला गौरव द्या.
7
आता, तुम्ही ज्याविषयी आपणा त्यासंबंधाने: एखाद्या मनुष्याने एखाद्या स्त्रीला स्पर्श न करणे हे त्याच्यासाठी चांगले आहे,
परंतु जारकर्माचा मोह टाळण्यासाठी, प्रत्येक पुरुषाला त्याची स्वत:ची पत्नी असावी. व प्रत्येक स्त्रीला तिचा स्वत:चा पती असावा.
पतीने त्याच्या पत्नीला पत्नी म्हणून तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीने तिच्या पतीला पतीचा हक्क द्यावा.
पत्नीला तिच्या स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो तिच्या पतील आहे.
विषयसुखासाठी एकमेकाला वचित करु नका, तुम्हालां प्रार्थनेला वेळ देता यावा म्हणून एकमेकांच्या संमतीने ठराविक वेळेकरीता दूर राहा. आणि मग पुन्हा एक व्हा यासाठी की, सैतानाने तुम्च्यात आत्मसंयमन नसल्याने मोहात पाडू नये.
परंतु मी हे तुम्हांला सवलत म्हणून सांगतो, आज्ञा म्हणून नव्हे.
मला असे वाटते की, सर्व लोक माझ्यासारखे असावेत पण प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वत:चे असे देवापासून दान आहे. एकाला एका प्रकारे राहण्याचे आणि दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारे राहण्याचे.
परंतु जे अविवाहित व विधवा आहेत त्यांना मी म्हणून की, म्हपासारखीचराहिली तर त त्यांना बरे.
पण जर ती वेगळे राहते तर तिने लग्न न करताच राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा. आणि पतीने आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी देऊ नये.
आता इतरासाठी सांगतो, आणि हे मी सांगत आहे, प्रभु नाही: जर एखाद्या ख्रिस्ती बांधवाची पत्नी विश्वास ठेवणारी नसेल, आणि त्याच्याबरोबर राहण्यास ती राजी असेल तर त्याने तिला सोडचिठ्ठी देऊ नये.
आणि एखाद्या स्त्रीचा नवरा जर विश्वास ठेवणारा नसेल आणि तो तिच्याबरोबर राहण्यास राजी असेल तर तिने त्याला सोडचिठ्ठी देऊ नये,
कारण विश्वास न ठेवणाऱ्या पतीचे त्याच्या ख्रिस्ती पत्नीबरोबरच्या निकट सहवासाद्वारे पवित्रीकरण झाले आहे आणि विश्वास न ठेवणाऱ्या पत्नीचे त्या ख्रिस्ती पतीबरोबरच्या निकट सहवासाद्वारे त्यांचे नाते देवाच्या दृष्टीनेही कायदेशीर आहे. नाहीतर तुमची मुले अशुद्ध झाली असती, परंतु आता ती पवित्र आहेत.
तरीही विश्वास न ठेवणारा वेगळा होत असेल तर त्याने वेगळे व्हावे. याबाबतीत ख्रिस्ती बंधु किंवा बहीण यांना मोकळीक आहे. देवाने आपल्याला शांतीने राहण्यासाठी बोलावले आहे.
कारण पत्नी, तू तुइया विश्वास न ठेवणाऱ्या पतीला तारु शकशील हे तुला कसे माहीत? किंवा पती, तू आपल्या विश्वास न ठेवणाऱ्या पत्नीला तारशील हे तुला कसे माहीत? देवाने पाचारण केल्याप्रमाणे राहा.
फक्त, देवाने प्रत्येकाला जसे नेमले आहे आणि देवाने जसे प्रत्येकाला पाचारण केले आहे त्याप्रमाणे त्याने राहावे. आणि अशी मी सर्व मंडळ्यांना आज्ञा करतो.
एखाद्याला जेव्हा देवाने पाचारण केले होते तेव्हा त्याची अगोदरच सुंता झाली होती काय? त्याने आपली सुंता लपवू नये. कोणाला सुंता न झालेल्या स्थितीत पाचारण झाले काय, तर त्याने सुंता करु नये.
सुंता म्हणजे काही नाही व सुंता न होणे म्हणजेही काही नाही. तर देवाची आज्ञा पाळणे यात सर्व काही आहे.
प्रत्येकाने ज्या स्थितीत त्याला पाचारण झाले त्या स्थितीत राहावे.
तुला गुलाम म्हणून पाचारण झाले होते काय? त्यामुळे तुला त्रास होऊ नये, परंतु तुला स्वतंत्र होणे शक्य असेल तर पुढे हो व संधीचा उपयोग करुन घे.
कारण जो कोणी प्रभुमध्ये गुलाम असा पाचारण केलेला होता तो देवाचा मुक्त केलेला मनुष्य आहे, त्याचप्रमाणे ज्या मुक्त मनुष्याला देवाचे पाचारण झाले आहे तो देवाचा गुलाम आहे.
तुम्हांला किंमत देऊन विकत घेतले होते. मनुष्यांचे गुलाम होऊ नका.
बंधूनो, तुम्हांतील प्रत्येकाने ज्या स्थितीत त्याला पाचारण झाले होते, त्याच स्थितीत त्याने देवासमोर राहावे.
आता कुमारिकेविषयी, मला प्रभूपासून आज्ञा नाही, पण मी माझे मत देतो. जो मी विश्वासनीय आहे कारण प्रभूने आम्हावर दया दाखविली.
मी हे असे समजतो: सध्याच्या दुर्दशेत हे चांगले आहे, (होय) हे चांगले आहे की, एखाद्याने माइयासारखे एकटे राहावे.
तुम्ही पत्नीशी बांधलेले आहात काय? तर मोकळे होण्यास पाहू नका. स्त्रीपासून मोकळे आहात काय? लग्न करण्याचे पाहू नका.
पण जरी तुम्ही लग्न केले तरी तुम्ही पाप केलेले नाही. आणि जर कुमारिका लग्न करते तर तिने पाप केले नाही. पण अशा लोकांना शारीरिक पीडा होतील आणि या पीडा टाळण्यासाठी मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे.
हेच मी म्हणत आहे, बंधूनो, वेळ थोडा आहे. येथून पुढे ज्यांना पत्न्या आहेत त्यांनी त्या नसल्यासारखे राहावे.
जे शोक करीत आहेत त्यांनी शोक करीत नसल्यासारखे, जे आनंदी आहेत त्यांनी आनंदी नसल्यासारखे, जे वस्तु विकत घेत आहेत, त्यांनी जणू काही त्यांच्याकडे स्वत:चे काहीच नाही
आणि जे लोक जग त्यांना ज्या त्यांना ज्या गोष्टी देऊ करते व त्या गोष्टींचा जे उपयोग करुन घेतात, त्यांनी जणू काय त्या गोष्टींचा पूर्ण उपयोग करुन घेतला नाही, असे राहावे. कारण या जगाची सध्याची स्थिती लयास जात आहे.
माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही काळजीपसून मुक्त असावे. अविवाहित पुरुष प्रभूच्या कामाविषयी आणि त्याला कसे संतोषविता येईल याबाबत काळजीत असतो.
परंतु विवाहित पुरुष जगिक गोष्टीविषयी आणि आपल्या पत्नीला कसे आनंदीत ठेवता येईल या काळजीत असतो.
त्यामुळे तो द्विधा अवस्थेत असतो. आणि एखादी अविवाहित स्त्री किंवा कुमारिका, प्रभूच्या कामाबद्दल उत्सुक असते. यासाठी की, तिने शरीराने आणि आत्म्याने पवित्र असावे. परंतु विवाहित स्त्री जगिक गोष्टी आणि तिच्या पतीला कसे आनंदी ठेवता येईल याचीच चिंता करते.
मी हे तुमच्याच फायद्यासाठी सांगत आहे. तुमच्यावर बंधने लादण्यासाठी सांगत नाही. आचरणातील, सुव्यवस्थेतील फायद्यासाठी व प्रभूच्या सेवेसाठी विनाअडथळा तुम्हाला समर्पण करणे शक्य व्हावे म्हणून सांगतो.
जर एखाद्याला असे वाटते की, तो त्याच्या कुमारिकेविषयी योग्य ते करीत नाही आणि जर त्याच्या भावना तीव्र आहेत, तर त्या दोघांनी पुढे होऊन लग्न करुन घेणे आवश्यक आहे. त्याला जे वाटते ते त्याने करावे.
तो पाप करीत नाही. त्याने लग्न करुन घ्यावे. परंतु जो स्वत: मनाचा खंबीर आहे व जो कोणत्याही दडपणाखाली नाही पण ज्याचा स्वत:च्या इच्छेवर ताबा आहे. व ज्याने आपल्या मनात विचार केला आहे की आपल्या कुमारिकेला ती जशी आहे तशीच ठेवावी म्हणजे तिच्याशी विवाह करु नये, तर तो चांगले करतो.
म्हणून जो कुमारिकेशी लग्न करतो तो चांगले करतो पण जो तिच्याशी लग्न करीत नाही तो अधिक चांगले करील.
पति जिवंत आहे तोपर्यंत स्त्री लग्नाने बांधलेली आहे, पण तिचा पति मेला तर तिला पाहिजे त्याच्याशी परंतु केवळ प्रभूमध्ये लग्न करण्यास ती मोकळी आहे.
परंतु माझ्या मते ती आहे तशीच राहिली तर ती अधिक सुखी होईल आणि मला असे वाटते की, मलाही प्रभूचा आत्मा आहे.
8
आता, मूर्तिंना अर्पण केलेल्या गोष्टीविषयी: आम्हाला माहीत आहे की, “आम्हा सर्वांना ज्ञान आहे.” ज्ञान लोकांना गर्वाने फुगविते. परंतु प्रीति लोकांना बलवान होत जाण्यास मदत करते.
जर एखाद्याला वाटत असेल की, त्याला काही माहीत आहे, तर जसे त्याला कळायला पाहिजे तसे त्याला माहीत नसते.
पण जर कोणी देवावर प्रीति करतो तर देवाला तो माहीत असतो.
म्हणून मूर्तिला वाहिलेल्या अन्राविषयी आपल्याला माहीत आहे की, “जगामध्ये खरी मूर्तिच नाही.” आणि त्या एकाशिवाय दुसरा देव नाही.
आणि जरी लोक त्यांना देव म्हणतात, तरी असे अनेक तथाकथित देव आहेत जे स्वर्गात किंवा पृथ्वीवर आहेत (आणि पुष्कळ देव व पुष्कळ प्रभु आहेत)
परंतु आमच्यासाठी फक्त एकच देव जो पिता तो आहे. आणि ज्याच्यासाठी आपण जगतो आणि ज्याच्यापासून सर्व गोष्टी येतात आणि फक्त एकच प्रभु येशू ख्रिस्त आहे. ज्याच्याद्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात येतात व ज्याच्याद्वारे आपण जगतो.
पण प्रत्येकाला हे ज्ञान नसते. काहींना, ज्यांना आतापर्यंत मूर्तीची उपासना करण्याची सक्य होती ते असे मांस खातात व असा विचार करतात ते मूर्तीला वाहिलेले होते. आणि त्यांची सद्सद्विवेकबुद्धि दुर्बल असल्याने त्यांच्या कृत्यांना डागाळलेली आहे.
परंतु अन्र आपणाला देवाजवळ आणणार नाही. जर आम्ही खाल्ले नाही तर वाईट होणार नाही किंवा खाल्ले तर अधिक चांगले होणार नाही.
तुमचा हा अधिकार जे दुर्बल आहोत त्यांच्यासाठी अपराध तर नाही याकडे लक्ष द्या.
कारण तू जो या गोष्टीचे ज्ञान असलेला त्या तुला दुर्बल बुद्धिच्या कोणी मूर्तिच्या मंदिरात जेवताना पाहिले, तर तो दुर्बल असून त्याची विवेकबुद्धि आत्यंतिक प्रबळ झाल्याने मूर्तीला वाहिलेले मांस खाण्यास त्याला उत्तेजन मिळणार नाही काय?
तो जो दुर्बल आहे, त्या तुझ्या भावासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या ज्ञानामुळे नाश होतो.
आणि अशा प्रकारे तुझ्या बंधूविरुद्ध पाप करुन आणि त्याच्या दुर्बल विवेकबुध्दीला जखम करुन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता.
म्हणून अन्र जर माझ्या बंधूना पाप करायला लावते तर मी कधीही मांस खाणार नाही. यासाठी की माझ्या बंधूने पाप करु नये.
9
मी मुक्त नाही का? मी प्रेषित नाही का? आमचा प्रभु येशू याला मी पाहिले नाही का? तुम्ही माझे प्रभूमधील काम नाही का?
जरी मी इतरांच्यासाठी प्रषित नसलो तरीही तुमच्यासाठी मी एक आहे. कारण तुम्ही प्रभूमध्ये असलेल्या माझ्या प्रेषितपणाचा शिक्का आहात.
जे माझी परीक्षा घेऊ पाहतात, त्यांच्याविरुद्ध माझा बचाव असा आहे.
मला खाण्याचा आणि पिण्याचा हक्क नाही काय?
इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ आणि पेत्र यांच्यासारखे एखाद्या विश्वासणान्या व्यक्तीला पत्नी करुन घेण्याचा मला हक्क नाही काय?
का फक्त बर्णबा व मलाच आमच्या उपजीविकेकरिता काम न करण्याचा हक्क आहे?
स्वत:च्या खर्चाने सैनिक म्हणून सेवा करणारा असा कोण आहे? द्राक्षमळा लावून द्राक्षे खात नाही असा कोण आहे? किंवा मेढ्यांचे कळप पाळून कळपाचे काही दूध पित नाही असा कोण आहे?
फक्त मानवी दैनंदिन व्यवहारानुसार मी हे सांगत नाही. तर नियमशास्त्रसुद्धा हेच सांगत नाही का?
तो खात्रीने आमच्याविषयीच सांगत नाही काय? होय, ते आमच्यासाठीच लिहिले होते, कारण जो नांगरतो त्याने अपेक्षेने नांगरावे. आणि जो मळणी करतो त्याने पिकात वाटा असावा या हेतूने मळणी करावी.
जर आम्ही तुमच्या फायद्यासाठी आध्यात्मिक बी पेरले, तर तुमच्यापासून ऐहिक गरजांची कापणी केली तर ती मोठी गोष्ट आहे काय?
जर इतरही तुमच्यापासून ऐहिक गोष्टींची कापणी करण्याच्या या अधिकारात सहभागी होत असतील तर तसे करण्याचे आम्हालाही यापेक्षा अधिक मोठे कारण नाही काय? परंतु आम्ही हा अधिकार बजावला नाही. त्याऐवजी ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या मार्गात अडथळ येऊ नये म्हणून आम्ही सर्व गोष्टी सहन करतो.
तुम्हाला माहीत नाही काय मंदिरात जे काम करतात ते त्यांचे अन्र मंदिरातून घेतात, आणि जे नियमितपणे वेदीची सेवा करतात, ते वेदीवर जे अर्पण केले जाते त्यात सहभागी होतात.
त्याचप्रकारे, प्रभूने आज्ञा केली आहे की, जे सुवार्ता गाजवितात त्यांनी त्या सुवार्ता गाजविण्याकडून आपला चरितार्थ चालवावा.
परंतु मी या कोणत्याही अधिकाराचा वापर केला नाही. आणि माइया बाबतीत असे घडावे म्हणूनही मी हे लिहिले नाही. कारण माझे अभिमान बाळगण्याचे कारण कोणी हिरावून घेण्यापेक्षा मी मरण पत्करीन,
कारण जर मी सुवार्ता गाजवितो, तर मला अभिमान बाळगण्याचे काही कारण नाही, कारण मला ते करणे आवश्यक आहे. आणि जर मी सुवार्ता गाजविली नाही तर माइयासाठी ते किती वाईट असेल!
कारण जर मी हे स्वेच्छेने करतो तर मी बक्षिसास पात्र आहे, पण जर एखादे कार्य माइयावर सोपविले आहे जे माइया आवडीने नव्हे
तर माझे बक्षीस कोणते? ते हे की मी फुकट सुवार्ता सांगावी यासाठी की, सुवार्ता सांगत असताना मी वेतन मिळण्याच्या अधिकाराचा पूर्ण उपयोग करु नये.
कारण, जरी मी सर्व लोकांपासून मुक्त असलो तरी मी स्वत:ला सर्व लोकांचा गुलाम करुन घेतले आहे.
यासाठी की, मी अधिक मिळवावे. यहूदी लोकांना जिंकण्यासाठी यहूदी लोकांसाठी मी यहूदी झालो. जे नियमशास्त्राधीन आहेत त्यांच्यासाठी
मी नियम शास्त्राधीन असणान्या लोकांसारखा झालो. (जरी मी नियमशास्त्राधीन नाही तरी तसा झालो). यासाठी की जे नियमशास्त्रविरहीत आहेत त्यांना मी नियमशास्त्रविरहीत असा झालो. (जरी मी देवाच्या नियमशास्त्राशिवाय नाही) तरी मी ख्रिस्ताच्या नियमाधीन आहे. यासाठी की, जे नियमशास्त्रविरहीत आहेत त्यांना जिंकता यावे.
तुम्हांला माहीत नाही का मैदानातील शर्यतीत धावणारे सर्व धावतात, परंतु एकालाच बक्षिस मिळते? अशा प्रकारे धावा की तुम्ही ते जिंकाल.
प्रत्येक जण जो शर्यतीत धावतो तो सर्व बाबतीत कडक रीतीने प्रशिक्षण घेतो (आत्मसंयमन करतो.) ते नाशवंत गौरवाचा मुगुट मिळविण्यासाठी असे करतात, परंतु आम्ही अविनाशी मुगुट मिळविण्यासाठी करतो.
यास्तव मी अनिश्चितपणे नाही तर ज्याला ध्येय आहे अशासारखा धावतो, तसेच जो कोणी नुसताच वाऱ्यावर प्रहार करीत नाही, तसे मी मुष्टीयुद्ध करतो.
त्याऐवजी मी आपल्या शरीराला कठोरपणे वागवितो आणि त्याला ताब्यात आणतो म्हणजे दुसऱ्यांना उपदेश केल्यानंतर देवाकडून मी नाकारला जाऊ नये.
10
बंधूनो, तुम्हांला हे माहीत असावे असे मला वाटते की, आपले सर्व पूर्वज मेघाखाली होते. ते सर्व तांबड्या समुद्रातून सुखरुप पार गेले.
मोशेचे अनुयायी म्हणून त्या सर्वांचा मेघात व समुद्रात बाप्तिस्मा झाला.
परंतु देव त्यांच्यातील पुष्कळ लोकांविषयी आनंदी नव्हता, आणि त्यांना अरण्यात ठार मारण्यात आले.
आणि या गोष्टी आमच्यासाठी उदाहरण म्हणून घडल्या, कारण ज्याप्रमाणे त्यांनी वाईट गोष्टींची अपेक्षा केली, त्याप्रमाणे आपण वाईटाची इच्छा धरणारे लोक होऊ नये.
त्यांच्यापैकी काही जण होते तसे मूर्तिपूजक होऊ नका. पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, “लोक खाण्यापिण्यास खाली बसले आणि ते नाचणे, मौजमजा करण्यासाठी उठले.”
ज्याप्रमाणे त्यांच्यातील काही जणांनी केले तसे जारकर्म आपण करु नये. त्याचा परिणाम असा झाला की, एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले.
आणि त्यांच्यातील काही जणांनी पाहिली तशी आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये. याचा परिणाम असा झाला की, सापांकडून ते मारले गेले.
कुरकूर करु नका, ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केली, याचा परिणाम असा झाल की, मृत्युदूताकडून ते मारले गेले.
या गोष्टी त्यांच्याबाबतीत उदाहरणार्थ होत्या म्हणून घडल्या. व त्या गोष्टी लिहिल्या गेल्या यासाठी की आम्ही ज्यांच्यावर युगाचा शेवट आला आहे अशा आपणासाठी त्या इशारा अशा व्हाव्यात
म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असा जो विचार करतो त्याने आपण पडू नये म्हणून जपावे.
जे मनुष्याला सामान्य नाही अशा कोणत्याही मोहाने तुम्हाला पकडले नाही. परंतु देव विश्वासनीय आहे. तुम्हांला सहन करता येते त्यापलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही. परंतु त्या मोहाबरोबर, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार करील. म्हणजे तुम्हांला सहन करणे शक्य होईल.
तेव्हा, माइया प्रियांनो, मूर्तिपूजा टाळा.
मी तुमच्याशी बुद्धिमान लोक समजून बोलत आहे. मी काय बोलत आहे याचा तुम्हीच न्याय करा.
“आशीर्वादाचा प्याला” जो आशीर्वादित करण्यास सांगतो, तो ख्रिस्ताच्या रक्तात सहभागी आहे, नाही का?
वस्तुस्थिती अशी आहे की फक्त भाकरीचा एकच तुकडा आहे म्हणजे आपण सर्व एकाच शरीरापासून आहोत, आपण पुष्कळजण एक भाकर, एक शरीर आहोत. कारण आपला सर्वांचा त्या भाकरीत भाग आहे.
इस्राएल राष्ट्राकडे पाहा. जे अर्पण केलेले खातात ते वेदीचे भागीदार आहेत. नाही का?
तर मी काय म्हणतो? माइया म्हणण्याचा अर्थ असा आहे का की मूर्तिला वाहिलेले अन्र काहीतरी आहे किंवा ती मूर्ति काहीतरी आहे?
नाही, परंतु उलट माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, जे अर्पण ते लोक करतात ते अर्पण भुतांना करतात, देवाला करीत नाहीत आणि तुम्ही भूताचे भागीदार व्हावे असे मला वाटत नाही!
तुम्ही देवाचा आणि भुताचासुद्धा असे दोन्ही प्याले पिऊ शकत नाही. तुम्ही प्रभूच्या मेजाचे आणि भुताच्या मेजाचे भागीदार होऊ शकत नाही.
आपण प्रभूला ईर्षेस पेटाविण्याचा प्रयत्न करीत आहोत का? कारण तो जितका सामर्थ्यशाली आहे तितके आम्ही नाही.
“काहीही करण्यास आम्ही मुक्त आहोत.” पण सर्वच हितकारक नाही. “आम्ही काहीही करण्यास मुक्त आहोत.” परंतु सर्व गोष्टी लोकांना सामर्थ्ययुक्त होण्यास मदत करीत नाहीत.
कोणीही स्वत:चेच हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पाहावे.
मांसाच्या बाजारात जे मास विकले जाते ते कोणतेही मांस खा. विवेकबुध्दीला त्या मांसाविषयीचे कोणतेही प्रश्न न विचारता खा.
कारण ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही प्रभूचे आहे.”
विश्वास न ठेवणाऱ्यांपैकी जर कोणी तुम्हांला जेवावयास बोलाविले आणि तुम्हांस जावेसे वाटले तर सद्सद्वविवेकबुद्धिने कोणतेही प्रश्न न विचारता तुमच्यापुढे वाढलेले सर्व खा.
परंतु जर कोणी तुम्हांस सांगितले की, ‘हे मांस यज्ञात देवाला अर्पिलेले होते,’ तर विवेकबुद्धिसाठी किंवा ज्या मनुष्याने सांगितले त्याच्यासाठी खाऊ नका.
आणि जेव्हा मी ‘विवेक’ म्हणतो तो स्वत:चा असे मी म्हणत नाही तर इतरांचा. आणि हेच फक्त एक कारण आहे. कारण माझ्या स्वातंत्र्याचा इतरांच्या सद्सद्विवेकबुद्धिने न्याय का करावा?
जर मी आभारपूर्वक अन्र खातो तर माइयावर टीका होऊ नये. कारण या गोष्टींबद्दल देवाला मी धन्यवाद देतो.
म्हणून खाताना, पिताना किंवा काहीही करताना सर्व काही देवाच्या गौरवासाठी करा.
यहूदी लोक, ग्रीक लोक किंवा देवाच्या मंडळीला अडखळण होऊ नका.
जसा मी प्रत्येक बाबतीत सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्यासाठी काय हितकारक आहे हे न पाहता इतर प्रत्येकासाठी काय हितकारक आहे ते पाहतो यासाठी की त्यांचे तारण व्हावे.
11
मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे माझे अनुकरण करणारे व्हा.
मी तुमची प्रशंसा करतो कारण तुम्ही माझी नेहमी आठवण करता आणि मी जी शिकवण तुम्हाला दिली, ती तुम्ही काटेकोरपणे पाळता.
परंतु तुम्हाला हे माहीत व्हावे असे मला वाटते की, ख्रिस्त हा प्रत्येक पुरुषाचे मस्तक आहे. आणि प्रत्येक पुरुष हा स्त्रीचे मस्तक आहे, आणि देव ख्रिस्ताचे मस्तक आहे.
प्रत्येक मनुष्य जो प्रार्थना करताना किंवा देवाकडून आलेला संदेश देताना आपले मस्तक आच्छादितो तो मस्तकाला लज्जा आणतो.
परंतु प्रत्येक स्त्री जी आपले मस्तक न झाकता लोकांमध्ये देवाचा संदेश सांगते ती मस्तकाचा अपमान करते. कारण ती स्त्री मुंडलेल्या स्त्री सारखीच आहे.
जर स्त्री आपले मस्तक आच्छादित नाही तर तिने आपले केस कापून घ्यावेत. परंतु केस कापणे किंवा मुंडण करणे स्त्रीस लज्जास्पद आहे. तिने आपले मस्तक झाकावे.
ज्याअर्थी मनुष्य देवाची प्रतिमा आणि वैभव प्रतिबिंबित करतो त्याअर्थी त्याने मस्तक झाकणे योग्य नाही. परंतु स्त्री पुरुषाचे वैभव आहे.
पुरुष स्त्रीपासून नाही परंतु स्त्री पुरुषापासून आली आहे.
आणि मनुष्य स्त्रीकरिता निर्माण केला गेला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण केली गेली.
यासाठी देवाने स्त्रीला अधिकार दिलेला आहे त्याचे चिन्ह म्हणून तिने आपले मस्तक आच्छादावे व देवदूतांकरितासुद्धा तिने हे करावे.
तरीही प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही व पुरुष स्त्रीपासून स्वतंत्र नाही.
कारण स्त्री जशी पुरुषापासून आहे, तसा पुरुषही स्त्रीपासून जन्माला येतो. परंतु सर्व गोष्टी देवापासून आहेत.
हे तुम्हीच ठरवा की, मस्तक न आच्छादिता सभेत देवाची प्रार्थना करणे स्त्रीसाठी योग्य आहे का?
पुरुषांनी लांब केस वाढविणे हे त्याच्यासाठी लज्जास्पद आहे. असे निसर्गसुद्धा तुम्हाला शिकवीत नाही काय?
परंतु स्त्रीने लांब केस राखणे हा तिचा मान आहे कारण तिला तिचे केस निसर्गत: आच्छादनासाठी दिले आहेत.
जर कोणाला वाद घालायचा असेल तर मला दाखवून द्या की, आमची अशी रुढी नाही व देवाच्या मंडळ्यांचीही नाही.
पण आता ही पुढची आज्ञा देत असताना मी तुमची प्रशंसा मंडळी म्हणून करीत नाही, कारण तुमच्या एकत्र येण्याने तुमचे चांगले न होता तुमची हानि होते.
प्रथम, मी ऐकतो की, जेव्हा मंडळीमध्ये तुम्ही एकत्र जमता, तेथे तुमच्यामध्ये गट असतात, आणि काही प्रमाणात ते खरे मानतो.
(तरीही तुम्हांमध्ये पक्ष असावेत) यासाठी की, जे तुमच्यामध्ये पसंतीस उतरलेले आहेत ते प्रगट व्हावेत.
म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभुभोजन घेत नाही.
कारण तुम्ही भोजन करता तेव्हा तुम्हांतील प्रत्येक जण अगोदरच आपले स्वत:चे भोजन करतो. एक भुकेला राहतो तर दुसरा प्यायलेला असतो.
खाण्यापिण्यासाठी तुम्हांला घरे नाहीत का? का तुम्ही देवाच्या मंडळीला तुच्छ मानता आणि जे गरीब आहेत त्यांना खिजविता? मी तुम्हांला काय म्हणू? मी तुमची प्रशंसा करु काय? याबाबतीत मी तुमची प्रशंसा करीत नाही.
कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हांला दिले. प्रभु येशूला ज्या रात्री मारण्यासाठी धरुन देण्यात आले. त्याने भाकर घेतली.
आणि उपकार मानल्यावर ती मोडली आणि म्हणाला, ‘हे माझे शरीर आहे, जे मी तुमच्यासाठी देत आहे. माझी आठवण करण्यासाठी हे करा.ʆ
त्याचप्रमाणे त्यांनी भोजन केल्यावर त्याने द्राक्षारसाचा प्याला घेतला आणि म्हणाला, “हा द्राक्षारसाचा प्याला माइया रक्ताने स्थापित केलेला नवा करार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही द्राक्षारस प्याल तेव्हा माझी आठवण करण्यासाठी हे करा.”
कारण जितके वेळा तुम्ही ही भाकर खाता व हा द्राक्षारसाचा प्याला पिता, तितके वेळा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता.
म्हणून जो कोणी अयोग्य रीतीने प्रभूची भाकर खातो किंवा द्राक्षारसाचा प्याला पितो. तो प्रभूच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी दोषी ठरेल.
पंरतु मनुष्याने स्वत:ची परीक्षा करावी. आणि नंतर भाकर खावी किंवा द्राक्षारसाचा प्याला प्यावा.
कारण जर तो प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता ती भाकर खातो व द्राक्षारसाचा प्याला पितो तर तो खाण्याने आणि पिण्याने स्वत:वर न्याय ओढवून घेतो.
याच कारणामुळे तुम्हांतील अनेक जण आजारी आहेत. आणि पुष्कळजण झोपलेले आहेत.
परंतु जर आम्ही आमची परीक्षा करु तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही.
प्रभूकडून आमचा न्याय केला जातो तेव्हा आम्हांला शिस्त लावण्यात येते, यासाठी की, जगातील इतर लोकांबरोबर आम्हांलाही शिक्षा होऊ नये.
म्हणून माइया बंधूनो, जेव्हा तुम्ही भोजनास एकत्र येता, तेव्हा एकमेकांसाठी थांबा.
जर कोणी खरोखरच भुकेला असेल तर त्याने घरी खावे यासाठी की तुम्ही न्यायनिवाड्यासाठी एकत्र जमू नये. मी येईन तेव्हा इतर गोष्टी सुरळीत करुन देईन.
12
आता, बंधूनो, आध्यात्मिक दानांसबंधी तुम्ही अज्ञान असावे असे मला वाटत नाही.
तुम्हाला माहीत आहे की जेव्हा तुम्ही यहूदीतर होता तेव्हा मूर्तिपूजेकडे तुमचा कल होता.
म्हणून मी तुम्हांला सांगत आहे की, देवाच्या आत्म्याने बोलणारा कोणीही मनुष्य असे म्हणत नाही की, “येशू शापित असो.” आणि पवित्र आत्म्याशिवाय कोणीही “येशू प्रभु आह,” असे म्हणू शकत नाही.
आध्यात्मिक दाने विभागलेली आहेत पण तोच आत्मा ही विभागणी करतो.
सेवेचे प्रकार आहेत, पंरतु ज्याची आम्ही सेवा करतो तो एकच आहे.
कार्य करण्याचे वेगवेगळे विभाग आहेत पण ह्या सेवा एकाच देवाकडून येतात.
कारण प्रत्येकाच्या फायद्यासाठी एकेकाला आत्म्याचे प्रकटीकरण दिले आहे.
एका व्यक्तीला आत्म्याच्या द्वारे दैवी ज्ञानाचे वचन सांगण्याचे शहाणपण दिले जाते. आणि दुसऱ्या व्यक्तीला त्याच आत्म्याच्या द्वारे दैवी ज्ञानाने बोलण्याचे,
कोणाला त्याच आत्म्याने विश्वास व दुसऱ्याला फक्त त्याचा एका आत्म्याद्वारे बरे करण्याचे दान दिले आहे.
दुसऱ्या कोणाला अद्भुत कार्ये करण्याची शक्ति व दुसऱ्याला भविष्य सांगण्याची शक्ति, तर दुसऱ्याला आत्म्या आत्म्यातील फरक ओळखण्याची, दुसऱ्या कोणाला वेगवेगळ्या भाषा बोलण्याची, दुसऱ्याला भाषांतर करुन अर्थ सांगण्याची शक्ति दिली आहे.
परंतु तो एकच आत्मा जो त्याच्या इच्छेप्रमाणे एकेकाला वाटून देऊन ही सर्व कार्ये पूर्णत्वास नेतो.
कारण ज्याप्रमाणे आपणातील प्रत्येकाला एकच शरीर आणि त्याला अनेक अवयव असतात, आणि तरीही सर्व अवयव जरी ते पुष्कळ असले तरी त्यांचे मिळून एक शरीर बनते. तसाच ख्रिस्तसुद्धा आहे.
जर आपण यहूदी किंवा ग्रीक, गुलाम किंवा स्वतंत्र असून आपणांला एकच आत्मा देह म्हणून दिला आहे. कारण एका आत्म्याने आपणाला एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा दिलेला आहे.
आता एका मानवी शरीरात एकच अवयव असत नाही, तर पुष्कळ असतात
जर पाय म्हणतो, “मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही,” तर तो या कारणासाठी शरीराचा नाही असे होत नाही, होते का?
आणि जर कान म्हणेल, “मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही,” तर तो या कारणासाठी शरीराचा नाही असे होत नाही. होते का?
संबंध शरीरच जर डोळा असते तर आपल्याला ऐकता कसे आले असते?
परंतु प्रत्यक्षात शरीरातील प्रत्येक अवयव देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे ठेवला आहे.
आणि सर्व अवयव जर एकच अवयव असते तर शरीर कोठे असते?
पण असे आहे की, अवयव अनेक आहेत, शरीर मात्र एकच आहे.
डोळा हाताला म्हणू शकत नाही की, “मला तुझी गरज नाही.” किंवा दुसरे उदाहरण द्यायचे तर डोक पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.”
याच्या उलट जे अवयव आपण कमी महत्त्वाचे समजतो, त्यांची आपण अधिक काळजी घेतो.
आणि जे न दाखवण्याजोगे अवयव त्यांना मोठ्या सभ्यतेने वागवतो.
पण आपल्या दाखविता येण्याजोग्या अवयवांना तशी गरज नसते. त्याऐवजी जे अवयव उणे आहेत त्यांना मोठा मान देण्यासाठी देवाने असे शरीर जुळविले आहे,
यासाठी की शरीरात कोणतेही मतभेद नसावेत तर उलट अवयवांनी एकमेकांची काळजी घ्यावी.
जर शरीराचा एक अवयव दुखत असेल तर सर्व अवयव त्याच्याबरोबर दु:ख सोसतात, एका अवयवाचा सन्मान झाला तर सर्व अवयव त्याच्याबरोबर आनंदीत होतात.
म्हणून तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात आणि वैयक्तिकरीत्या अवयव आहात
शिवाय देवाने मंडळीत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, जे चमत्कार करतात ते, ज्यांना आरोग्य देण्याचे दान आहे ते,
जे लोक मदत करतात, जे पुढारीपण करतात व ज्या लोकांना भिन्न भिन्न भाषा बोलण्याचे दान आहे, असे लोक ठेवले आहेत. म्हणजे सर्वच प्रेषित नाहीत, सर्वच संदेष्टे नाहीत, सर्वच शिक्षक नाहीत, सर्वांनाच चमत्कार करण्याची शक्ति नाही.
सर्वांनाच आरोग्य देण्याची दाने नाहीत, सर्वच अन्य भाषेत बोलत नाहीत, सर्वांनाच भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ति नाही. 31तथापि आत्म्याच्या अधिक मोठ्या दानांसाठी प्रयत्न करा. आणि आता मी तुम्हांस ह्याहूनही उत्तम मार्ग दाखवितो.
13
मी माणसांच्या जिभांनी बोललो व देवदूतांच्यासुद्धा भाषेत बोलणे मला शक्य असेल, माइया ठायी प्रीति नसली तर मी वाजणारी थाळी किंवा मोठा आवाज करणारी झांज आहे.
जर मला देवासाठी संदेश देण्याची शक्ति असली आणि मला सर्व रहस्ये माहीत असली, सर्व दैवी ज्ञान असले आणि डोंगर ढळविता येतील असा दृढ विश्र्वास असला, परंतु माइया ठायी प्रीति नसली,
तर मी काहीच नाही. आणि मी जर माझे सर्व धन गरजवांताच्या अन्नदानासाठी दिले आणि मी माझे शरीर जाळण्यासाठी दिले पण जर माइयात प्रीति नसली,
तरी मी काहीच मिळवीत नाही. प्रीति गर्व करीत नाही. प्रीति सहनशील आहे, प्रीति दयाळू आहे, ती हेवा करीत नाही. प्रीति बढाई मारीत नाही.
ती गर्वाने फुगत नाही. ती अयोग्य रीतीने वागत नाही. ती स्वार्थी नाही, ती चिडत नाही. तिच्याविरुद्ध केलेल्याची नोंद ती ठेवीत नाही,
वाईटात ती आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी इतरांबरोबर ती आनंद मानते.
सर्व काही खरे मानण्यास सिध्द असते
ती नेहमी विश्वास ठेवते. आशा धरते. नेहमी सहन करते. प्रीति कधी संपत नाही. पण भविष्य सांगण्याची दाने ती बाजूला केली जातील. इतर भाषा बोलण्याचे दान असेल तर ते थांबेल. ज्ञानाचे दान असेल तर ते बाजूला केले जाईल.
कारण आमचे ज्ञान अपूर्ण आहे, आम्ही देवासाठी बोलतो (भविष्य सांगतो). आम्ही अपूर्ण भविष्य सांगतो.
पण जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा जे अपूर्ण आहे ते नाहीसे केले जाईल.
जेव्हा मी मूल होतो, तेव्हा मूलासारखा बोलत असे, मी मूलासारखा विचार करीत असे. मुलासारखा उहापोह करीत असे. परंतु जेव्हा मी मोठा झालो, तेव्हा मी लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.
आता आपण आरशात अस्पष्ट प्रतिबिंब पाहतो, परंतु जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा आपण समोरासमोर पाहू. आता मला अंशत:कळते, परंतु ती वेळ येईल तेव्हा देव मला ओळखतो, तसा मी पूर्णपणे ओळखीन,
सारांश, या तीन गोष्टी राहतात : विश्वास, आशा आणि प्रीति पण यातील सर्वांत महान प्रीति आहे.
14
प्रीतीसाठी प्रयत्न करा. आणि आध्यात्मिक दानांची विशेषत: तुम्हांला संदेश देता यावा याची मनापासून इच्छा बाळगा.
ज्याला इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान आहे तो खरे पाहता माणसांबरोबर बोलत नाही तर देवाबरोबर बोलतो. कारण तो काय बोलतो हे कोणालाही कळत नाही. आत्म्याच्या द्वारे तो गुढ गोष्टी बोलतो.
परंतु जो संदेश देतो तो लोकांशी बोध, उन्नती, उपदेश याविषयी बोलतो,
ज्याला दुसऱ्या भाषेत बोलण्याचे दान आहे, तो स्वत:चीच आध्यात्मिकदृष्ट्या उन्नती करुन घेतो, पण ज्याला संदेश देण्याचे (देवासाठी बोलण्याचे) दान आहे तो संपूर्ण मंडळीची उन्नती करतो.
आता तुम्ही सर्वांनी भाषांमध्ये बोलावे अशी माझी इच्छा आहे, परंतु त्याहीपेक्षा जर तुम्हांला संदेश देता आले तर मला अधिक आवडेल. जो संदेश देतो, (देवासाठी बोलतो) तो भाषा बोलणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, पण भाषा बोलणारा हा संदेश देणाऱ्यासारखाच (देवासाठी बोलणान्यासारखाच) आहे, जर त्याने जी भाषा तो बोलतो तिचा अर्थ सांगितला तर, त्याद्वारे संपूर्ण मंडळी आध्यात्मिकदृष्ट्या बळकट होते.
आता, बंधूनो, जर मी तुमच्याकडे अन्य भाषा बोलण्यासाठी आलो तर तुमचा कसा फायदा होईल? तुमचा फायदा होण्यासाठी मी तुमच्याकडे प्रकटीकरण, दैवी ज्ञान, देवाकडून संदेश किंवा शिकवणूक आणायला नको का?
हे निर्जीव वस्तू उदा. बासरी, वीणा यासारखे आवाज काढण्यासारखे आहे: जर ते वाद्य ते निर्माण करीत असलेल्या वेगवेगळ्या आवाजातील फरक स्पष्ट करीत नाही, तर एखाद्याला बासरीवर किंवा वीणेवर कोणते संगीत वाजवले जात आहे ते कसे कळेल?
आणि जर कर्णा अस्पष्ट आवाज काढील तर लढाईसाठी कोण तयार होईल?
त्याचप्रमाणे सहज समजेल अशा भाषेतून बोलल्याशिवाय तुम्ही काय बोलला हे कोणाला कसे समजेल? कारण तुम्ही हवेत बोलल्यासारखे होईल.
नि:संशय, जगात पुष्कळ प्रकारच्या भाषा आहेत, व कोणतीही अर्थविरहीत नाही.
म्हणून जर मला भाषेचा अर्थ समजला नाही तर जो बोलत आहे त्याच्यासाठी मी विदेशी ठरेन व जो बोलणारा आहे तो माइयासाठी विदेशी होईल.
नेमके तेच तुम्हांलाही लागू पडते जर तुम्ही आध्यात्मिक दाने मिळवीत म्हणून उत्सुक आहात तर मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीला आध्यत्मिक मजबूती येण्यासाठी जोरदार प्रयत्न करा.
म्हणून, जो दुसऱ्या भाषेत बोलतो त्याने तो जे बोलला आहे त्याचा अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी.
कारण जर मी दुसऱ्या भाषेतून प्रार्थना केली तर माझा आत्माही प्रार्थना करतो पण माझे मन रिकामे राहते.
मग काय केले पाहिजे? मी माझ्या आत्म्याने प्रार्थना करीन पण त्याचप्रमाणे मी माझ्या बुद्धिनेही प्रार्थना करीन.
कारण जर तू तुझ्या आत्म्याने देवाचे धन्यवाद करशील तर जो फक्त ऐकणारा सामान्य तेथे बसला असेल तर तो तुझ्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेत “आमेन” कसे म्हणेल? कारण तू काय म्हणतोस ते त्याला कळत नाही.
आता तू धन्यवाद देत असलास हे जरी चांगले असले तरी दुसरी व्यक्ति आध्यात्मिकदृष्ट्या बलवान झालेली नसते.
मी देवाचे उपकार मानतो, कारण मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक भाषा बोलू शकतो ज्याचे दान मला आहे,
परंतु सभेत इतरांनाही बोध करता यावा म्हणून इतर भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा माइया मनाप्रमाणे पाच शब्द सांगणे मी पसंत करतो.
बंधूनो, तुमच्या विचार करण्यात मुलासारखे असू नका. त्याऐवजी दुष्टतेच्या बाबतीत लहान बाळासारखे निरागस परंतु आपल्या विचारात प्रौढ व्हा.
नियमशास्त्र म्हणते, “इतर भाषा बोलणान्याचा उपयोग करुन, मी या लोकांशी बोलेन तरीसुद्धा ते माझे ऐकणार नाहीत.” यशया 28:11-12 हे असे प्रभु म्हणतो.
म्हणून इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान हे अविश्वासणाऱ्यांसाठी नसून विश्वासणाऱ्यांसाठी आहे.
म्हणून जर संपूर्ण मंडळी एकत्र येते व प्रत्येकजण दुसऱ्या भाषेत बोलत असेल (आणि) जर एखादा बाहेरचा किंवा अविश्वासणारा आत आला, तर तुम्ही वेडे आहात असे ते तुम्हाला म्हणणार नाही का?
परंतु जर प्रत्येक जण संदेश देऊ लागला आणि जर अविश्वासणारा किंवा बाहेरचा आत आला, तर सर्वजण जे बोलत असतील त्यामुळे त्या ऐकणाऱ्याला त्याच्या पापाची जाणीव होते, ते सर्व त्याचा न्याय करतात;
त्याच्या अंत:करणातील गुपिते माहीत होतात. आणि मग तो पालथा पडतो आणि देवाची उपासना करतो व म्हणतो “खरोखर देव तुमच्यामध्ये आहे!”
बंधूनो, मग काय करावे? जेव्हा तुम्ही एकत्र येता, प्रत्येकाकडे गाण्यासाठी स्तोत्र असते कोणाकडे शिक्षण असते. कोणाकडे प्रकटीकरण असते. कोणी दुसऱ्या भाषेत बोलतो, कोणी त्या भाषेचा अर्थ सांगतो, प्रत्येक गोष्ट मंडळीच्या वाढीसाठी केली गेली पाहिजे.
जर कोणी दुसऱ्या भाषेत बोलणार असेल तर दोघांनी किंवा जास्तीत जास्त तिघांनी बोलावे, एका वेळी एकानेच बोलावे, आणि एका व्यक्तीने त्या बोलण्याचा अर्थ सांगावा.
जर मंडळीत अर्थ सांगणारा कोणी नसेल तर भाषा बोलणाऱ्याने सभेत गप्प बसावे, व स्वत:शी व देवाशी बोलावे.
दोघा किंवा तिघांनी संदेश द्यावा व इतरांनीही ते काय बोलतात याची परीक्षा करावी.
बसलेल्यांपैकी एखाद्या व्यक्तीला जर काही प्रकट झाले तर पहिल्या संदेश देणाऱ्याने गप्प बसावे.
जर तुम्हा सर्वांना संदेश देता येत असेल, तर एका वेळी एकानेच बोलावे, यासाठी की सर्वजण शिकतील, सर्वांना बोधपर मार्गदर्शन मिळेल.
जे आत्मे भविष्यवाद्यांना प्रेरणा देतात, ते त्या संदेष्ट्यांच्या स्वाधीन असतात.
कारण देव हा बेशिस्तपणा आणणारा नसून, शांति आणणारा देव आहे. जशा सर्व मंडळ्या देवाच्या पवित्र लोकांच्या बनलेल्या असतात,
स्त्रियांनी सभेत गप्प बसावे, कारण त्यांच्यासाठी सभेत बोलण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, कारण नियमशास्त्रसुद्धा असेच म्हणते,
त्यांना जर काही शिकायचे असेल, तर त्यांनी स्वत:च्या पतीला घरी विचारावे. कारण स्त्रीने सभेत बोलणे हे तिला लज्जास्पद आहे.
तुमच्याकडूनच देवाचा संदेश बाहेर गेला होता काय? किंवा ते फक्त तुमच्यापर्यंतच आले आहे?
एखादा जर स्वत:ला संदेष्टा समजत असेल किंवा जर तो धार्मिक मनुष्य असेल तर त्याने हे ओळखले पाहिजे की, जे मी तुम्हाला लिहित आहे ती देवाकडून देण्यात आलेली आज्ञा आहे.
म्हणून जर कोणी ती मानत नसेल, तर त्यालाही मानण्यात येणार नाही.
म्हणून माइया बंधूनो, देवासाठी संदेश देण्यासाठी उत्सुक असा, दुसऱ्या भाषेत बोलणाऱ्याला मना करु नका.
तर सर्व गोष्टी योग्य रीतीने आणि व्यवस्थित असाव्यात.
15
आता बंधूंनो, मला तुम्हाला आठवण करुन द्यावीशी वाटते, की ज्या सुवार्तेविषयी मी तुम्हाला उपदेश केला व जी तुम्हीसुद्धा स्वीकारलीत व जिच्यात तुम्ही बळकट आहात.
आणि जिच्यामुळे तुमचे तारण झाले आहे. ज्या वचनाने मी तुम्हांस सुवार्ता सांगितली ते तुम्ही दृढ धरता तर तुम्ही विश्वास धरल्याशिवाय काही उपयोग नाही, नाहीतर तुमची स्वीकृती व्यर्थ आहे.
कारण मलासुद्धा पहिल्यांदा जे मिळाले ते मी तुमच्या स्वाधीन केले: ते हे की ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला, हे जे वचनात लिहिले आहे.
व त्याला पुरण्यात आले. व तिसऱ्या दिवशी त्याला उठविण्यात आले.
व तो पेत्राला दिसला, नंतर बारा प्रेषितांना,
नंतर तो एकाच वेळी पाचशे हून अधिक बांधवांना दिसला. त्यांच्यापैकी बहुसंख्य अजूनही जिवंत आहेत, तर काही मेले आहेत.
नंतर तो याकोबाला दिसला, मग पुन्हा तो सर्व प्रेषितांना दिसला.
आणि शेवटी मी जो अवेळी जन्मलो, त्या मलासुद्धा तो दिसला.
कारण प्रेषितांमध्ये मी कनिष्ठ आहे, मी प्रेषित म्हणून घेण्याच्यासुद्धा योग्यतेचा नाही, कारण देवाच्या मंडळीचा मी छळ केला.
पण देवाच्या दयेने मी जो आहे तो मी (प्रेषित) आहे. आणि त्याची माझ्यावरची कृपा व्यर्थ गेली नाही, उलट त्या सर्वांपेक्षा अधिक काम मी केले आहे, करणारा मी नव्हतो, तर देवाची दया जी माझ्याबरोबर होती, ती करीत होती.
म्हणून, जरी मी तुम्हांला उपदेश केला किंवा त्यांनी उपदेश केला, तरी आम्ही सर्व हाच उपदेश करु, आणि तुम्ही यावरच विश्वास ठेवला.
पण जर आम्ही ख्रिस्त मेलेल्यांतून उठविला गेला आहे अशी सुवार्ता गाजवितो, तर मृतांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यातील काहीजण म्हणतात हे कसे?
जर मृतांचे पुनरुत्थान नाही, तर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही,
आणि जर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही तर आमचा संदेश व्यर्थ आहे आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आहे.
आणि आम्हीसुद्धा देवाविषयीचे खोटे साक्षीदार ठरु कारण आम्ही देवासमोर शपथपूर्वक साक्ष दिली आहे की, ख्रिस्ताला मेलेल्यांतून त्याने उठविले, पण जसे ते म्हणतात त्याप्रमाणे जर देवाने ख्रिस्ताला उठविले नाही, तर मेलेले मरणातून उठविले जात नाहीत.
आणि जर मृतांना उठविले जात नाही, तर ख्रिस्ताला मरणातून उठविण्यात आले नाही.
आणि जर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे; तुम्ही अजूनसुद्धा पापातच आहात;
होय, आणि जे ख्रिस्तात मेलेले आहेत, त्यांचा नाश झाला आहे.
जर ख्रिस्तावर असलेली आमची आशा ही, फक्त या पृथ्वीवरील जीवनासाठीच असली, तर सर्व मनुष्यात आम्ही दयनीय असे आहोत.
परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठविला गेला आहे. जे मेलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथम फळ आहे.
कारण ज्याअर्थी मनुष्याद्वारे मरण आले त्याप्रमणे मृतांचे पुनरुत्थानसुद्धा मनुष्याद्वारेच आले.
कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील.
पण प्रत्येक जण त्याच्या क्रमानुसार, ख्रिस्त जो प्रथम फळ आहे, आणि मग ख्रिस्त येण्याच्या वेळी त्याचे असलेले,
मग शेवट येईल प्रत्येक अधिपती, प्रत्येक सत्ता, व प्रत्येक सामर्थ्य जेव्हा ख्रिस्त नाहीसे करील, तेव्हा ख्रिस्त देवपित्याला राज्य देईल.
कारण देवाने ख्रिस्ताचे शत्रू ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवीपर्यंत ख्रिस्ताने राज्य केले पाहिजे.
शेवटचा शत्रू असल्यासारखा मृत्यूचा नाश केला पाहिजे.
कारण “देवाने सर्व काही त्याच्या अधिकारात ठेवले आहे.” आता जेव्हा पवित्र शास्त्र म्हणते की, “सर्व गोष्टी” अंकीत केल्या आहेत तेव्हा सर्व स्पष्ट आहे की, ज्याने सर्व गोष्टी त्याच्या अंकीत केल्या आहेत, तो देव सोडून इतर सर्व गोष्टी त्याच्या अधिकार क्षेत्रात आहेत.
आणि सर्व गोष्टी जेव्हा स्वाधीन केलेल्या आहेत, तेव्हा पुत्रसुद्धा देवाच्या, ज्याने सर्व गोष्टी स्वाधीन केल्या आहेत, स्वत: स्वाधीन केला जाईल यासाठी की, देव सर्वांवर संपूर्णपणे अधिपती असावा.
नाहीतर, मेलेल्यांसाठी व त्यांची पुन्हा भेट होईल या आशेने ज्यांनी बाप्तिस्मा घेलला आहे ते काय करतील? जर मेलेले उठविले जात नाहीत तर त्यांच्यासाठी लोक बाप्तिस्मा का घेतात?
आम्हीसुद्धा प्रत्येक घटकेला धोक्याला का तोंड देतो?
बंधूजनहो, मी शपथपूर्वक सांगतो की, ख्रिस्त येशूमध्ये माझा तुमच्याविषयी अभिमान आहे, मी दररोज मरतो
इफिसात मी रानटी प्राण्याबरोबर लढलो, तर मी काय मिळविले? जर मेलेले उठविले जात नाहीत तर “आपण खाऊ पिऊ, कारण आपण उद्या मरुन जाऊ!”
फसू नका, “वाईट सोबती चांगल्या सवयी बिघडवितात.”
शुद्धीवर या. जसे तुम्ही यायला पाहिजे आणि पाप करीत जाऊ नका. कारण तुम्हांपैकी काहीजण देवाविषयी अज्ञानी आहेत. हे मी तुम्हांस लाजविण्यासाठी बोलतो.
परंतु कोणीतरी म्हणेल? “मेलेले कसे उठविले जातात? कोणत्या प्रकारच्या शरीराने ते येतात?”
तू किती मूर्ख आहेस? तू जे पेरतोस ते प्रथम मेल्याशिवाय जिवंत होत नाही.
आणि तू लावतोस (पेरतोस) त्यासंबंधी तू जे जमिनीत पेरतोस ते वाढलेले रोपटे नसून जे वाढतच राहणार आहे, ते नव्हे तर फक्त धान्य (दाणा). तो गव्हाचा किंवा इतर कोठला तरी असेल.
आणि मग देवाने निवडल्याप्रमाणे तो त्याला आकार देतो. तो प्रत्येक दाण्याला त्याचे स्वत:चे ‘शरीर’ देतो.
जिवंत प्राणीमात्रांचे सर्वांचे देह सारखेच नसतात. त्याऐवजी मनुष्याचे शरीर एक प्रकारचे असते. प्राण्यांचे शरीर दुसऱ्या प्रकारचे असते, पक्ष्यांचे वेगळ्या प्रकारचे असते; आणि माशांचे आणखी वेगळ्या प्रकारचे असते.
तसेच स्वर्गीय शरीरे आहेत आणि पृथ्वीवरील शरीरे आहेत, पण स्वर्गीय शरीराचे वैभव एक प्रकारचे असते, तर जगिक शरीराला दुसरे असते.
सूर्याचे तेज वेगळ्या प्रकारचे तर चंद्राचे तेज वेगळ्या प्रकाचे असते. ताऱ्याचे तेज वेगळ्या प्रकारचे असते. आणि तेजाबाबत एक तारा दुसन्या ताऱ्यांहून निराळा असतो.
म्हणून मृतांच्या पुनरुत्थानाबाबत असे असेल, शरीर जे जमिनीत पुरले गेले आहे. ते नाश पावणारे आहे, जे शरीर उठविण्यात येते ते आविनाशी आहे.
जे शरीर जमिनीत पुरले आहे, ते अपमानात पुरलेले असते. ते अशक्त असते पण उठविले जाते ते सशक्त शरीर असते
जे जमिनीत पुरले जाते ते नैसर्गिक शरीर आहे जे उठविले जाते ते आध्यात्मिक शरीर आहे. जर नैसर्गिक शरीरे आहेत तर आध्यात्मिक शरीरेसुद्धा असतात.
आणि तेच पवित्र शास्त्र सांगते, “पाहिला मनुष्य, आदाम हा जिवंत प्राणी झाला,” पण ख्रिस्त जो शेवटचा आदाम झाला तो जीवन देणारा आत्मा झाला.
परंतु जे आध्यात्मिक ते प्रथम नाही, जे जगिक ते प्रथम, मग जे आध्यात्मिक आहे ते.
पाहिला मनुष्य मातीतून आला म्हणजे तो धुळीपासून बनविला गेला, तर दुसरा मनुष्य स्वर्गातून आला.
ज्याप्रमाणे तो मनुष्य मातीपासून बनविला गेला, त्याप्रमाणे लोकसुद्धा मातीपासूनच बनविले गेले आणि त्या स्वर्गीय मनुष्याप्रमाणे स्वर्गीय लोकही तसेच आहेत.
ज्याप्रमाणे तयार केलेल्या माणसाची प्रतिमा आपण धारण केली आहे, तशी आपणसुद्धा स्वर्गीय माणसाची प्रतिमा धारण करु.
बंधूनो, मी तुम्हांला सांगतो, आपल्या मांस व रक्त असलेल्या जगिक शरीराला देवाच्या राज्यात वाटा मिळू शकत नाही. तसेव विनाशीपण अविनाशीपणाचा वारसा मिळवू शकत नाही.
पाहा! मी तुम्हांला एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ.
क्षणात, डोळ्यांची उघडझाप होते इतक्या लवकर, जेव्हा शेवटचा कर्णा वाजेल, कारण कर्णा वाजेल आणि मेलेले अविनाशीपणात उठविले जातील आणि आपण जे अजूनही जिवंत आहोत ते बदलून जाऊ.
कारण या विनाशी शरीराने अविनाशीपण धारण करावे आणि या मर्त्य शरीराने अमरत्व धारण केलेच पाहिजे.
जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशीपण धारण करील व हे मर्त्य शरीर अमरत्व धारण करील, तेव्हा पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे होईल. “विजयात मरण गिळले गेले आहे.” यशया 25:8
“अरे मरणा तुझा विजय कोठे आहे? मरण, तुझी नांगी कोठे आहे?” होशेय 13:14
मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे सामर्थ्य नियमाशास्त्रापासून येते.
पण देवाला धन्यावाद असो, जो प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला विजय देतो!
म्हणून माइया प्रिय बंधूनो, स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वत:ला प्रभूच्या कार्यसाठी वाहून घ्या. कारण तुम्ही जाणता की प्रभुमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.
16
आता, देवाच्या लोकांकरीता वर्गाणी गोळा करण्यविषयी, जसे मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे तुम्हीही तसे करावे.
प्रत्येक रविवारी तुम्हांतील प्रत्येकाने आपल्या घरी, जो काही त्याला नफा मिळाला असेल त्यातून काढून ठेवावे आणि बचत करावी.
मी येईन तेव्हा ज्या माणसांना तुम्ही मान्यता द्याल त्यांना मी ओळखपत्रे देऊन तुमच्या देणग्या यरुशलेमला नेण्यासाठी पाठवीन.
आणि जर माझेसुद्धा जाणे योग्य असेल तर ते माइयाबरोबर येतील. पौलाच्या योजना
मी मासेदोनियातून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन कारण मासेदोनियातून जाण्याची माझी योजना आहे.
परंतु कदाचित शक्यतो मी तुमच्याबरोबर काही काळ घालवीन किंवा हिवाळासुद्धा तुमच्यात घालवीन. यासाठी की मी जिकडे जाणार आहे तिकडे तुम्ही मला पाठवावे.
जाता जाता तुम्हांला भेटण्याची माझी इच्छा नाही. कारण जर देवाची इच्छा असेल तर तुमच्यासमवेत काही काळ घालवावा अशी इच्छा मी धरतो.
पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिसात राहीन
कारण माइयासाठी मोठे आणि परिणामकारक दार उघडले आहे. आणि असे अनेक आहेत जे मला विरोध करतात.
जर तीमथ्य आला तर तो तुमच्याजवळ निर्भयपणे कसा राहील याकडे लक्ष द्या. कारण तोही माझ्यासारखेच प्रभूचे कार्य करीत आहे.
यास्तव कोणीही त्याला तुच्छ मानू नये. तर मग त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्याला शांतीने पाठवा. कारण इतर बंधूंबरोबर त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे.
आता आपला बंधु अपुल्लोविषयी, इतर बंधूंबरोबर त्याने तुमच्याकडे यावे म्हणून मी त्याला भरपूर उत्तेजन दिले. परंतु आताच त्याने तुमच्याकडे यावे अशी देवाची इच्छा नव्हती. त्याला संधी मिळाल्यावर तो येईल.
सावध असा, तुमच्या विश्वासात बळकट राहा.
धैर्यशील व्हा. सशक्त व्हा. प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल ती प्रीतीत करा.
बंधूंनो, मी तुम्हांला बोध करतो तुम्हांला स्तेफनच्या घराची माहिती आहे आणि जाणीवही आहे की ते अखयाचे प्रथम फळ आहे. त्यांनी स्वत: संतांची सेवा करण्याचे ठरविले आहे.
प्रत्येक जण जो या कार्यात सामील होतो व प्रभुसाठी श्रम करतो अशा लोकांच्या तुम्हीसुद्धा अधीन व्हा.
स्तेफन, फर्तुतात आणि अखायिक हे आल्याने मला आनंद झाला. कारण तुम्ही माझ्यासाठी जे केले ते तुम्ही करु शकला नसता.
कारण त्यांनी माझा व तुमचा आत्मा प्रफुल्लीत केला आहे. अशा लोकांना मान्यता द्या.
आशियातील मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात. अक्विला, प्रिस्कील्ला व जी मंडळी त्यांच्या घरात जमते, ती प्रभूमध्ये तुम्हांला फार सलाम सांगतात,
सर्व बंधु तुम्हांला सलाम सांगतात, पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा.
मी, पौल स्वत: माइया स्वत:च्या हाताने हा सलाम लिहीत आहे.
जर कोणी प्रभूवर प्रीति करीत नाही, तर तो शापित होवो. “मारानाथा; हे प्रभु य”
प्रभु येशूची कृपा तुम्हांबरोबर असो!
ख्रिस्त येशूमध्ये माझी प्रीति तुम्हां सर्वांबरोबर असो.
- License
-
CC-0
Link to license
- Citation Suggestion for this Edition
- TextGrid Repository (2025). Paul the Apostle. 1 Corinthians (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A8B8-B