1
आदाम, शेथ, अनोश, केनान, महललेल, यारेद, हनोख, मथुशलह, लामेख (नोहा.)
शेम, हाम आणि याफेथ ही नोहाची मुले.
गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख, तीरास
गोमरचे मुलगे: आश्कनाज, रीफाथ, तोगार्मा
यावानचे मुलगे: अलीसा, तार्शीश, कित्तीम, रोदानीम
कूश, मिस्राईम (मिसर) पूट व कनान.
कूशचे मुलगे असे: सबा, हवीला, सब्ता, रामा, साब्तका, रामाचे मुलगे शबा आणि ददान.
कुशचा वंशज निम्रोद हा जगातील सर्वात सामर्थ्यवान आणि शूर सैनिक झाला.
मिस्राईमने लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम
पात्रुसीम, कास्लूहीम (याच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरीम यांना जन्म दिला.
आणि कनानाचा ज्येष्ठ मुलगा सीदोन व त्यांनतर हेथ;
यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
हिव्वी, अकर, शीनी
आर्वाही, समारी, हमाथी हे होत.
एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद आणि अराम हे शेमचे मुलगे, ऊस, हूल, गेतेर आणि मेशेख हे अरामचे मुलगे.
शेलहचे वडील अर्पक्षद आणि एबरचे वडील शेलह.
एबरला दोन मुलगे झाले. एकाचे नाव पेलेग (म्हणजे विभागणी) त्याला हे नाव पडायचे कारण याच्या हयातीत पृथ्वीवरील लोकांची भाषावार विभागणी झाली. पेलेगच्या भावाचे नाव यक्तान.
यक्तानने अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,
हदोराम, ऊजाल, दिक्ला,
एबाल, अबीमाएल, शबा,
ओफीर, हवीला, योबाब यांना जन्म दिला.
अर्पक्षद, शेलह,
एबर, पेलेग, रऊ
सरुग, नाहोर, तेरह,
अब्राम (म्हणजेच अब्राहाम) ही सर्व शेमची मुले.
इसहाक आणि इश्माएल ही अब्राहामची मुले.
त्यांचे वंशज पुढीलप्रमाणे: नबायोथ हा इश्माएलचा पहिला मुलगा. इश्माएलची इतर मुले म्हणजे केदार, अदबेल, मिबसाम,
मिश्मा, दुमा, मस्सा, हदद, तेमा
यतूर, नापीश, केदमा. हे सर्व इश्माएलचे मुलगे.
कटूरा ही अब्राहामची दासी होती. तिने जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक, शूह यांना जन्म दिला. यक्षानला सबा व ददान हे मुलगे झाले.
एफा, एफर, हनोख, अबीदा, एल्दा हे मिद्यानचे मुलगे. या सर्वाना कटूराने जन्म दिला.
इसहाक हा अब्राहामचा मुलगा. एसाव आणि इस्राएल (याकोब) हे इसहाकचे मुलगे.
एसावाचे मुलगे पुढीलप्रमाणे: अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम, कोरह.
अलीपाजचे मुलगे असे: तेमान, ओमार, सपी, गाताम, कनाज. याखेरीज अलीपाज आणि तिम्रा यांना अमालेक नावाचा मुलगा होता.
नहाथ, जेरह, शम्मा, मिज्जा हे रगुवेलचे मुलगे होत.
लोटान, शोबाल, सिबोन, अना, दीशोन, एसर व दीशान हे सेईराचे मुलगे.
होरी आणि होमाम हे लोटानचे मुलगे. लोटानला तिम्ना नावाची बहीणही होती.
आल्यान, मानहाथ, एबाल, शपी आणि ओनाम हे शोबालचे मुलगे. अय्या आणि अना हे सिबोनचे मुलगे.
दीशोन हा अनाचा मुलगा आणि हमदान, एशबान, यित्राण, करान हे दीशोनचे मुलगे.
बिल्हान, जावान, याकान हे एसेराचे मुलगे. ऊस व अरान हे दीशानाचे मुलगे.
इस्राएलमध्ये राजांनी राज्य केले त्याच्या कितीतरी आधी अदोममध्ये राजे होते. त्यांची नावे अशी: बौराचा मुलगा बेला, बेलाच्या नगराचे नाव दीन्हाबा.
बेलाच्या निधनानंतर जेरहचा मुलगा योबाब राजा झाला. योबाब बस्रा येथील होता.
योबाब मरण पावल्यानंतर त्याच्या जागी हूशाम गादीवर आला. हा तेमानी देशातील होता.
हूशामच्या मृत्यूनंतर बदादचा मुलगा हदाद याने राज्य केले. त्याने मवाबच्या देशात मिद्यानचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवीत होते.
हदाद मरण पावल्यावर साम्ला राजा झाला. हा मास्रेका येथील होता.
साम्ला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला. हा युफ्राटीस नदीवरल्या रहोबोथचा होता.
शौल वारल्यावर अकबोरचा मुलगा बाल - हानान राजा झाला.
बाल-हानान नारल्यावर हदाद राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाई असे होते. हदादच्या बायकोचे नाव महेटाबेल. ही मात्रेद हिची मुलगी. मात्रेद मे - जाहाबची मुलगी.
पुढे हदाद वारला. नंतर तिम्रा, आल्या, यतेथ,
अहलीबामा, एला, पीनोन,
कनाज, तेमान मिब्सार, 54माग्दीएल, ईराम, हे अदोमचे नेते झाले.
2
रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून,
दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर हे इस्राएलचे मुलगे होत.
एर, ओनान व शेला, ही यहूदाची मुले. बथ - शूवा या कनानी स्रीपासून ही त्याला झाली. यहूदाचा पहिला मुलगा एर वाईट प्रवृत्तीचा आहे हे परमेश्वराने जाणले होते त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले.
यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे मुलगे झाले. असे यहूदाचे हे पाच मुलगे.
हेस्त्रोन आणि हामूल हे पेरेस चे मुलगे
जेरहला पाच मुलगे होते. ते म्हणजे जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा (दारदा).
जिम्रीचा मुलगा कर्मी. कर्मीचा मुलगा आखार, आखार ने युध्दात बळकावलेल्या वस्तू देवाला अर्पण करण्याऐवजी ती लूट स्वत: जवळच ठेवली. आणि इस्राएल लोकांवर पुष्कळ संकटे आणली.
एथानाचा मुलगा अजऱ्या.
यरहमेल, राम आणि कालेब हे हेस्रोनचे मुलगे.
अम्मीनादाब हा रामचा मुलगा. अम्मीनादाब हा नहशोनचा पिता. नहशोन हा यहूदाच्या लोकांचा नेता होता.
नहशोनचा मुलगा सल्मा. बवाज हा सल्माचा मुलगा.
बवाजचा मुलगा ओबेद. आणि ओबेदचा मुलगा इशाय.
इशायचा मुलगा अलीयाब. अलीयाब हा इशायचा पहिला पुत्र, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा.
चवथा नथनेल, पाचवा रद्दाय.
सहावा ओसेम, सातवा दावीदा.
सरुवा आणि अबीगईल या त्यांच्या बहिणी अबीशय, यवाब आणि असाएल हे तिघे सरुवाचे मुलगे.
अमासाची आई अबीगईल अमासाचे वडील येथेर हे इश्माएली होते.
हेस्रोनचा मुलगा कालेब, यरियोथची मुलगी अजूबा ही कालेबची (बायको.) या दोघांना मुले झाली येशेर, शोबाब आणि अर्देान हे अजूबाचे मुलगे.
अजूबा वारल्यानंतर कालेबने एफ्राथ हिच्याशी लग्र केले. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव हूर.
हूरचा मुलगा उरी. ऊरीचा मुलगा बसलेल.
पुढे, वयाच्या साठाव्या वर्षी हेस्रोनने माखीरच्या मुलीशी लग्न केले. माखीर म्हणजे गिलादचे वडील. हेस्रोन आणि माखीरची मुलगी यांच्या शरीरसंबंधातून तिने सगूब याला जन्म दिला.
सगूबचा मुलगा याईर. याईरची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती.
पण गशूर आणि अराम यांनी ती सर्व बळकावली. कनाथ आणि आसपासची खेडीपाडी ही त्यापैकीच. अशी एकंदर साठ खेडी होती. ती सर्व, गिलादचा बाप माखीर याच्या मुलांची होती.
एफ्राथमधील कालेब येथे हेस्रोन मरण पावला. त्याची बायको अबीया हिला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यापासून झालेला अशहूर हा मुलगा होता. हा अश्हूर म्हणजे तकोवाचा बाप.
यरहमेल हा हेस्रोनचा पहिला मुलगा. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहीया ही यरहमेलची मुले. राम हा त्यातला मोठा.
यरहमेलला दुसरी बायको होती, तिचे नाव अटारा. ती ओनामची आई.
यरहमेलाचा थोरला मुलगा राम याचे मुलगे मास, यामीन आणि एकर हे होत.
शम्मय व यादा हे ओनामचे मुलगे. नादाब आणि अबीशूर हे शम्मयचे मुलगे.
अबीशूराच्या बायकोचे नाव अबीहाईल. त्यांना दोन मुलगे झाले ते म्हणजे अहबान आणि मोलीद.
सलेद आणि अप्पईम हे नादाबचे मुलगे. यापैकी सलेद निपुत्रिकच वारला.
अप्पईमचा मुलगा इशी. इशीचा मुलगा शेशान. शेशानचा मुलगा अहलय.
शम्मयचा भाऊ यादा याला येथेर आणि योनाथान हे दोन मुलगे होते. पैकी येथेर मुले बाळे न होताच वारला.
पेलेथ आणि जाजा हे योनाथानचे मुलगे, ही झाली यरहमेलची वंशावळ.
शेशानला मुलगे नव्हते, फक्त मुली होत्या. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता. त्याचे नाव यरहा.
त्याच्याशी शेशानने आपल्या मुलीचे लग्न लावून दिले. त्यांना मुलगा झाला, त्याचे नाव अत्ताय.
अत्तायास नाथान नावाचा मुलगा झाला. त्याचा मुलगा जाबाद.
जाबादचा मुलगा एफ्लाल, एफलाल हा ओबेदचा बाप.
ओबेदचा मुलगा येहू, येहूचा मुलगा अजऱ्या.
अजऱ्याने हेलसला जन्म दिला. आणि हेलसाने एलासा याला जन्म दिला.
एलासाचा मुलगा सिस्माया, सिस्मायाचा मुलगा शल्लूम,
शल्लूमचा मुलगा यकम्या, यकम्याचा मुलगा अलीशामा.
कालेब हा यरहमेलचा भाऊ. कालेबलाही मुलगे झाले. त्यापैकी मेशा हा थोरला. मेशाचा मुलगा जीफ. मारेशाचा मुलगा जीफ. मारेशाचा मुलगा हेब्रोन.
कोरह, तप्पूर, रेकेम आणि शमा हे हेब्रोनचे मुलगे.
शमाने रहम याला जन्म दिला, रहमचा मुलगा यकर्ाम. रेकेमचा मुलगा शम्मय,
शम्मयचा मुलगा मावोन. मावोन हा बेथसूरचा बाप.
कालेबला एफा नावाची दासी होती. तिला हारान, मोसा, गाजेज ही मुले झाली. हारान हा गाजेजचा पिता.
रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा व शाफ हे यहदायचे मुलगे.
माका ही कालेबची आणखी एक दासी. शेबेर आणि तिऱ्हना हे तिचे मुलगे.
शाफ आणि शवा हे ही तिला झाले. शाफचा मुलगा मद्नान आणि शवाचे मुलगे मखबेना आणि गिबा. अखसा ही कालेबची मुलगी.
कालेबची वंशावळ ही अशी आहे. होर हा कालेबचा थोरला मुलगा. हा एफ्राथला झाला. हूरचे मुलगे पुढीलप्रमाणे: किर्याथ-यारीमाचा संस्थापक शोबाल,
बेथलहेमचा संस्थापक सल्मा आणि बेथ-गादेरचा संस्थापक हारेफ.
किर्याथ-यारीमची मुहूर्त मेढ रोवणारा शोबाल याचे वंशज असे: हारोवे, मनुहोथमथील अर्धे लोक,
आणि किर्याथ-यारीममधील घराणी (कुळे). इथ्री, पूथी, शमाथी आणि मिश्राई ही ती घराणी होत. त्यापैकी मिश्राईपासून सराथी आणि एष्टाबुली हे झाले.
सल्माचे वंशज याप्रमाणे: बेथलेहेम व नटोपाथी, अटरोथ-बेथयवाब, अर्धे मानहतकर आणि सारी लोक.
शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेसमध्ये राहणारी लेखनिकांची घराणी. हे नकलनवीस म्हणजे रेखाबचा संस्थापक हम्माथ याच्यापासून उत्पन्न झालेले केनी लोक होते.
3
दावीदाच्या काही मुलांचा जन्म हेब्रोन नगरात झाला. त्यांची यादी अशी: अम्रोन हा त्यातला थोरला. इज्रेल नगरातील अहीनवाम ही त्याची आई. दानीएल हा दुसरा. कर्मेल यहूदा येथील अबीगईल ही त्याची आई.
तिसरा मुलगा अबशालोम. गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा हा मुलगा. हग्गीथचा मुलगा अदोनीया हा चवथा.
अबीटलचा मुलगा शफाट्या हा पाचवा. दावीदाची पत्नी एग्ला हिचा इथ्रम हा सहावा.
दावीदाच्या या सहा मुलांचा जन्म हेब्रोन येथे झाला. दावीदाने तेथे साडेसात वर्षे राज्य केले. यरुशलेम येथे त्याने तेहतीस वर्षे राज्य केले.
तिथे जन्मलेली दावीदाची मुले खालीलप्रमाणे: बथशूवाला चार मुलगे झाले. बथशूवा अम्मीएलची मुलगी. शिमा, शोबाब, नाथान आणि शलमोन हे तिचे मुलगे.
ही सर्व दावीदाची मुले. दासीपासून झालेले आणखीही मुलगे त्याला होते. तामार ही दावीदाची मुलगी.
शलमोनाचा मुलगा रहाबाम. त्याचा मुलगा अबीया, त्याचा मुलगा आसा. आसाचा मुलगा यहोशाफाट,
त्याचा मुलगा योराम, योरामचा मुलगा अहज्या. अहज्याचा योवाश,
योवाशचा मुलगा अमस्या, अमस्याचा मुलगा अजऱ्या, त्याचा मुलगा योथाम.
योथामचा मुलगा आहाज, त्याचा मुलगा हिज्कीया, त्याचा मुलगा मनश्शे.
मनश्शेचा मुलगा आमोन, आमोनचा योशीया.
योशीयाचे मुलगे: थोरला योहानान, दुसरा यहोयाकीम. तिसरा सिद्कीया, चवथा शल्लूम.
यहोयाकीमचे मुलगे: यखन्या आणि त्याचा मुलगा सिद्कीया.
यखन्याला बाबिलोनमध्ये कैद केल्यानंतर त्याला झालेल्या मुलांची नावे: शलतीएल,
मल्कीराम, पदाया, शेनस्सर, यकम्या, होशामा व नदब्या.
पदायाचे मुलगे याप्रमाणे: जरुब्बाबेल, शिमी. जरुब्बाबेलचे मुलगे मशुल्लाम आणि हनन्या. या दोघांची बहीण शलोमीथ.
जरुब्बाबेलाला आणखीही पाच मुले होती. हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या, यूशब-हेसेद ही ती होत.
पलट्या हा हनन्याचा मुलगा आणि पलट्याचा मुलगा यशया, यशयाचा रफाया, रफायाचा अर्णान. अर्णानचा मुलगा ओबद्या. ओबद्याचा मुलगा शखन्या.
शखन्याचे वंशज याप्रमाणे: शमाया, शमायाला सहा मुलगे: शमाया, हट्टूश, इगाल, बाहीहा, नाऱ्या आणि शाफाट.
नाऱ्याला तीन मुलगे: एल्योवेनय, हिज्कीया आणि अज्रिकाम.
एल्योवेनयला सात मुलगे होते. त्यांची नावे अशी: होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया, अनानी.
4
यहूदाच्या मुलांची नावे अशी: पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर आणि शोबाल.
शोबालचा मुलगा राया: त्याचा मुलगा यहथ. यहथाची मुले अहूमय आणि लहद. सराथी लोक म्हणजे या दोघांचे वंशज होत.
इज्रेल, इश्मा व इद्बाश ही एटामाची मुले. त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी.
पनुएलाचा मुलगा गदोर आणि एजेरचा मुलगा हूशा ही हूरची मुले. हूर हा एफ्राथाचा मुलगा आणि एफ्राथा ही बेथलेहेमची संस्थापक होती.
अशूरचा मुलगा तकोवा. तकोवाला दोन बायका होत्या. हेला आणि नारा.
नाराला अहुज्जाम, हेफेर, तेमनी आणि अहष्टारी हे मुलगे झाले.
सेरथ, इसहार, एथ्रान आणि कोस हे हेलाचे मुलगे.
कोसने आनूब आणि सोबेबा यांना जन्म दिला. हारुमचा मुलगा अहरहेल याच्या घराण्यांचा प्रवर्तकही कोसच होता.
याबेस एक फार चांगला माणूस होता. आपल्या भावांपेक्षा तो भला होता. त्याची आई म्हणे, “याचे नाव याबेस ठेवले कारण याच्यावेळी मला असह्य प्रसववेदना झाल्या.”
याबेसने इस्राएलाच्या देवाची प्रार्थना केली. याबेस म्हणाला, “तुझा माझ्यावर वरदहस्त असू दे. माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढू देत. तू माझ्यासमीप राहा आणि कोणाकडूनही मला इजा पोहोंचू देऊ नकोस. म्हणजे मी सुखरुप राहीन.” देवानेही त्याला त्याने जे मागितले ते दिले.
शूहाचा भाऊ कलूब. कलूबचा मुलगा महीर. महीरचा मुलगा एष्टोन.
बेथ-राफा, पासेहा आणि तहिन्ना ही एष्टोनची मुले. तहिन्नाचा मुलगा ईर-नाहाश. हे रेखा येथील लोक होत.
अथनिएल आणि सराया ही कनाजची मुले. हथथ आणि म्योनोथाय ही अथनिएलची मुले.
म्योनोथायने अफ्राला जन्म दिला. आणि सरायाने यवाबला जन्म दिला. यवाब हा गे-हराशीमचा संस्थापक. तेथील लोक कुशल कारागीर असल्यामुळे त्यांनी हे नाव घेतले.
यफुन्ने याचा मुलगा कालेब. कालेबची मुले म्हणजे इरु, एला आणि नाम. एलाचा मुलगा कनज.
जीफ, जीफा, तीऱ्या आणि असरेल हे यहल्ललेलचे मुलगे.
मरदची बायको ही नहमची बहीण होती. मरदची ही बायको यहूदाकडील होती. मरदच्या बायकोच्या मुलांनी कईला आणि एष्टमोवा यांना जन्म दिला. कईला गार्मी लोकांपैकी होता आणि एष्टमोवा माकाथी होता.
अम्नोन, रिन्ना, बेन - हानान, तिलोन हे शिमोनचे मुलगे. इशीचे मुलगे जोहेथ आणि बेन-जोहेथ.
शेलाचे वंशज हे कुंभार असून ते नेताईम आणि गदेरा येथे राजाच्या चाकरीत होते.
नमुवेल, यामीन, यारिब, जेरह, शौल हे शिमोनचे मुलगे.
शौलचा मुलगा शल्लूम. शल्लूमचा मुलगा मिबसाम. मिबसामचा मुलगा मिश्मा.
मिश्माचा मुलगा हम्मूएल. हम्मूएलचा मुलगा जक्कूर. जक्कूरचा मुलगा शिमी.
शिमीला सोळा मुलगे आणि सहा मुली होत्या. पण शिमीच्या भावांना फार मुले बाळे झाली नाहीत. त्यांची (कुदुंबे) मर्यादितच होती. यहूदातील इतर काही घराण्यांप्रमाणे त्यांचा विस्तार नव्हता.
शिमीच्या वंशजातील लोक बैर-शेबा, मोलादा व हसर-शुवाल,
बिल्हा, असेम, तोलाद,
बथुवेल, हर्मा सिकलाग,
बेथमकर्ाबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराइम येथे राहत होते. दावीदराजा होईपर्यंत त्यांची तेथे वस्ती होती.
एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान ही या पाच गावांची नावे.
बालापर्यंत पसरलेल्या खेड्यापाड्यांमधूनही ते राहत होते. आपल्या वंशावळींची नोंदही त्यांनीच ठेवली.
ते खोऱ्याच्या पूर्वेला गदोरच्या सीमेबाहेरही जाऊन पोहोंचले. आपल्या गुरोमेंढरांना चरायला कुरण हवे म्हणून जमिनीच्या शोधात ते गेले.
त्यांना चांगली गवताळ कुरणे मिळाली. तेथील जमीन विस्तीर्ण होती. ही भूमी शांत व स्वस्थ होती. हामचे वंशज पूर्वी या भागात राहत असत.
हिज्कीया यहूदाचा राजा होता त्यावेळची ही हकीकत. ते लोक गदोरपर्यंत आले आणि हामच्या लोकांशी त्यांनी लढाई केली. हामच्या लोकांच्या राहुट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. तेथे राहणाऱ्या मूनी लोकांनाही त्यांनी ठार केले. आजही या भागात मूनीलोक आढळत नाहीत. तेव्हा या लोकांनी तेथे वस्ती केली. मेंढरांसाठी कुरण असल्याने ते तेथे राहिले.
शिमोनच्या घराण्यातील पाचशे माणसे सेईर डोंगरावर गेली. इशीचे मुलगे पलटया, नाऱ्या, रफाया आणि उज्जियेल यांनी त्यांना मार्गदर्शन केले. शिमोनी लोकांनी त्या ठिकाणी वस्ती असणाऱ्या लोकांशी चकमकी केल्या.
काही अमालेकी लोकांचा त्यातूनही निभाव लागला ते तेवढे अजून आहेत. त्यांना शिमोन्यांनी ठार केले. तेव्हा पासून सेईरमध्ये अजूनही शिमोनी लोक राहत आहेत.
5
रऊबेन इस्राएलाचा थोरला मुलगा होता. तेव्हा थोरल्या मुलाला मिळणारे सगळे विशेषाधिकार त्याला मिळायला हवे होते. पण रऊबेनने आपल्या वडीलांच्या पत्नीशीच शरीरसंबंध ठेवले त्यामुळे हे अधिकार योसेफच्या मुलांना दिले गेले. या घराण्याच्या वंशावळीच्या नोंदीत रऊबेनची थोरला मुलगा म्हणून नोंद नाही. यहूदा आपल्या भावंडांपेक्षा पराक्रमी निघाला म्हणून पुढारीपण त्याच्या घराण्यात गेले. मोठ्या मुलाला मिळायचे ते इतर सर्व अधिकार मात्र योसेफाच्या घराण्याला मिळाले. हनोख, पल्लू, हस्रोन आणि कर्मी हे रऊबेनचे मुलगे.
योएलचे वंशज असे: योएलचा मुलगा शमाया. शमायाचा मुलगा गोग. गोगचा शिमी.
शिमीचा मुलगा मीखा. मीखाचा मुलगा राया. रायाचा मुलगा बाल.
बालचा मुलगा बैरा. अश्शूरचा राजा तिल्गथ-पिल्नेसर याने बैराला आपल्या घरातून पिटाळून लावले. आणि कैद केले. बैरा हा रऊबेनी घराण्याचा अधिकारी पुरुष होता.
योएलचे भाऊ आणि त्यांची त्यांची घराणी यांची नोंद वंशावळींच्या नोंदीवरुनच येथे केली आहे: ईयेल सर्वांत मोठा, मग जखऱ्या
आणि बेला. बेला हा आजाजचा मुलगा. आजाज हा शमाचा मुलगा. शमा योएलचा मुलगा. नबो आणि बाल मौन येथपर्यंत ते अरोएर प्रांतात राहत होते.
फरात नदीच्या जवळ अगदी पूर्वेला वाळवंटाच्या कडेपर्यंत बेलाच्या लोकांची वस्ती होती. गिलाद प्रांतात आपली गाई-गुरे फार झाल्यामुळे त्यांना या बाजूला सरकावे लागले.
शौलच्या कारकीर्दीत बेलाच्या लोकांनी हग्री लोकांशी लढाई करुन त्यांचा पाडाव केला. त्यांच्याच तंबूत बेलाच्या लोकांनी मुक्काम केला. तेथे राहून त्यांनी गिलादच्या पर्वेकडील सर्व प्रदेश पालथा घातला.
रऊबेनी लोकांच्या शेजारीच गाद घराण्यातील लोकांची वस्ती होती. बाशान प्रांतात सलका नगरापर्यंत गाद घराण्यातील लोक राहत होते.
योएल हा बाशान मधला पहिला नायक. शाफाम दुसरा. मग यानयने त्याची जागा घेतली.
मीखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया आणि एबर हे त्यांच्या घराण्यातील सात भाऊ.
हे अबीहईलचे वंशज. अबीहईल हूरीचा मुलगा. हूरी यारोहाचा मुलगा आणि यारोहा गिलादचा. गिलाद मीखाएलचा. मीखाएल यशीशायाचा मुलगा. यशीशाया यहदोचा मुलगा. यहदो बूजाचा मुलगा.
अही हा अब्दीएलचा मुलगा. अब्दीएल गूनीचा मुलगा. अही हा त्या घराण्याचा प्रमुख.
गाद घराण्यातील लोक गिलाद प्रांतात राहत होते. बाशान, बाशानच्या आसपासची खेडी, शारोनच्या आसपासची शिवारे एवढ्या भागात थेट सीमेपर्यंत राहत होते.
योथाम आणि यराबाम यांच्या काळात या लोकांच्या नावांच्या नोंदी गाद वंशावळीमध्ये केल्या गेलेल्या आहेत. योथाम यहूदाचा आणि यराबाम इस्राएलचा राजा होता.
मनश्शेच्या वंशातील अर्धे लोक आणि रऊबेनी व गादी लोकांमधून 44,760 शूर सैनिक युध्दाला सज्ज असे होते. लढाईमध्ये ते प्रवीण होते. ढाली, तलवारी ते बाळगून होते. एवढेच नव्हे तर धनुष्य-बाण चालवणेही त्यांना अवगत होते.
हगरी, यतूर, नाफीश, नोदाब या लोकांशी त्यानी लढाया केल्या.
मनश्शे, रऊबेन आणि गाद वंशातील लोक लढाईच्या वेळी देवाची प्रार्थना करीत. देवावर भरवंसा असल्यामुळे ते मदतीची याचना करीत. देव त्यांना साहाय्य करी. त्यामुळे त्यांना हग्री लोकांचा पराभव करता आला. या लोकांबरोबरच्या इत्तर लोकांचाही त्यांनी पाडाव केला.
50,000 उंट, 2,50,000 शेळ्यामेंढ्या, 2,000 गाढवे आणि 1,00,000 माणसे एवढे त्यांनी हग्री लोकांकडून बळकावले.
बरेच हग्री लोक मारले गेले कारण देवाने रऊबेनींना लढाई जिंकायला मदत केली. यानंतर मनश्शे, रऊबेन आणि गाद लोक हग्री लोकांच्या भूप्रदेशात राहू लागले. बाबिलोन लोकांनी इस्राएलांवर विजय मिळवून त्यांना कैद करुन नेईपर्यंत हे लोक तिथेच राहिले.
बाशानपासून बाल-हर्मेान, सनीर आणि हर्मेान डोंगर येथपर्यंत मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी वस्ती केली. तेथे त्यांची संख्या बरीच वाढली.
मनश्शेच्या अर्ध्या (वंशातील घराण्याचे) प्रमुख पुढीलप्रमाणे: एफेर, इशी, अलीएल, अज्रीएल, यिर्मया, होदव्या, यहदीएल, हे सर्व शूर, वीर आणि नामांकित होते. आपापल्या घराण्यांचे ते प्रमुख होते.
पण आपल्या पूर्वजांनी ज्याची उपासना केली त्या देवाशी त्यांनी गैरवर्तन केले. देवाने ज्यांना नेस्तनाबूत केले होते त्या लोकांच्याच खोट्या देवतांची त्यांनी उपासना केली.
इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल याच्या मनात लढाईवर जाण्याची इच्छा जागवली. पूल म्हणजेच तिल्गथ -पिल्नेसर. त्याने मनश्शे, रऊबेन आणि गाद घराण्यातील लोकांशी लढाई केली. त्यांना त्याने ते होते तिथून हुसकावून लावले आणि कैदी केले. पूलने मग त्यांना हलह, हाबोर, हारा आणि गोजान नदीजवळ आणले. तेव्हा पासून आजतागायत इस्राएलाच्या त्या घराण्यांतील लोक तेथे राहत आहेत.
6
गेर्षेान, कहाथ आणि मरारी हे लेवीचे मुलगे.
अम्राम, इसहार, ईब्रोन आणि उज्जीयेल हे कहाथचे मुलगे.
अहरोन, मोशे, मिर्याम हे अम्रामचे मुलगे. नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे अहरोनचे मुलगे.
एलाजाराचा मुलगा फिनहास, फिनहासचा अबीशूवा.
अबीशूवाचा मुलगा बुक्की. बुक्कीचा मुलगा उज्जी.
उज्जीने जरह्या याला जन्म दिला आणि जरहयाने मरायोथला.
मरायोथ हा अमऱ्या याचा बाप. आणि अमऱ्या अहीटूबचा.
अहीटूबचा मुलगा सादोक. सादोकचा मुलगा अहीमास.
अहीमासचा मुलगा अजऱ्या. अजऱ्याचा मुलगा योहानन.
योहाननचा, मुलगा अजऱ्या (शलमोनाने यरुशलेममध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजऱ्याच याजक होता.)
अजऱ्या याने अमऱ्या याला जन्म दिला. अमऱ्याने अहीटूबला.
अहीटूबचा मुलगा सादोकचा मुलगा शल्लूम.
शल्लूमचा मुलगा हिल्कीया. हिल्कीयाचा मुलगा अजऱ्या.
अजऱ्या म्हणजे सरायाचे वडील. सरायाने यहोसादाकला जन्म दिला.
यहूदा आणि यरुशलेम यांचा परमेश्वराने पाडाव केला तेव्हा यहोसादाकला परागंदा व्हावे लागले. या लोकांना युध्दकैदी म्हणून दुसऱ्या देशात जावे लागले. परमेश्वराने हे सर्व नबुखद्नेस्सरच्या हातून घडवले.
गर्षोम, कहाथ आणि मरारी हे लेवीचे मुलगे.
लिब्री आणि शिमी हे गर्षोमचे मुलगे.
अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जीयेल हे कहाथचे मुलगे.
महली आणि मूशी हे मरारीचे मुलगे. लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. वडलांच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे.
गर्षोमचे वंशज असे: गर्षोमचा मुलगा लिब्नी. लिब्नीचा मुलगा यहथ. यहथया मुलगा जिम्मा.
जिम्माचा मुलगा यवाह. यवाहचा इद्दो. इद्दोचा मुलगा जेरह. जेरहचा यात्राय.
कहाथचे वंशज असे: कहाथचा मुलगा अम्मीनादाब. अम्मीनादाबचा कोरह. कोरहचा मुलगा अस्सीर.
अस्सीरचा मुलगा एलकाना आणि एलकानाचा मुलगा एब्यासाफ. एब्यासाफचा मुलगा अस्सीर.
अस्सीरचा मुलगा तहथ. तहथचा मुलगा उरीएल. उरीएलचा उज्जीया. उज्जीयाचा शौल.
अमासय आणि अहीमोथ हे एलकानाचे मुलगे.
एलकानाचा मुलगा सोफय. सोफयचा मुलगा नहथ.
नहथचा मुलगा अलीयाब. अलीयाबचा यरोहाम. यरोहामचा एलकाना. एलकानाचा मुलगा शमुवेल.
थोरला योएल आणि त्याच्या पाठीवरचा अबीया हे शमुवेलचे मुलगे.
मरारीचे मुलगे याप्रमाणे: मरारीचा मुलगा महली. महलीचा लिब्नी. लिब्नीचा मुलगा शिमी. शिमीचा उज्जा.
उज्जाचा मुलगा शिमा शिमाचा हग्गीया आणि त्याचा असाया.
कराराचा कोश तंबूत ठेवल्यावर दावीदाने परमेश्वराच्या घरात गायनासाठी काही जणांची नेमणूक केली.
पवित्र निवास मंडपात हे लोक गायनसेवा करीत. यरुशलेममध्ये शलमोनाने परमेश्वराचे मंदिर उभारले तोपर्यंत त्यांनी ही सेवा केली. आपल्या कामाच्या नियमानुसार ते वागत.
गायनसेवा करणाऱ्यांची नावे अशी: कहाथ धराण्यातील वंशज: हेमान हा गवई. हा योएलचा मुलगा. योएल शमुवेलचा मुलगा.
समुवेल एलकानाचा मुलगा. एलकाना यरोहामचा मुलगा. यरोहाम अलीएलचा मुलगा. अलीएल तोहाचा मुलगा.
तोहा सूफचा मुलगा. सूफ एलकानाचा मुलगा. एलकाना महथचा मुलगा. महथ अमासयचा मुलगा.
अमासय एलकानाचा मुलगा. एलकाना योएलचा मुलगा. योएल अजऱ्याचा मुलगा. अजऱ्या सफन्याचा मुलगा.
सफन्या तहथचा मुलगा. तहथ अस्सीरचा मुलगा. अस्सीर एव्यासाफचा मुलगा. एव्यासाफ कोरहचा मुलगा.
कोरह इसहारचा मुलगा. इसहार कहाथचा मुलगा. कहाथ लेवीचा आणि लेवी इस्राएलाचा मुलगा.
आसाफ हेमानचा नातलग होता. हेमानच्या उजवीकडे आसाफ उभा राहून सेवा करीत असे. आसाफ हा बरेख्या याचा मुलगा. बरेख्या शिमाचा मुलगा.
शिमा मिखाएलचा मुलगा. मिखाएल बासेया याचा मुलगा. बासेया मल्कीया याचा मुलगा.
मल्कीया एथनीचा मुलगा, एथनी जेरहचा मुलगा जेरह हा अदाया याचा मुलगा.
अदाया एतानाचा मुलगा. एथाना हा जिम्मा याचा मुलगा. जिम्मा शिमीचा मुलगा.
शिमी यहथ याचा मुलगा. यहथ हा गर्षोम याचा मुलगा. गर्षोम लेवीचा मुलगा.
मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा मुलगा. किशी अब्दीचा मुलगा. अब्दी मल्लूखचा मुलगा.
मल्लूख हशब्याचा मुलगा. हशब्या अमस्याचा मुलगा. अमस्या हा हिल्कीया याचा मुलगा.
हिल्कीया अमसीचा मुलगा. अमसी बानीचा मुलगा. बानी शेमर मुलगा.
शेमेर महलीचा मुलगा. महली मूशीचा मुलगा, मूशी मरारीचा मुलगा मरारी हा लेवीचा मुलगा.
हेमान आणि आसाफ यांचे नातलग हे लेवी घराण्यातील होते. मंदिराच्या पवित्र निवासमंडपात काम करायला लेवींची निवड झाली होती. पवित्र निवासमंडप म्हणजे देवाचे घरच.
होम करायच्या आणि धूप जाळायच्या वेदींवर धूप जाळायची परवानगी मात्र फक्त अहरोनच्या वंशजातील लोकांनाच होती. अहरोनचे हे वंशज देवाच्या अत्यंत पवित्र गाभाऱ्यात नेमलेले सर्व काम करत. इस्राएली लोकांना प्रायश्र्चित्त देऊन शुध्द करण्याचे समारंभही ते करत. मोशे याने सांगितलेले नियम आणि विधी ते पाळत. मोशे देवाचा सेवक होता.
अहरोनचे वंशज पुढीलप्रमाणे: अहरोनचा मुलगा एलाजार. एलाजारचा मुलगा फिनहास. फिनहासचा मुलगा अबीशूवा.
अबीशूवाचा मुलगा बुक्की. बुक्कीचा मुलगा उज्जी. उज्जीचा मुलगा जरह्या.
जरह्याचा मुलगा मरायोथ. मरायोथचा मुलगा अमऱ्या. अमऱ्याचा मुलगा अहीटूब.
अहीटूबचा मुलगा सादोक आणि सादोकचा मुलगा अहीमास.
अहरोनचे वंशज राहत त्या ठिकाणांची माहिती अशी. त्यांना दिलेल्या जमिनीवर त्यांनी त्यांच्या वसत्या उभारल्या. कहथ कुटुंबांना त्या जमिनीतील पहिला वाटा मिळाला.
हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासचे शिवार त्यांना मिळाले.
त्यापुढची जागा आणि हेब्रोन नगराजवळची खेडी यफून्नेचा मुलगा कालेब याला मिळाली.
अहरोनच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रयनगर होते. याखोरीज त्यांना लिब्ना, यत्तीर, एष्टमोवा,
हीलेन, दबीर,
आशान, युत्ता, आणि बेथ-शेमेश ही नगरे त्यांच्या आसपासच्या शिवारांसकट मिळाली.
बन्यामीनच्या वंशातील लोकांना गिबा, अल्लेमेथ, अनाथोथ ही नगरे त्यांच्या आसपासच्या शिवारांसकट मिळाली. कहथच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली.
कहथच्या उरलेल्या काही वंशजांना मनश्शेच्या अर्ध्या वंशांतून दहा नगरे मिळाली.
गर्षोमच्या वंशजातील कुळांना तेरा नगरे मिळाली. ही त्यांना इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशान मधील काही मनश्शे या वंशांच्या घराण्यांकडून मिळाली.
मरारीच्या वंशजांतील कुळांना बारा नगरे मिळाली. रऊबेनी, गाद आणि जबुलून यांच्या घराण्यांतून, चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली.
ही नगरे व भोवतालची जमीन इस्राएल लोकांनी मग लेवींना दिली.
यहूदा, शिमोन आणि बन्यामीन यांच्या घराण्यातून, चिठ्ठया टाकून, लेवी वंशजांना ती ती नगरे देण्यात आली.
एफ्राईमच्या वंशजांनी काही नगरे कहाथच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली.
त्यांना शखेम नगर मिळाले. शखेम हे आश्रयनगर होय. गेजेर,
यकमाम, बेथ-होरोन,
अयालोन आणि गथ-रिम्मोन हीही नगरे आसपासच्या जमिनीसकट त्यांना मिळाली. एफ्राईमच्या डोंगराळ भागातील ही गावे होत.
मनश्शेच्या अर्ध्या वंशातून इस्राएलांनी आनेर आणि बिलाम ही गावे शिवारांसकट कहाथच्या वंशाच्या लोकांना दिली.
गर्षोमच्या वंशजांना बाशानमधील गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या शिवारासकट, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले.
गालीलमधले केदेश, हम्मोन, किर्याथाईम ही शिवारासकट नगरे नफतालीच्या वंशातून गर्षोन वंशाला मिळाली.
आता उरलेले लेवी म्हणजे मरारी लोक त्यांना योकनीम, कर्ता, रिम्मोनो आणि ताबोर ही नगरे जबुलूनच्या घराण्याकडून मिळाली. नगराभोवतीची जमिनही अर्थातच मिळाली.
7
स्साखारला चार मुलगे होते. त्यांची नावे अशी: तोला, पुवा, याशूब आणि शिम्मोन.
उज्जी, रकाया, यरीएल, यहमय, इबसाम आणि शमुवेल हे तोलाचे मुलगे. ते सर्व आपापल्या घराण्यातली प्रमुख होते. ते आणि त्यांचे वंशज हे शूर लढवय्ये होते. त्यांची संख्या वाढून दावीदाच्या कारकिर्दीपर्यंत 22,600 इतकी झाली.
इज्रह्या हा उज्जीचा मुलगा. मिखाएल. ओबद्या. योएल आणि इश्शीया हे इज्रह्याचे मुलगे. हे ही आपापल्या घराण्यांचे प्रमुख पुरुष होते.
त्यांच्या घराण्यात 36,000 सैनिक युध्दाला तयार होते असे त्यांच्या वंशावळीच्या नोंदीवरुन दिसते. बायका आणि मुले पुष्कळ असल्यामुळे यांचे घराणे मोठे होते.
इस्साखारच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून 87,000 लढवय्ये होते असे वंशावळींच्या नोंदींवरुन दिसते.
बन्यामीनला तीन मुलगे: बेला, बेकर आणि यदीएल.
बेलाला पाच मुलगे होते: एस्बोन, उज्जी, उज्जीयेल, यरीमोथ आणि ईरी हे ते पाच होत. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यात 22,034 सैनिक होते असे घराण्याच्या नोंदींवरुन दिसते.
जमीरा, योवाश, अलियेजर, एल्योवेनय, अम्री, यरेमोथ, अबीया, अनाथोथ व अलेमेथ हे बेकेर चे मुलगे.
आपापल्या घराण्यांचे प्रमुख कोण ते त्यांच्या वंशावळीच्या नोंदीवरुन कळते. त्यांच्याकडे 20,200 सैनिक होते, हे ही त्यावरुन कळते.
यदीएलचा मुलगा बिल्हान. बिल्हानची मुले, यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर.
यदीएलचे मुलगे हे त्यांच्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे 17,200 सैनिक युध्दाला तयार होते.
शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा मुलगा हुशीम.
यहसिएल, गूनी, येसर आणि शल्लूम हे नफतालीचे मुलगे. हे सर्व बिल्हेचे वंशज.
मनश्शेचे वंशज खालील प्रमाणे: मनश्शे आणि त्याची अरामी दासी यांना अस्रीएल नावाचा मुलगा होता. माखीर हाही आणखी एक मुलगा होता. माखीर म्हणजे गिलादचा बाप.
हुप्पीम आणि शुप्पीम या लोकांपैकी एका बाईशी माखीरने लग्न केले. तिचे नाव माका. माखीरच्या बहिणीचे ही नाव माका होते. या माकाचे दुसरे नाव सलाफहाद होते. हिला फक्त मुलीच झाल्या.
माखीरची बायको माका हिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव पेरेस ठेवले. त्याच्या (माखीरच्या) भावाचे नाव शेरेश. शेरेशचे मुलगे ऊलाम आणि रेकेम.
ऊलामचा मुलगा बदान. हे झाले गिलादचे वंशज. गिलाद हा माखीरचा मुलगा. माखीर मनश्शेचा मुलगा.
माखीरची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर आणि महला हे मुलगे झाले.
अह्यान, शेखेम, लिखी आणि अनीयाम हे शमीदचे मुलगे.
एफ्राईमची वंशावळ पुढीलप्रमाणे. एफ्राईमचा मुलगा शुथेलह एलादा.
एलादाचा मुलगा तहथ. तहथचा मुलगा जाबाद. जाबादचा मुलगा शुथेलह. गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले. कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरे मेंढरे चोरुन नेत होते.
एजेर आणि एलद हे एफ्राईमचे मुलगे होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले.
मग एफ्राईमचा बायकोशी संबंध येऊन त्याची बायको गर्भवती राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. एफ्राईमने या मुलाचे नाव बरीया ठेवले. घरात आधी वाईट घडून गेल्यामुळे त्याने हे नाव ठेवले.
एफाईमच्या मुलीचे नाव शेरा. हिने खालचे आणि वरचे बेथ-होरोन आणि खालचे आणि वरचे उज्जनशेरा ही बांधली.
रेफह हा एफ्राईमचा मुलगा. रेफहचा मुलगा रेशेफ. त्याचा मुलगा तेलह. तेलहचा मुलगा तहन.
तहनचा मुलगा लादान. लादानचा मुलगा आम्मीहूद. आम्मीहूदचा अलीशामा.
त्याचा मुलगा नून आणि नूनचा मुलगा यहोशवा.
एफ्राईमच्या वंशजांची वतने आणि गावे पुढीलप्रमाणे त्या त्या ठिकाणी ते राहत होते: बेथेल व त्याच्या जवळपासची गावे. पूर्वेला नारान; र्पार्मिला गेजेर आणि आसपासची खेडी, शखेम आणि त्याच्या आसपासची खेडी अगदी थेट अय्या व त्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत.
मनश्शेच्या सीमेला लागून असलेली बेथ-शान, तानख, मगिद्दो, दोर ही नगरे व त्यांच्या भोवतालचा प्रदेश एवढ्या भागात इस्राएलचा मुलगा योसेफ याचे वंशज राहत होते.
इम्रा, इश्वा, इश्वी, बरीया हे आशेरचे मुलगे. त्यांची बहीण सेराह.
हेबेर, मालकीएल, हे बरीयाचे मुलगे. मालकीएलचा मुलगा बिर्जाविथ.
यफलेट, शोमर, होथाम हे मुलगे आणि शूवा ही बहीण यांच्या हेबेर हा बाप होता.
पासख, बिह्माल, अश्वथ हे यफलेटचे मुलगे.
अही, राहागा. यहूबा व अराम हे शेमेरचे मुलगे.
शेमेरचा भाऊ हेलेम. त्याचे मुलगे सोफह, इम्ना, शेलेश आणि आमाल.
सोफहचे मुलगे सूहा, हर्नेफेर, शूवाल, बेरी व इम्ना,
बेसेर, होद, शम्मा, शिलशा, इथ्रान, बैरा.
यफुन्ने पिस्पा, अरा हे येथेरचे मुलगे.
आरह, हन्निएल व रिस्या हे उल्लाचे मुलगे.
हे सर्व आशेरचे वंशज. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते गुणसंपन्न शूर योध्दे होते. त्यांच्या वंशावळीच्या नोंदीप्रमाणे 26,000 लढवय्ये पुरुष त्यांच्यात होते.
8
बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आश्बेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा.
चौथा नोहा व पाचवा राफा.
शहरयिमाने मवाबात आपल्या बायका हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्याला दुसऱ्या एका बायकोपासून मुले झाली.
हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे मुलगे झाले.
अह्यो, शाशक, यरेमोथ,
जबद्या. अराद, एदर,
मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे मुलगे.
जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर,
इश्मरय, इज्लीया, योबाब हे एल्पालचे मुलगे.
याकीम, जिख्री, जब्दी,
एलीएनय, सिलथय, अलीएल,
अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे मुलगे.
इश्पान, एबर, अलीएल,
अब्दोन, जिख्री, हानान,
हनन्या, एलाम, अनथोथीया,
इफदया, पनुएल हे शाशकचे मुलगे होत.
शम्शरय, शहऱ्या, अथल्या,
यारेश्या, एलीया, जिख्री हे यरोहामचे मुलगे.
हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. तशी त्यांची वंशावळींमध्ये नोंद आहे. ते यरुशलेम येथे राहत होते.
गिबोनचा बाप यइएल. तो गिबोनमध्ये राहत होता. त्याची बायको माका.
त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब,
गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर मुले.
शिमा हा मिकलोथचा मुलगा. आपल्या यरुशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते.
कीशचा बाप नेर. कीश शौलचा बाप. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा.
योनाथानचा मुलगा मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा बाप.
पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे मुलगे.
यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमाबेथ व जिम्री यांचा बाप होता. जिम्री हा मोसाचा बाप होता.
बिनाचा पिता मोसा. बिनाचा मुलगा राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल.
आसेलला सहा मुलगे होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान.
आसेलचा भाऊ एशेक. त्याचे मुलगे: ज्येष्ठ मुलगा ऊलाम, दुसरा यऊष आणि तिसरा अलिफलेत.
ऊलामचे मुलगे शूर आणि उत्तम धनुर्धर होते. त्यांची वंशवेल चांगली विस्तारली. मुले, नातवंडे मिळून 150 जण होते. हे सर्व बन्यामीनचे वंशज.
9
इस्राएलच्या सर्व लोकांची नोंद वंशावळ्यांमध्ये केलेली आहे. इस्राएलच्या राजाचा इतिहास या पुस्तकात ती ग्रंथित केलेली आहे. देवाशी एकनिष्ठ न राहिल्याने यहूदाच्या लोकांना बाबेल येथे कैद करुन नेण्यात आले.
त्यापैकी जे सगळ्यात आधी आपल्या, गावात येऊन राहिले ते म्हणजे इस्राएल लोक याजक, लेवी आणि मंदिरातील कामकरी वर्ग.
यरुशलेममध्ये राहणाऱ्या यहूदा, बन्यामीन, एफ्राईम आणि मनश्शे घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे:
ऊथय हा अम्मीहूदचा मुलगा. अम्मीहूद हा अम्रीचा मुलगा. अम्री इम्रीचा मुलगा. इम्री बानीचा मुलगा. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहूदाचा मुलगा.
यरुशलेममध्ये राहणारे शिलोनी लोक असे: ज्येष्ठ पुत्र असाया आणि त्याचे मुलगे.
यरुशलेममधील जेरह चे वंशज म्हणजे यऊवेल आणि त्याचे एकंदर 690 भाऊबंद.
यरुशलेममधील बन्यामीन घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे: सल्लू हा मशुल्लामचा मुलगा. मशुल्लाम होदव्याचा मुलगा. होदवा हस्सनुवाचा मुलगा.
इबनया हा यरहोरामचा मुलगा. एला उज्जीचा मुलगा. उज्जी मिख्रीचा मुलगा. मशुल्लाम शफाटयाचा मुलगा. शफाटया रगुवेलचा मुलगा रगुवेल इबनीया याचा मुलगा.
यरुशलेममधील याजक पुढीलप्रमाणे: यदया, यहोयारीब, याखीन,
अजऱ्या. अजऱ्या हा हिल्कीयाचा मुलगा. हिल्कीया मशुल्लामचा मुलगा. मशुल्लाम सादोकचा. सादोक मरायोथचा आणि मरायोथ अहीटूबचा मुलगा. अहीटूब हा देवाच्या मंदिरावरील प्रमुख अधिकाही होता.
यहोरामचा मुलगा अदाया होता. यहोराम हा पशहूरचा मुलगा. पशहूर मल्कीयाचा, आणि अदीएलचा मुलगा मसय. अदीएल यहजेराचा मुलगा, यहजेरा मशुल्लामचा मुलगा, मशुल्लेम मशिल्लेमीथचा, मशिल्लेमीथ इम्मेराचा मुलगा.
असे एकंदर 1,760 याजक होते. ते आपापल्या घराण्यांचे मुख्य होते. देवाच्या मंदिरातील सेवेच्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर होती.
यरुशलेममधील लेवी घराण्यातले लोक याप्रमाणे: हश्शूबचा मुलगा शमाया. हश्शूब अज्रीकामचा मुलगा. अज्रीकाम हशब्याचा मुलगा. हशब्या हा मरारीच्या वंशातला.
याखेरीज बकूबकर, हेरेश, गालाल आणि मतन्या हे ही यरुशलेममध्ये राहत होते. मतन्या मीखाचा मुलगा. मीखा जिख्रीचा मुलगा. जिख्री आसाफचा मुलगा.
ओबद्या शमाया याचा मुलगा. शमाया गालालचा मुलगा. गालाल यदूथूनचा मुलगा. याखेरीज आसा याचा मुलगा बरेख्या हाही तेथे राहत होता. आसा एल्कानाचा मुलगा. एल्काना हा नटोफाथी लोकांच्या जवळच्या छोट्या गावांमध्ये राहत होता.
यरुशलेममधील द्वाररक्षक पुढीलप्रमाणे: शल्लूम, अक्कूब, टल्मोन, अहीमान आणि त्यांचे नातलग. शल्लूम हा त्यांच्यावरचा मुख्य.
हे लोक आता राजाच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वारापाशी उभे असतात. हे लेवीच्या वंशातले होते.
शल्लूम हा कोरे याचा मुलगा. कोरे हा एब्यासाफचा मुलगा. एब्यासाफ कोरहचा मुलगा. शल्लूम आणि त्याचे भाऊबंद हे द्वारपाल होते. ते कोरहच्या वंशातले होते. पवित्र निवासमंडपाच्या द्वाररक्षणाचे काम त्यांच्याकडे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच ते हे काम पार पाडत होते. त्यांच्या पूर्वजांकडेही हीच जबाबदारी होती.
पूर्वी फिनहास द्वारपालाचा प्रमुख होता. फिनहास हा एलाजारचा मुलगा. परमेश्वर फिनहासचा पाठीराखा होता.
जखऱ्या पवित्र निवासमंडपाचा द्वारपाल होता.
पवित्र निवासमंडपाचे रक्षण करणारे असे एकंदर 292 निवडक द्वाररक्षक होते. आपापल्या गावांच्या वंशावळ्यांमध्ये त्यांची नावे लिहिलेली आहेत. त्यांचा विश्वासूपणा पाहून दावीद आणि शमुवेल संदेष्टा यांनी त्यांची नेमणूक केली होती
परमेश्वराच्या मंदिराच्या, पवित्र निवासमंडपाच्या प्रवेशद्वारांवर राखण करण्याची जबाबदारी या द्वारपालांची आणि त्यांच्या वंशजांची होती.
पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशी चार दिशांना प्रवेशद्वारे होती.
आसपासच्या गावांमध्ये राहणारे द्वारपालांचे नातेवाईक वेळोवेळी त्यांच्या मदतीला येत. आले की सलग सात दिवस मदतीला राहत.
या सर्व द्वारपालांचे नायकत्व चार लेवी द्वारपालांकडे होते. देवाच्या मंदिरातील खोल्या आणि खजिना यांची जपणूक करण्याचे काम त्यांचे होते.
देवाच्या मंदिरावर पहारा करत ते रात्रभर जागे राहत. दररोज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडण्याचे काम त्यांच्याकडे होते.
मंदिरात वापरायच्या पात्रांची देखभाल काही द्वारपाल करत. ती पात्रे बाहेर काढताना आणि पुन्हा आत ठेवताना ते ती मोजून ठेवत.
लाकडी सामान, विशेष उपकरणे यांच्यावर इतर काही द्वारपाल नेमलेले होते. पीठ, द्राक्षारस, तेल, धूप, सुवासिक द्रव्य यांच्यावरही
त्यांचीच देखरेख होती. हे सुवासिक द्रव्य सिध्द करण्याचे काम याजकांचे होते.
अर्पणाच्या भाकरी भाजण्याच्या कामगिरीवर मत्तिथ्या नावाचा लेवी होता. मत्तिथ्या हा शल्लूमचा थोरला मुलगा. शल्लूम कोरा कुटुंबातील होता.
कोरा कुटुंबातील काही द्वार रक्षकांना शब्बाथच्या दिवशी मेजावर मांडायचा पाव तयार करण्याचे काम सोपवलेले होते.
लेर्वीपैकी जे घराण्यांचे प्रमुख आणि गायक होते ते मंदिरातील खोल्यांत राहत असत. मंदिरातील कामाची जबाबदारी रात्रंदिवस त्यांच्यावर असल्याने अमुकच असे काम त्यांच्यावर सोपवलेले नव्हते.
हे सर्व लेवी आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. तशी वंशावळ्यांमध्ये नोंद आहे. ते यरुशलेममध्ये राहत असत.
ईयेल म्हणजे गिबोनचे वडील. ईयेल गिबोन मध्येच राहत होता. त्याच्या बायकोचे नाव माका.
ईयेल्या ज्येष्ठ मुलाचे नाव अब्दोन. सूर, कीश, बाल, नेर आणि नादाब त्याची आणखी मुले.
शिवाय गदोर, अह्यो, जखऱ्या आणि मिकलोथ ही त्याचीच मुले.
मिकलोथने शिमामला जन्म दिला. ईयेलचे कुटुंब यरुशलेममध्ये आपल्या भाऊबंदाजवळच राहत होते.
नेर हे कीशाचे वडील. कीश शौलाचे वडील. योनातान, मलकी शुवा, अबीनादाब आणि एश्बाल ही शौलची मुले.
मरीब्बाल हा योनाथानचा मुलगा. मीखा हा मरीब्बालाचा मुलगा.
पीथोन, मेलेख आणि तरहेया हे मीखाचे मुलगे.
आहाजने यारा याला जन्म दिला. आलेमेथ, अजमावेथ आणि जिम्रीयांना याराने जन्म दिला. जिम्रीने मोसा याला जन्म दिला.
मोसाचा मुलगा बिना. बिनाचा मुलगा रफाया. रफायाचा मुलगा एलासा आणि एलासाचा मुलगा आसेल.
आसेलला सहा मुलगे झाले. त्यांची नावे अशी: अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या आणि हानान. ही झाली आसेलची मुले.
10
पलिष्टी इस्राएल लोकांशी लढले. इस्राएल लोकांनी पळ काढला. गिलबोवा डोंगरात बरेच इस्राएल लोक मारले गेले.
पलिष्ट्यांनी शौल आणि त्याचे मुलगे यांचा पाठलाग चालूच ठेवला. त्यांना पकडले आणि ठार केले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या शौलच्या मुलांना पलिष्ट्यांनी मारले.
शौलाच्या त्यांनी तीव्र मारा केला. धनुष्यबाणांनी वेध घेऊन त्याला सैन्याने जायबंदी केले.
तेव्हा आपल्या शस्त्रवाहकाला शौल म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि ती माझ्यावर चालव. नाहीतर हे उपरे येऊन माझी विटंबना करतील.” पण शौलाच्या या शस्त्रवाहकाचा धीर झाला नाही. त्याने शौलाला मारण्यास नकार दिला. तेव्हा शौलाने स्वत:ची तलवार स्वत:ला मारण्यासाठी वापरली. तो स्वत:तलवारीच्या टोकावर पडला.
शौल मरण पावलेला पाहून शस्त्रवाहाकाने तलवार उपसून त्यावर पडला व स्वत:चा जीव घेतला.
अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन मुलगे यांना मरण आले. शौलाच्या कुटुंबाला एकदमच मृत्यू आला.
आपल्या सैन्याने पळ काढला आहे. तसेच शौल आणि त्याचे मुलगे मेले हे खोऱ्यात राहणाऱ्या इस्राएल लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनीही आपली घरेदारे सोडून पळ काढला. इस्राएल लोकांनी सोडलेल्या त्या नगरामध्ये पलिष्टी आले आणि तेथेच राहू लागले.
दुसऱ्या दिवशी हे पलिष्टी मृतांच्या अंगावरील मौल्यवान चीजवस्तू लुटायला आले. तेव्हा गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याचे मुलगे यांचे मृतदेह सापडले.
शौलाच्या देहावरील वस्तू त्यांनी घेतल्या. त्याचे मस्तक आणि चिलखत लांबवले. हे वर्तमान आपल्या दैवतांना आणि लोकांना कळवायला त्यांनी देशभर दूत रवाना केले.
पलिष्ट्यांनी शौलाचे चिलखता आपल्या देवळात आणि शिर दागोनच्या देवळात टांगले.
पलिष्ट्यांच्या या कृत्याची वार्ता याबेश गिलाद नगरातील लोकांच्या कानावर गेली.
तेव्हा त्यांच्यातील शूर माणसे शौल आणि त्याची मुले यांचे मृतदेह आणायला निघाली. ते मृतदेह त्यांनी याबेश गिलाद येथे आणले. तेथे एका मोठ्या वृक्षाखाली त्यांनी त्यांच्या अस्थी पुरल्या आणि सात दिवस उपवास केला.
परमेश्वराशी प्रामाणिक नसल्याने शौलाला मरण आले. शौलाने परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले.
शिवाय परमेश्वराला विचारण्याऐवजी भूतविद्या जाणणाऱ्या बाईकडे जाऊन त्याने सल्ला विचारला. म्हणून परमेश्वराने शौलाला मृत्युदंड दिला आणि इशायाचा मुलगा दावीद याला राज्य दिले.
11
सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दावीदाकडे जमले. ते त्याला म्हणाले, “आम्ही तुझे भाऊबंद आहोत, तुझ्याच रक्तामांसाचे आहोत.
पूर्वी लढाईत तू आमचे नेतृत्व केले आहेस. शौल राजा असतानाही तू ते केले आहेस. परमेश्वर तुला म्हणाला, ‘दावीदा, तू माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होशील. माझ्या लोकांचे नेतृत्व करशील.”‘
इस्राएल लोकांमधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाकडे हेब्रोन येथे आली. परमेश्वरासमोर दावीदाने त्यांच्याशी करार केला. तेव्हा त्या पुढाऱ्यांनी दावीदास अभिषेक केला. आता दावीद इस्राएलाचा राजा झाला. शमुवेल मार्फत परमेश्वराने असे होणार असे वचन दिले होते.
सर्व इस्राएल लोकांबरोबर दावीद यरुशलेम नगराकडे गेला. यरुशलेमला त्याकाळी यबूस असे म्हणत असत; आणि तेथे राहणाऱ्यांना यबूसी. ते नगरवासी
दावीदाला म्हणाले, “तू आमच्या नगरात पाऊल टाकू शकणार नाहीस.” तरीही दावीदाने त्यांचा पाडाव केलाच. दावीदाने सियोनचा किल्ला घेतला. यालाच दावीदानगर हे नाव पडले.
दावीद म्हणाला, “यबूसी लोकांवरील हल्ल्याचे जो नेतृत्व करील तो माझा सेनापती होईल.” यवाबने हे नेतृत्व केले. हा सरुवेचा मुलगा. यवाब सेनापती झाला.
दावीदाने किल्ल्यातच आपला मुक्काम केला म्हणून त्याला दावीद नगर नाव पडले.
या किल्ल्याभोवती दावीदाने नगराची उभारणी केली. मिल्लो पासून नगराच्या तटबंदीपर्यंत त्याने ते बांधले. जेथे पडझड झाली होती तिथे दुरुस्ती केली.
दावीदाच्या मोठेपणात भर पडत गेली. सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता.
दावीदाच्या, खास सैनिकांच्या पुढाऱ्यांची नावे या यादीत आहेत. दावीदाच्या राज्यात त्यांचेही बळ वाढले. त्यांनी आणि समस्त इस्राएल लोकांनी दावीदाला पाठिंबा दिला आणि त्याला राजा केले. देवाने कबूल केल्याप्रमाणेच हे घडले.
दावीदाकडील खास सैनिकांची नावे अशी : याशबाम हखमोनी. हा रथचालकांचा प्रमुख होता. याशबाम एकावेळी तीनशे जणांना आपल्या भाल्याने ठार करु शकत असे.
त्यानंतर दोदय अहोही याचा मुलगा एलाजार. एलाजार तिघा पराक्रमींपैकी एक होता.
पसदम्मीम येथे हा दावीदाबरोबर होता. पलिष्टे त्या ठिकाणी लढायला आले होते. तेथे शेतात जवाचे पीक उभे होते. इस्राएल लोक तेव्हा पळून गेले.
पण तीन शूर वीर तिथेच पाय रोवून उभे राहिले आणि त्यांनी बचाव करायचा प्रयत्न केला. पलिष्ट्यांचा त्यांनी पराभव केला. परमेवराने इस्राएल लोकांना मोठा विजय मिळवून दिला.
एकदा, दावीद अदुल्लामच्या गुहेत होता. पलिष्ट्यांचे सैन्य तिथून खाली रेफाईमच्या खोऱ्यात होते. त्यावेळी तीस वीरापैकी तिघेजण गुहेत असलेल्या दावीदाकडे जायला जमिनीवरुन सरपटत रांगत निघाले.
आणखी एकदा दावीद किल्ल्यांत असताना पलिष्ट्यांचे सैन्य बेथलहेममध्ये होते.
तेव्हा आपल्या गावचे पाणी प्यावे असे दावीदाला फार वाटले. तो म्हणाला, “बेथलहेमच्या वेशीजवळ विहीर आहे तिच्यातले पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे होईल.” त्याला पाणी हवे होते असे नाही पण तरी तो हे म्हणाला.
यावर त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीतून मोठ्या हिकमतीने वाट काढली, बेथलहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतील पाणी काढले आणि ते त्या तिघांनी दावीदाला आणून दिले. दावीदाने ते पाणी प्यायला नकार दिला. त्याने ते जमिनीवर ओतून परमेश्वराला अर्पण केले.
दावीद म्हणाला, “देवा, हे पाणी मी कसे पिऊ? हे मी प्यायलो तर ते इथपर्यंत आणायला ज्यांनी आपला जीव धोक्यात घातला त्यांचे रक्तच प्यायल्यासारखे होईल.” त्याने ते पाणी न प्यायचे कारण हे होय. त्या तीन शूरांनी असे बरेच पराक्रम केले.
यवाबचा भाऊ अबीशय हा या तिघांचा प्रमुख होता. त्याने आपल्या भाल्याने तीनशे जणांचा प्रतिकार केला आणि त्यांना ठार केले. अबीशय त्या तिघांएवढाच प्रसिध्द होता.
त्या तीन शूरांपेक्षा जास्त याने नाव कमावले. तो त्या तिघामधला नसला तरी त्यांचा नायक झाला.
यहोयादा हा एका बलाढ्य माणसाचा मुलगा होता. यहोयादाचा मुलगा बनाया. हा कबसेल येथला होता. बनायाने खूप पराक्रम केले. मवाबातील दोन अग्रगण्य माणसांना त्याने ठार केले. एकदा बर्फ पडत असताना गुहेत शिरुन त्याने सिंहाचा वध केला.
मिसरच्या एका मजबूत सैनिकालाही त्याने मारले. हा सैनिक साडेसात फूट उंचीचा होता. त्याच्याजवळ चांगला लांब आणि भक्कम भाला होता. विणकराच्या मागावरील तुळईएवढा हा भाला होता. बनायाजवळ फक्त गदा होती. बनायाने त्या सैनिकाच्या हातून भाला हिसकावून घेतला आणि त्यानेच त्या मिसर सैनिकाला ठार केले.
यहोयादाचा मुलगा बनाया याने असे बरेच पराक्रम केले. तीन शूरांप्रमाणेच त्याने नाव मिळवले.
तीस शूरांपेक्षा बनायाचा बोलबाला जास्त झाला. पण तो त्या तिघांपैकी नव्हता. दावीदाने बनायाला आपल्या अंगरक्षकांचे प्रमुख म्हणून नेमले.
सैन्यातील शूर सैनिक (तीस वीर) पुढीलप्रमाणे: यवाबचा भाऊ असाएल, बेथलेहेमच्या दोदोचा मुलगा एलहानान,
हरोरी शम्मोथ, हेलस पलोनी,
तकोइच्या इक्केशचा मुलगा ईरा, अनाथोथचा अबियेजेर
शिब्बखाय हूशाथी, ईलाय अहोही,
महरय नटोफाथी, बाना नटोफाथी याचा मुलगा हेलेद,
बन्यामीनांच्या संतानांमधला गिबोथकर रीबय याचा मुलगा इत्तय, बनाया पिराथोनी,
गाशच्या झऱ्यांजवळचा हूरय, अबीएल अर्बाथी,
अजमावेथ बहरुमी, अलीहबा शालबोनी,
हामेश गिजोनी याचे मुलगे, शागे हरारी याचा मुलगा योनाथान,
साखार हरारी याचा मुलगा अहीयाम, ऊरचा मुलगा अलीफल,
हेफेर मखेराथी, अहीया पलोनी,
हेस्त्री कर्मेली, एजबयचा मुलगा नारय,
नाथानचा भाऊ योएल, हग्रीचा मुलगा मिभार,
सेलक अम्मोनी, सरुवेचा मुलगा यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी,
ईरा, इथ्री, गारेब, इथ्री,
उरीया हित्ती, अहलयाचा मुलगा जाबाद,
शीजा रउबेनी याचा मुलगा अदीना हा रउबेन्यांचा अधिकारी व तीस शूरांपैकी एक,
माकाचा मुलगा हानान आणि योशाफाट मिथनी,
उज्जीया अष्टराथी, होथाम अरोएरी याचे मुलगे शामा ईयेल
शिम्रीचा यदीएल योहा तीसी आणि त्याचा भाऊ योहा
अलीएल महवी व एलानामचे मुलगे यरीबय आणि योशव्या व इथ्मा मवाबी,
अलीएल, ओबेद न यासीएल मसोबायी.
12
दावीद सिकलागला असताना त्याच्याकडे आलेल्यांची ही यादी. दवीद तेव्हा कीशचा मुलगा शौल याच्या भयाने लपून राहत होता. या लोकांनी दावीदाला लढाईत मदत केली.
धनुष्यबाण चालवणे किंवा गोफणगुंडा मारणे या गोष्टी ते डाव्या उजव्या दोन्ही हातांनी सराईतपणे करीत. बन्यामीनच्या वंशात जे शौलचे नातेवाईक होते त्यांच्यापैकी हे होत. त्यांची नावे अशी:
अहीएजर हा त्याच्यांतला प्रमुख. मग योवाश (गिबा येथील शमा याचे हे मुलगे) त्यानंतर यजिएल आणि पलेट. हे अजमावेथ याचे मुलगे. अनाथोच येथील बराका व येहू.
गिबोन येथील इश्माया (हा तीन वीरांपैकी एक आणि त्या तीन वीरांचा प्रमुख.) गदेराथ लोकामधून यिर्मया, यहजिएल, योहानान आणि योजाबाद.
एलूजय, यरीमोथ, बाल्या, शमऱ्या, हरुफी शफट्या
एलकाना, इश्शीया, अजरेल, योबेजर आणि याशबाम हे कोरही,
तसेच यहोहाम गदोरी याचे मुलगे योएला आणि जबद्या.
गादी यांच्यातील काही लोक दावीदाकडे तो वाळवंटातील गढीत असताना आले. ते चांगले शूर लढवय्ये होते. ढाल वापरणे, भालाफेक यात ते वाकबगार होते. ते सिंहासारखे उग्र आणि डोंगरातल्या हरणासारखे चपळ होते.
गाद वंशातील एजेर हा सैन्याचा प्रमुख होता. ओबद्या दुसरा, अलीयाब तिसरा.
मिश्मन्ना चवथा क्रमाकांवर तर यिर्मया पाचव्या वर होता.
अत्तय सहावा, एलीएल सातवा,
योहानन आठवा, एलजाबाद नववा,
यिर्मया दहावा, मखबन्नय अकरावा.
हे गादी सैन्यातील सरदार होते. त्यांच्यातला कनिष्ठसुध्दा शत्रूच्या शंभर जणांना भारी होता आणि त्यांच्यातला खंदा वीर हजाराच्या सैन्याशी एकटा लढू शकत असे.
गादच्या घराण्यातील हेच सैनिक, वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी पार करुन गेले. नदीला तेव्हा पूर आलेला होता. खोऱ्यात राहणाऱ्या लोकांना त्यांनी पार पूर्वेला आणि पश्र्चिमेला पळवून लावले.
बन्यामिन आणि यहूदा वंशातील लोकही दावीदाला गढीत येऊन मिळाले.
दावीदाने त्यांचे स्वागत केले व त्यांना तो म्हणाला, “मला मदत करायला तुम्ही सद्भावनेने आला असाल तर तुमचे स्वागत असो. तुम्ही माझ्याकडे या पण माझ्या हातून काही अपराध झालेला नसताना कपट करायला आला असलात तर आमच्या पूर्वजांचा देव ते पाहून तुम्हाला शासन करो.”
अमासय हा तीस वीरांचा सरदार होता. त्याच्यात परमेश्वरी आत्म्याचा साक्षात्कार झाला आणि तो म्हणाला, “दावीदा, आम्ही तुझ्या बाजूचे आहोत इशायाच्या मुला, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत शांती असो! तुला साहाय्य करणाऱ्यांनाही शांती असो. कारण देव तुझा पाठीराखा आहे.” तेव्हा दावीदाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आणि त्यांना सैन्याचे अधिकारी केले.
मनश्शेच्या वंशातील काहीजणही दावीदाला येऊन मिळाले. दावीद पलिष्टंयाबरोबर शौलाशी लढायला गेला तेव्हा ते आले. पण दावीदाने आणि त्याच्या सैन्याने पलिष्ट्यांना फारशी मदत केली नाही. पलिष्ट्यांच्या पुढाऱ्यांनी दावीदाची मदत घेण्याचा विचार केला पण मग त्यांनी त्याला परत पाठवले. त्यांनी विचार केला, “दावीद जर आपला स्वामी शौल याच्याकडे परत गेलाच तर आपला शिरच्छेद होईल.”
दावीद सिक्लागला गेला. त्याच्या बरोबर आलेले मनश्शेचे लोक याप्रमाणे: अदनाह, योजाबाद, यदीएल, मीखाएल, योजाबाद, अलीहू, आणि सिलथय. हे सर्व मनश्शे वंशातील सरदार होते.
लुटारुंना तोंड द्यायला त्यांनी दावीदाला मदत केली. या लुटारुंच्या टोळ्या देशभर लोकांना त्रस्त करत होत्या. मनश्शे वंशातील लोक मात्र शूर होते. दावीदाच्या सैन्यात ते अधिकारपदावर चढले.
दावीदाच्या मदतीला येणाऱ्यांत रोजच्यारोज भर पडत गेली. त्यामुले त्याचे सैन्य वरचढ होत गेले.
हेब्रोन नगरात दावीदाकडे आणखी बरेच लोक आले. ते लढाईला तयार होते. शौलचे राज्य त्यांना दावीदाला द्यायचे होते. असे घडणार हे परमेवराने सांगितलेच होते. त्या लोकांची संख्या अशी:
यहूदाच्या घराण्यातील 6,800 हत्यारबंद सैनिक ढाल आणि भाले यांसह ते सज्ज होते.
शिमोनच्या कुळातून 7,100 जण लढाईला तयार असे शूर सैनिक होते.
लेवीच्या कुळातून 4,600 जण.
यहोयादा यांच्यात होता. हा अहरोनच्या घराण्याचा पुढारी होता. यहोयादाबरोबर 3,700 चे सैन्य होते.
सादोक ही त्यांच्यात होता. तो तरुण लढवय्या होता. आपल्या घराण्यातील बावीस सरदार त्याने बरोबर आणले.
बन्यामीनच्या वंशातील 3,000 जण होते. ते शौलचे नातेवाईक होते. तो पर्यंत ते बहुतेक शौलच्या घराण्याशी एकनिष्ठ होते.
एफ्राइमच्या घराण्यातील 20,800 शूर सैनक ते सर्व आपापल्या कुळात नावाजलेले होते.
मनश्शेच्या वंशातील निम्मे म्हणजे 18,000 लोक आले. दावीदाला राजा करण्यासाठी म्हणून त्यांना नावानिशी बोलवून आणले होते.
इस्साखारच्या घराण्यातील 200 जाणती, जबाबदार माणसे आली. इस्राएलने केव्हा काय करणे योग्य आहे याचे त्यांना चांगले भान होते. त्यांचे भाऊबंद त्यांच्या सोबत, त्यांच्या आज्ञेत होते.
जबुलून घराण्यातले 50,000 अनुभवी सैनिक तयार होते. सर्व शस्त्रे ते कुशलतेने हाताळू शकत. दावीदाशी ते एकनिष्ठ होते.
नफतालीच्या घराण्यातून 1,000 सरदार आले. त्यांच्याबरोबर ढाली आणि भाले बाळगणारे 37,000 लोक होते.
दानच्या वंशातून 28,000 जण युध्दाला तयार होते.
आशेर मधले 40,000 सैनिक युध्दावर जायला तयार असे होते.
यार्देन नदीच्या पूर्वेकडील रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशातील 1,20,000 लोक सर्व प्रकारच्या हत्यारांसह सज्ज होते.
हे सर्व जण पराक्रमी होते. दावीदाला इस्राएलचा राजा करायचे याबाबतीत इतर इस्राएल लोकांची एकवाक्यता होती. म्हणूनच ते हेब्रोन येथे एकत्र आले. इस्राएलमधील इतर लोकांचीही दावीदाने राजा व्हावे हीच इच्छा होती.
या लोकांनी हेब्रोन येथे दावीद बरोबर तीन दिवस घालवले. खाद्यपेयांचा आस्वाद घेतला कारण त्यांच्या नातलगांनी सर्व सिध्दता केली होती.
याखेरीज इस्साखार, जबुलून, नफताली अशा आसपासच्या भागात राहणाऱ्यांनी गाढंब, उंट, खेचरं, गुंरं यांच्या पाठीवर लादून अनेक खाद्यपदार्थ आणले. कणीक, अंजीराच्या ढेपा, मनुका, द्राक्षारस, तेल, गुरे - मेंढरे असे बरेच काही आणले. इस्राएलमध्ये आनंदीआनंद पसरला होता.
13
दावीद आपल्या सैन्यातील अधिकाऱ्यांशी बोलला.
मग दावीदाने इस्राएलमधील सर्व लोकांना एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “तुम्हाला जर हे योग्य वाटत असेल आणि परमेश्वराचीही ती इच्छा असेल तर इस्राएलच्या सर्व भागात पसरलेल्या आपल्या बांधवांसाठी आपण एक संदेश पाठवू. आपापल्या नगरांत आणि खेड्यांत त्यांच्याबरोबर जे याजक आणि लेवी आहेत त्यांनाही आपण निरोप पाठवू. त्या सर्वांना आपण इकडे यायला सांगू.
आपला करारकोश आपण पुन्हा यरुशलेममध्ये आणू. शौल राजा असताना आपण करारकोशाची नीट देखभाल केलेली नाही.”
दावीदाच्या या बोलण्याशी सर्व इस्राएल लोक सहमत झाले. सर्वाना त्याचे म्हणने पटले.
मिसरमधील शीहोर नदीपासून लेबो हामाथच्या प्रवेशापर्यंत पसरलेल्या सर्व इस्राएल लोकांना मग दावीदाने एकत्र केले. किर्याथ यारीमहून हा कोश आणण्यासाठी ते सर्व जमले.
किर्याथ-यारीम म्हणजेच यहूदातील बाला येथे दावीदासह सर्व इस्राएली पोचले. करारकोश म्हणजे करुबांवरती राहणाऱ्या परमेश्वराचा करार कोश. तो आणावा म्हणून ते आले.
लोकांनी अबीनादाबच्या घरातून हा करारकोश हलवला. तो नव्या गाडीवर चढवला. उज्जा आणि अह्यो हे दोघेजण ही गाडी हाकत होते.
दावीद आणि इस्राएल लोक देवापुढे जल्लोष करत चालले. देवाची स्तुतिगीते गात, वीणा, सतार, डफ झांजा, कर्णे इत्यादी वाद्ये वाजवत ते चालले होते.
किदोनच्या खळ्यापर्यंत ते पोचले. तेव्हा गाडी ओढणारे बैल जरा अडखळले. त्यामुळे करारकोश अगदी पडायला आला. तेवढ्यात उज्जाने कोशाला हात दिला.
परमेश्वराचा उज्जावर कोप झाला. उज्जाने कोशाला हात लावला म्हणून देवाने त्याला ठार केले. उज्जा तत्क्षणी देवासमोर मरण पावला.
देवाने उज्जावर असा राग काढावा याचे दावीदाला वाईट वाटले. तेव्हा पासून आजतागायत त्या ठिकाणाचे नाव “पेरेस-उज्जा” असे आहे.
दावीदाला त्यादिवशी देवाची धास्ती वाटली. दावीद म्हणाला, “आपल्या इथे मी परमेश्वराचा कोश कसा आणू?”
त्यामुळे त्याने दावीदानगराला तो करारकोश आणला नाही. तेथेच त्याने करार कोश ओबेद-अदोम याच्या घरी नेला. ओबेद-अदोम हा गथ नगरातील होता.
हा करारकोश त्याच्या घरात तीन माहिने होता. ओबेद-अदोमच्या घराला आणि त्याचे जे काही होते त्या सगळ्याला परमेश्वराने आपले आशीर्वाद दिले.
14
हिराम सोराचा राजा होता. त्याने दावीदाकडे दूत पाठवले. याखेरीज त्याने गंधसरुचे ओंडके, गवंडी, सुतार हे देखील पाठवून दिले. दावीदासाठी घर बांधायला म्हणून त्याने ही मदत केली.
तेव्हा, परमेश्वराने आपल्याला खरोखरच इस्राएलचा राजा केले आहे हे दावीदाच्या लक्षात आले. दावीदावर आणि इस्राएलच्या लोकांवर प्रेम असल्यामुळे देवाने दावीदाचे साम्राज्य विशाल आणि मजबूत केले.
यरुशलेम नगरातल्या आणखी काही स्त्रियांशी दावीदाने लग्ने केली. त्याला आणखी मुले - मुली झाली.
यरुशलेममध्ये जन्मलेल्या त्याच्या या मुलांची नावे अशी: शम्मुवा, शोबाब, नाथान, शलमोन,
इभार, अलीशवा, एल्पलेट,
नोगा, नेफेग. याफीय,
अलीशामा, बेल्यादा, अलीफलेट.
दावीदाला इस्राएलचा राजा केले आहे हे पलिष्ट्यांना कळले तेव्हा ते दावीदाच्या मागावर निघाले. दावीदाला ही बातमी कळली तेव्हा तो पलिष्ट्यांशी लढायला निघाला.
पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर चढाई करुन त्यांना लुटले.
दावीद देवाला म्हणाला, “पलिष्ट्यांवर मी प्रतिहल्ला करु काय? मला तू त्यांचा पराभव करु देशील काय?” परमेश्वराने दावीदाला सांगितले, “जरुर जा. मी तुझ्या हातून पलिष्ट्यांचा पराभव करवीन.”
मग दावीद आणि त्याची माणसे बाल-परासीम येथपर्यत जाऊन पोचली. त्यांनी पलिष्ट्यांचा पराभव केला. दावीद म्हणाला, “धरणाला खिंडार पाडून पाणी घुसते त्याप्रमाणे देवाने माझ्या शत्रूला मागे सारले आहे. माझ्या कडून देवाने हे करवून घेतले.” म्हणून आता त्या ठिकाणाचे नाव बाल-परासीम-देवाने पाडलेले खिंडार-असे पडले आहे.
पलिष्ट्यांनी आपली दैवाने तिथेच एफाईम दिली. दावीदाने आपल्या माणसांना त्या मूर्ती जाळून टाकायला सांगितल्या.
रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला.
दावीदाने पुन्हा देवाची प्रार्थना केली. देवाने त्या प्रार्थनेला ओ दिली. तो म्हणाला, “दावीदा, तू पलिष्ट्यांवर हल्ला करायला जाशील तेव्हा समोरुन न जाता पाठीमागून जा. तुतीच्या झाडांमागे लपून बस. त्या झाडांवर चढून बस.
तिथे तुला सैन्य चाल करुन जात आहे याची चाहूल लागेल. तेव्हा पलिष्ट्यांवर हल्ला चढव. मी (म्हणजे देव) पलिष्ट्यांवर हल्ला करायला पुढे होईन आणि त्यांचा पराभव करीन.”
दावीदाने देवाच्या सांगण्याप्रमाणे केले. दावीदाने आपल्या लोकांसह पलिष्ट्यांचा पाडाव केला. गिबोनपासून गेजेपर्यंत त्यांनी पलिष्ट्यांच्या सैन्याला झोडपून काढले.
त्यामुळे दावीदाची कीर्ती सर्वदूर पसरली. देवाने सर्व राष्ट्रांत दावीदाची दहशत निर्माण केली.
15
दावीदाने दावीदानगरात स्वत:साठी घरे बांधली. तसेच करारकोश ठेवण्यासाठी एक स्थान उभारले. ते एका तंबूसारखे होते.
मग दावीद म्हणाला, “फक्त लेवींनाच करारकोश वाहून आणण्याची परवानगी आहे. या कामासाठी आणि सर्वकाल परमेश्वराची सेवा करण्यासाठीच लेवींची निवड झाली आहे.”
या जागेपाशी करारकोश आणायला म्हणून दावीदाने यरुशलेममधील सर्व इस्राएल लोकांना एकत्र बोलावले.
अहरोनाचे वंशज आणि लेवी यांनाही यायला सांगितले.
कहाथच्या घराण्यातील 120 माणसे होती. उरीयेल त्यांचा प्रमुख होता.
मरारीच्या कुळातले. 220 जण होते. असाया हा त्यांचा नेता होता.
गर्षोमच्या घराण्यातली 130 लोक असून, योएल हा त्यांचा प्रमुख होता.
अलीसाफानच्या घराण्यापैकी 200 लोक होते. त्यांचा नेता शमाया होता.
हेब्रोनच्या वंशातले 80 लोक होते. अलीएल त्यांच्या नेता होता.
उज्जियेलच्या घराण्यातले 112 जण असून अमीनादाब हा प्रमुख होता.
दावीदाने मग सादोक आणि अब्याथार याजकांना बोलावले. तसेच उरीयेल, असाया, योएल, शमाया, अलीएल आणि अम्मीनादाब या लेवीनाही बोलावून घेतले.
दावीद त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात. तुम्ही आणि सर्व लेवींनी शुचिर्भूत झाले पाहिजे. त्यानंतर मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो करारकोश आणा.
गेल्या वेळी हा कोश कसा आणवा याबद्दल आपण परमेश्वराला विचारले नाही. तुम्हा लेवींनी तो आणला नाही. म्हणून परमेश्वराने आपल्याला ती शिक्षा दिली.”
इस्राएलच्या परमेश्वर देवाचा करारकोश आणता यावा यासाठी मग सर्व याजक आणि लेवी शुचिर्भूत झाले.
मोशेने सांगितले होते त्याप्रमाणे करारकोश खांद्यावरुन आणण्यासाठी लेवींनी विशेष प्रकारच्या काठ्या घेतल्या. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच त्यांनी तो करारकोश आणला.
दावीदाने लेवी प्रमुखांना आपल्या गायकबंधूंना बोलावून घ्यायला सांगितले. सतार, वीणा, झांजा ही वाद्ये आणून त्यांना मंगलगीते म्हणायला सांगितले.
लेवींनी मग हेमान आणि त्याचे भाऊ आसाफ आणि एथान यांना नेमले. हेमान हा योएलचा मुलगा. आसाफ बरेख्याचा मुलगा. एथान कुसायाचा मुलगा. हे सर्वजण मरारीच्या घराण्यातले होते.
याखेरीज लेवींचा आणखी एक गट होता. जखऱ्या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्न, अलीयाब, बनाया, मासेमा, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम आणि ईयेल हे ते होत. हे द्वारपाल होते.
हेमान, आसाफ आणि एथान यांनी पितळी झांजा वाजवल्या.
जखऱ्या, अजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, मासेया, बनाया हे उच्च स्वरात सतारी वाजवत होते.
मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम, ईयेल आणि अजज्या हे मंदसुरात वीणा वाजवण्याच्या कामावर होते. त्यांचे हे नेहमीचेच काम होते.
लेवींचा प्रमुख कनन्या हा मुख्य गायक होता. गायनात निपुण असल्यामुळे त्याच्यावर ही कामगिरी होती.
बरेख्या आणि एलकाना हे करार कोशाचे रक्षक होते.
शबन्या, योशाफाट, नथानेल, अमासय, जखऱ्या, बनाया आणि अलियेजर हे याजक करारकोशापुढे चालताना कर्णे वाजवत होते. ओबेद-अदोम आणि यहीया हे करार कोशाचे आणखी दोन रक्षक होते.
दावीदा, इस्राएलमधील वडीलधारी मंडळी, सरदार करार कोश ओबेद-अदोमच्या घरातून आणयया पुढे गेले. सर्वजण अत्यंत आनंदात होते.
करार कोश उचलून आणणाऱ्यांना देवाने साहाय्य केले. त्यांनी सात गोऱ्हे आणि सात मेंढे यांचे यज्ञार्पण केले.
करारकोश वाहून नेणाऱ्या सर्व लेवींनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायकप्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाचा अंगरखा देखील तलम कापडाचा होता. शिवाय त्याने तशाच कापडाचा एफोद सुध्दा घातला होता.
अखेर सर्व इस्राएल लोकांनी करार कोश आणला. जयघोष करत रण-शिंगाच्या नादांत, कर्णे, झांजा, सतारी, वीणा वाजवत त्यांनी तो आणला.
करार कोश दावीदनगरात पोहंचला तेव्हा शौलची मुलगी मीखल हिने खिडकीतून पाहिले. दावीद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून त्याच्याबद्दलचा तिचा आदर नाहीसा झाला. तिला त्याचा तो वेडगळपणा वाटला.
16
लेवींनी करारकोश आत आणून दावीदाने उभाररलेल्या तंबूमध्ये तो ठेवला. मग त्यांनी देवाला होमार्पणे आणि शांती अर्पणे वाहिली.
हे झाल्यावर दावीदाने परमेश्वराच्या नावाने लोकांना आशीर्वाद दिला.
मग त्याने एकूनएक इस्राएल स्त्री-पुरुषांना एकएक भाकर, खजूर आणि किसमिस एवढे दिले.
दावीदाने मग काही लेवींची करार कोशाच्या सेवेसाठी निवड केली. इस्राएलच्या परमेश्वर देवाचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुती करणे हे त्यांचे काम होते.
आसाफ हा पहिल्या गाटाचा मुख्य होता. त्याचा गट झांजा वाजवीत असे. जखऱ्या दुसऱ्या गाटाचा प्रमुख होता. इतर लेवी पुढीलप्रमाणे: उज्जियेल, शमिरामोथ, यहिएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, आणि ईयेल. हे सतारी आणि वीणा वाजवत असत
बनाया आणि याहजिएल हे याजक नेहमी करार कोशापुढे रणशिंगे वाजवत.
परमेश्वराची स्तुतिगीते गाण्याचे काम दावीदाने आसाफला आणि त्याच्या भावांना दिले.
परमेश्वराचे स्तवन करा. त्याला हाक मारा. परमेश्वराने केलेली महान कृत्ये लोकांना सांगा.
परमेश्वराची स्तोत्रे गा. त्यांचे स्तवन म्हणा. त्याचे चमत्कार इतरांना सांगा.
परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान धरा. परमेश्वराकडे येणाऱ्या तुम्हा सर्वांना आनंद मिळो.
परमेश्वराकडे पाहा त्याचे सामर्थ्य बघा. मदतीसाठी त्याला शरण जा.
देवाच्या अद्भूत कृत्यांची आठवण ठेवा. त्याने केलेले न्याय आणि चमत्कारची कृत्ये यांचे स्मरण करा.
इस्राएलचे लोक परमेश्वराचे सेवक आहेत. याकोबाचे वंशज हे परमेश्वराने निवडलेले खास लोक आहेत.
परमेश्वर आमचा देव आहे. त्याच्या सामर्थ्याची साक्ष सर्वत्र आहे.
त्याच्या कराराचे स्मरण असू द्या. त्याने दिलेल्या आज्ञा पुढील हजारो पिढ्यांसाठी आहेत.
परमेश्वराने अब्राहामाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा. इसहाकाला त्याने दिलेल्या वचनाची आठवण असू द्या.
याकोबासाठी परमेश्वराने तोच नियम केला. इस्राएलशी त्याने तसाच निरंतर करार केला.
इस्राएलला परमेश्वर म्हणाला, “मी तुम्हाला कनानचा प्रदेश देईन. ते वतन तुमचे असेल.”
त्यावेळी तुम्ही संख्येने अगदी थोडे होता, परक्या प्रदेशात उपरे होता.
तुम्ही एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात भटकत होता. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात होता.
पण परमेश्वराने कोणाकडूनही त्यांना दु:ख होऊ दिले नाही. परमेश्वराने राजांना तशी ताकीद दिली.
परमेश्वराने या राजांना सांगितले, “मर्जीतील लोकांना दुखवू नका. माझ्या संदेष्ट्यांना दुखवू नका.”
पृथ्वीवरील समस्त लोकहो, परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराने आपल्याला वाचवल्याची शुभवार्ता रोज सर्वांना सांगा.
परमेश्वराच्या गौरवाची कृत्ये सर्व राष्ट्रांना कळवा तो किती अद्भूत आहे ते सर्वांना सांगा.
परमेश्वर थोर आहे. त्याची स्तुती केली पाजिजे इतर दैवतांपेक्षा परमेश्वराचा धाक अधिक आहे.
का बरे? कारण जगातले इतर सगळी दैवते म्हणजे नुसत्या क्षुद्र मूर्ती पण परमेश्वराने आकाश निर्माण केले.
परमेश्वराला महिमा आणि सन्मान आहे. देव तेजस्वी लखलखीत प्रकाशाप्रमाणे आहे.
लोक हो, सहकुटुंब परमेश्वराच्या महिम्याची आणि सामर्थ्याची स्तुती करा.
त्याचे माहात्म्या गा. त्याच्या नावाचा आदर करा. त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा. त्याची आराधना करा आणि त्याच्या सात्विक सौंदर्याचे गुणगान करा.
परमेश्वरासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो पण त्याने पृथ्वीला खंबीरपणा दिला. हे जग असे हलणार नाही.
पृथ्वी आणि आकाश आनंदी असो सर्वत्र लोक म्हणोत, “हे परमेश्वराचे साम्राज्य आहे.”
समुद्र आणि त्यात सामावलेले सर्व काही आनंदाने गर्जना करो शेतमळ्यांची सृष्टी उल्हासित होवो.
अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातील कारण साक्षात परमेश्वरच जगाला न्याय देण्यासाठी आलेला असेल.
लोक हो, परमेश्वराचे कृतज्ञतेने स्मरण करा, कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम चिरंतन आहे.
परमेश्वराला सांगा, “देवा, तूच आमचा त्राता आहेस. आमचे रक्षण कर, आम्हाला संघटित ठेव आणि इतर राष्ट्रांपासून आमचा बचाव कर. मग आम्ही तुझे नामसंकीर्तन करु. तुझा माहिमा गाऊ.”
इस्राएलच्या परमेश्वर देवाचे अनादी काळापासून स्तवन केले जाते. त्याची स्तुतिस्तोत्रे अखंड गायिली जावोत. सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.
आसाफ आणि त्याचे भाऊबंद यांना करार कोशाच्या नित्य दैनंदिन सेवेसाठी दावीदाने नेमले.
त्या कामात त्यांना मदत करण्यासाठी दावीदाने ओबेद-अदोम आणि आणखी 68 लेवी यांना ठेवले. ओबेद-अदोम आणि होसा हे द्वाररक्षक होते. ओबेद - अदोम यदूथूनचा मुलगा.
सादोक हा याजक आणि त्याच्याबरोबरचे इतर याजक यांना दावीदाने गिबोन येथील उच्च स्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवासमंडपासमोर नेमले.
दररोज सकाळी आणि संध्याकाळी सादोक आणि इतर याजक होमार्पणासाठी असलेल्या वेदीवर होमार्पणे करत असत. परमेश्वराने इस्राएलला जे नियमशास्त्र दिले होते त्यातील नियमांचे पालन करण्यासाठी ते असे करत होते.
परमेश्वराची कृपा निरंतर राहावी म्हणून त्याचे स्तुतिस्तोत्र गाण्यासाठी हेमान, यदूथून व इतर लेवी यांची नेमणूक केली.
हेमान आणि यदूथून यांना झांजा वाजवणे व कर्णे फुंकणे हे काम होते. देवाची स्तुतिगीत गाईली जात असताना इतर वाद्ये वाजवण्याचेही काम त्यांच्याकडे होते. यदूथूनचे मुलगे द्वाररक्षक होते.
हा कार्यक्रम संपल्यावर सर्व लोक घरोघरी गेले. दावीदही आपल्या घराण्याला आशीर्वाद द्यायला घरी परतला.
17
दावीद आपल्या घरी राहायला गेल्यावर एकदा नाथान या संदेष्ट्यास म्हणाला, “मी गंधसरुच्या लाकडाच्या घरात राहत असलो तरी परमेश्वराचा करारकोश मात्र अजूनही एका तंबूतच आहे. देवासाठी मंदिर बांधावे असा माझा विचार आहे.”
तेव्हा नाथान म्हणाला, “तुझ्या मनात आहे ते कर, देवाची तुला साथ आहे.”
पण त्याच रात्री देवाचे वचन नाथानच्या स्वप्नात आले.
देव त्याला म्हणाला, “माझा सेवक दावीद याला सांग: ‘परमेश्वर म्हणतो दावीदा, मला घर बांधून देण्याचे काम तुझे नव्हे
“शिवाय, माझा सेवक दावीद याला हे ही सांग की, सर्वशक्तिमान परमेश्वराचे असे म्हणणे आहे की, ‘तू कुरणात मेंढपाळ होतास त्यातून मी तुला मुक्त केले हे तू माझ्या इस्राएल लोकांचा राजा व्हावेस म्हणून.
तुला मी सर्वत्र साथ दिली. तुझ्या पुढे जाऊन तुझ्या शंत्रूंचे पारिपत्य केले. आता मी तुला थोर लोकांच्या रांगेत नेऊन बसवणार आहे.
माझ्या इस्राएल लोकांना मी एक कायमची जागा देणार आहे. म्हणजे झाडांनी मुळे पसरावीत त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी पाय रोवून राहतील. त्यांना कसलाही त्रास होणार नाही. दुष्ट लोकांपासून त्यांना आता कुठलीही पीडा होणार नाही.
पूर्वी काही तापदायक गोष्टी घडल्या, पण मी माझ्या झस्राएल लोकांच्या रक्षणासाठी पुढारी नेमले होते. आता मी सर्व शत्रूंचा बीमोड करीन. “मी सांगतो की परमेश्वर तुझे घराणे चिरस्थायी करील.
तुझ्या मृत्यूनंतर तू आपल्या पूर्वजांच्या रांगेत जाऊन बसलास की तुझ्या मुलालाच मी राजा करीन. तुझाच मुलगा राजा होईल. त्याचे राज्य मी बळकट करीन.
तुझ्या मुलगा माझ्यासाठी मंदिर बांधेल. त्याचे धराणे सर्वकाळ राज्य करील.
मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तुझ्याआधी शौल राजा होता. पण मी त्याला दिलेला पाठिंबा काढून घेतला. तुझ्या मुलावरचे माझे प्रेम मात्र कधीच आटणार नाही.
माझे राज्य आणि निवासस्थान यांचा तोच उत्तराधिकारी राहील. त्याची सत्ता निरंतर चालेल.”‘
देवाची ही सर्व वचने आणि साक्षात्कार याविषयी नाथानने दावीदाला सर्व काही सांगितले.
राजा दावीद नंतर पवित्र निवासमंडपात जाऊन परमेश्वरासमोर बसला, आणि म्हणाला, “परमेश्वरदेवा, मी आणि माझे घराणे यांच्यासाठी तू खूप केलेस. ते का हे मला अजिबात समजत नाही.
शिवाय, माझ्या घराण्याचा भविष्यकाळही तू माझ्यापुढे उभा केला आहेस. महत्वाच्या व्यक्ति प्रमाणे तू मला लेखीत आहेस.
आणखी काय म्हणू? तू माझ्यासाठी खूप केलेस. मी आपला तुझा एक सेवक आहे, हे तू जाणतोसच.
परमेश्वरा तुझ्या मनोदयाखातर तू हा आश्चर्यकारक गोष्ट माझ्यासाठी घडवून आणलीस.
परमेश्वरा तुझ्यासारखा खरोखरच कोणी नाही. तुझ्याशिवाय कोणीच देव नाही. अशा अद्भूत गोष्टी दुसऱ्या कुठल्या दैवताने केल्याचे आमच्या ऐकिवात नाही.
इस्राएलसारखे दुसरे कुठले राष्ट्र असेल का? जगाच्या पाठीवर फक्त इस्राएल साठीच तू या महान गोष्टी घडवून आणल्यास. आम्हाला मिसरमधून बाहेर काढून तू मुक्त केलेस. तुझ्या कीर्तीत तू भर घातलीस. आपल्या लोकांच्या अग्रभागी राहून तू इतरांना या भूमीतून हुसकून लावलेस.
इस्राएल लोकांना आपल्या छत्राखाली सर्वकाळासाठी घेऊन, परमेश्वरा तू त्यांचा देव झालास.
“परमेश्वरा, मला आणि माझ्या घराण्याला तू हे वचन दिले आहेस. ते सर्वकाल अबाधित राहो. तुझ्या म्हणण्याप्रमाणे होवो.
तुझ्यावरचा विश्वास सार्थ ठरो. तुझ्या नावाबद्दल लोकांना आदर राहो. म्हणजे मग लोक म्हणतील, ‘सर्वशक्तिमान परमेश्वर इस्राएलचा देव आहे.’ मी तुझा सेवक आहे. माझा वंश वाढून तुझ्या सेवेत मग्न असो : हे माझे मागणे आहे.
“देवा, तू आपल्या सेवकाशी हे बोललास. माझे घराणे हे राजघराणे ठरेल असे तू स्पष्ट केलेस. त्यामुळेच धीर येऊन मी हे मागणे मागत आहे.
परमेश्वरा, तूच खरा देव आहेस आणि माझे भले व्हावे म्हणून तू स्वत: अभिवचन दिले आहे.
परमेश्वरा माझ्या घराण्याला तू दयाळूपणे आशीर्वादित केलेस. तसेच माझे घराणे सर्वदा तुझी सेवा करेल असे तूच अभिवचन दिले आहे. तू स्वत: माझ्या घराण्याला आशीर्वाद दिला आहेस. त्यामुळे माझे घराणे सदोदित आशीर्वादीत होईल.”
18
पुढे दावीदाने पलिष्ट्यांवर स्वारी करुन त्यांचा पराभव केला. पलिष्ट्यांकडून त्याने गथ आणि त्याच्या आसपासची गावे काबीज केली.
मग त्याने मवाबवर हल्ला केला. मवाबी लोक दावीदाचे अंकित झाले आणि त्याला खंडणी देऊ लागले.
हदरेजरच्या सैन्याशीही दावीद लढला. हदरेजर हा सोबचा राजा. दावीदाने त्या सैन्याशी हमाथ नगरापर्यंत दोन हात केले. हदरेजर आपल्या राज्याची सीमा फरात नदीपर्यंत वाढवू पाहात होता म्हणून दावीदाने हे केले.
हदरेजरकडून त्याने 1,000 रथ, 7,000 सारथी, आणि 20,000 सैन्य एवढे घेतले. हदरेजरच्या रथांचे जवळपास सर्व घोडेही दावीदाने जायबंदी केले. 100 रथांपुरते घोडे मात्र त्याने शाबूत ठेवले.
दिमिष्क नगरातील अरामी लोक हदरेजर याच्या मदतीला आले, पण त्यांच्यापैकी 22,000 जणांनाही दावीदाने जिवे मारले.
अराममधील दिमिष्कात दावीदाने ठाणी बसवली. अरामीलोक दावीदाचे अंकित होऊन त्याला करभार देऊ लागले. अशाप्रकारे दावीद जाईल तेथे परमेवराने त्याला विजयी केले.
हदरेजरच्या सैन्यातील अधिकाऱ्यांच्या सोन्याच्या ढाली दावीदाने काढून घेतल्या आणि यरुशलेमला आणत्या.
टिमथ आणि कून या नगरांमधील पितळही हस्तगत केले. ही नगरे देखील हदरेजरच्याच आधिपत्याखाली होती. पुढे हे पितळ वापरुन शलमोनाने मंदिरासाठी गंगाळ स्तंभ आणि इतर वस्तू करवल्या.
तोवू हा हमाथ नगराचा राजा होता आणि हदरेजर सोबाचा. दावीदाने हदरेजरज्या सैन्याचा पाडाव केल्याची बातमी तोवूच्या कानावर आली.
तेव्हा त्याने हदोराम या आपल्या मुलाला दावीदाचे क्षेमकुशल विचारण्यासाठी आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी त्याच्याकडे पाठवले. दावीदाने हदरेजरचा पराभव केल्यामुळे तोवूने पाऊल उचलले. तोवू आणि हदरेजर यांच्यात लढाया होतच असत. हदोरामने दावीदाला सोने, रुपे, पितळ यांपासून बनवलेल्या वस्तूंचा नजराणा दिला.
राजा दावीदाने त्या वस्तू शुध्दीकरण करुन परमेश्वराला अर्पण केल्या. अदोम, मवाब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी लोकांकडून आलेल्या वस्तूही त्याने अशाच परमेश्वराला वाहिल्या.
सरुवेचा मुलगा अबीशाय याने क्षार खोऱ्यात अठरा हजार अदोमी लोकांना मारले.
अदोममध्ये अबीशयने मजबूत ठाणी बसवली आणि सर्व अदोमी दावीदाचे सेवक झाले. परमेश्वराने दावीदाला सर्वत्र जय मिळवून दिला.
दावीदाने सर्व इस्राएलवर राज्य केले. त्याने प्रत्येक नागरीकाला उचित अशी न्यायाची वागणूक दिली.
सरुवेचा मुलगा यवाब हा दावीदाच्या सैन्याचा मुख्य अधिकारी होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट दावीदाचा वृत्तांत लेखक होता.
सादोक आणि अबीमलेख याजक होते. सादोक हा अहीटूबचा मुलगा आणि अबीमलेख हा अब्याथारचा. शवूशा हा लेखनिक होता.
यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी व पलेथी लोकांवरील जबाबदार अधिकारी होता. दावीदाचे मुलगे त्याच्याजवळ राहून महत्वाचे कारभार सांभाळत.
19
नाहाश हा अम्मोन्याचा राजा होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा गादीवर आला.
तेव्हा दावीदाने विचार केला, “नाहाशचे माझ्याशी सलोख्याचे संबंध होते. म्हणून त्याचा मुलगा हानून याच्याशी मी प्रेमाचे संबंध ठेवीन.” असे म्हणून दावीदाने हानूनच्या सांत्वनासाठी आपले दूत पाठवले. दावीदाचे हे सेवक अम्मोनला हानूनकडे घेऊन गेले.
तेव्हा अम्मोन्यांचे सरदार हानूनला म्हणाले, “या देखाव्याने फसू नकोस. तुझे सांत्वन करणे किंवा तुझ्या मृत वडीलांचा मान ठेवणे हा दावीदाचा हेतू नाही. दावीदाने या लोकांना तुझा प्रदेश पाहून ठेवायला आणि हेरगिरी करायला पाठवले आहे. त्याला तुझा प्रांत उद्ध्वस्त करायचा आहे.”
हे ऐकून हानून ने दावीदाच्या दूतांना अटक केली आणि त्यांचे मुंडन केले. त्यांची कमरेपर्यंतची वस्त्रेही फाडली आणि त्यांना वाटेला लावले.
दावीदाचे सेवक या गोष्टींमुळे इतके शरमिंदे झाले की त्यांच्याने घरी जाववेना. लोकांकडून दावीदाला ही बातमी समजली तेव्हा दावीदाने त्यांच्यासाठी पुढीलप्रमाणे निरोप पाठवला: “दाढी वाढेपर्यंत तुम्ही यरीही येथे रहा मग इकडे या.”
आणि दावीदाचे वैर ओढवूत घेतले आहे हे अम्मोनी लोकांच्या लक्षात आले तेव्हा हानून आणि अम्मोनी लोक यांनी मेसोपटेम्या येथून रथ आणि सारथी आणवण्यासाठी 75,000 पौंड चांदी खर्च केली. माका व सोबा या अराममधील नगरांमधूनही त्यांनी रथ आणि स्वार यांची खरेदी केली.
अम्मोन्यांनी 32,000 रथ विकत घेतले. माकाच्या राजालाही त्यांनी आपल्या सैन्यासह मदतीला बोलावले व त्याने मोल देऊ केले. तेव्हा त्यांनी येऊन मेदबा नगराजवळ तळ ठोकला. खुद्द अम्हमोनीही नगराबाहेर पडून वेशीजवळ लढायला आले.
अम्मोनी लढाईला सज्ज झाले आहेत हे ऐकून दावीदाने यवाबाला इस्राएलच्या सर्व सैन्यासकट युध्दावर पाठवले.
अम्मोनी लढायच्या जय्यत तयारीनिशी वेशीजवळ आले. त्यांच्या मदतीला आलेले राजे मैदानात स्वतंत्रपणे उभे होते.
सैन्याच्या दोन तुकड्या आपल्याविरुध्द उभ्या ठाकलेल्या असून त्यातली एक आपल्या मागे व एक पुढे आहे हे यवाबने पाहिले. तेव्हा त्याने इस्राएली फौजेतील निवडक लढवय्यांना अरामी सैन्यासमोर नियुक्त केले.
उरलेल्या इस्राएली फौजेला अबीशयच्या हाताखाली सोपवले. अबीशय हा यवाबचा भाऊ. हे सैन्य अम्मोन्याशी लढायला गेले.
यवाब अबीशयला म्हणाला,’ अरामचे सैन्य जर मला भारी ठरले तर तू माझ्या मदतीला ये. आणि अम्मोनी तुझ्यापेक्षा प्रबळ ठरले तर मी तुला सहाय्य करीन.
आपल्या लोकांसाठी आणि देवाच्या या नगरांसाठी लढताना आपण प्रयत्नांची शिकस्त करु, शौर्य गाजवू. मग परमेश्वराला जे योग्य वाटेल ते तो करो.”
यवाब आपल्या सैन्यासह अरामी फौजेवर चालून गेला. तेव्हा अरामच्या सैन्याने त्यांच्यापुढून पळ काढला.
अरामचे सैन्य माघार घेऊन पळून जात आहे हे पाहताच अम्मोन्यांनीही पलायन केले. अबीशय आणि त्याचे सैन्य यांच्याकडे त्यांनी पाठ फिरवली. अम्मोनी आपल्या नगरात परतले आणि यवाब यरुशलेमला परत आला.
इस्राएलपुढे आपला पराभव झाला आहे हे अरामी सरदारांनी पाहिले तेव्हा त्यांनी जासूद पाठवून फरात नदीपलीकडील आपल्या लोकांना बोलवून घेतले. शोफख हा हदरेजरच्या अरामी फौजेचा सेनापती होता. त्याच्या नायकत्वाखाली ते आले.
अरामी लढाईची जमवाजमव करत आहेत हे दावीदाने ऐकले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांना एकत्र जमवले आणि यार्देन नदीपलीकडे जाऊन आराम्यांच्या समोर व्यूह रचला. सर्व तयारीनिशी त्यांनी आरम्यांवर हल्ला केला.
इस्राएल लोकांसमोरुन अराम्यांनी पळ काढला. दावीदाने व त्याच्या सैन्याने सात हजार अरामी सारथी आणि चाळीस हजार अरामी सैन्य यांना ठार केले. अरामी सैन्याचा नेता शोफख यालाही त्यांनी मारुन टाकले.
इस्राएलाने आपला पाडाव केला आहे हे हदरेजरच्या अधिकाऱ्यांचा लक्षात आल्यावर त्यांनी दावीदाशी तह केला. ते दावीदाच्या अधिपत्याखाली आले. अराम्यांनी पुन्हा अम्मोनी लोकांना मदत केली नाही.
20
राजे लढाईच्या मोहिमेवर बाहेर पडतात अशावेळी म्हणजे वर्षारंभी यवाब इस्राएलाचे सैन्य घेऊन युध्दासाठी निघाला. पण दावीद यरुशलेममध्येच राहिला. इस्राएलचे सैन्य अम्मोन्यांच्या नगरात शिरले आणि त्यांनी तो मुलूख उद्ध्वस्त केला. मग त्यांनी राब्बा नगराकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी नगराला वेढा घातला आणि लोकांची नाकेबंदी केली. राब्बा नगर पडेपर्यंत यवाबने इस्राएली सैन्यासह नगरावर हल्ला चालू ठेवला, व राब्बा उद्ध्वस्त केले.
दावीदाने, त्या लोकांच्या राजाच्या मस्तकावरील मुकुट काढला. त्या सोन्याच्या रत्नजडित मुकुटाचे वजन पंचेचाळीस पौंड होते. तो दावीदाच्या मस्तकावर ठेवण्यात आला. राब्बा नगरातून आणखीही पुष्कळ लूट दावीदाला मिळाली.
राब्बातील लोकांना बाहेर काढून दावीदाने त्यांच्याकडून करवती, कुऱ्हाही, पहाडी या हत्यारांनी करायच्या कष्टाच्या कामाला जुंपले. अम्मोन्यांच्या सर्व नगरांमध्ये दावीदाने हेच केले. मग दावीद आणि त्याचे सैन्य यरुशलेमला परतले.
पुढे गेजेर येथे इस्राएल लोकांचे पलिष्ट्यांशी युध्द झाले. या लढाईत सिब्बखय हूशाथी याने सिप्पय याला ठार मारले. सिप्पय हा अत्यंत धिप्पाड व रेफाई वंशातला होता. तेव्हा हे पलिष्टि लोक इस्राएलींना शरण आले.
इस्राएलींची पुढे पुन्हा एकदा पलिष्ट्यांशी लढाई झाली. त्यावेळी याईरचा मुलगा एलहानान याने गथच्या गल्याथचा भाऊ लहमी याला ठार केले. लहमीचा भाला चांगला लांबलचक आणि जाडजूड होता. हातमागाच्या तुरीसारखा तो मोठा होता.
गथ येथे पलिष्ट्यांशी इस्राएल लोकांची आणखी एकदा लढाई झाली. या गावात तेव्हा एक प्रंचंड आकारमानाचा माणूस होता. त्याच्या हातापायांना प्रत्येकी सहासहा, अशी एकंदर चोवीस बोटे होती. तो राक्षसपुत्रच होता.
अशा माणसाने इस्राएल लोकांचा उपहास केल्यावर योनाथानने त्याला ठार केले. योनाथान हा शिमीचा मुलगा. शिमी दावीदाचा भाऊ.
पलिष्टे ही गथ नगरातील बलाढ्य लोकांची संतती. दावीद व त्याचे सेवक यांनी त्यांचे पारिपत्य केले.
21
सैतान इस्राएल लोकांच्या विरुध्द होता. त्याने दावीदाला इस्राएल लोकांची जनगणना करण्यास प्रवृत्त केले.
दावीद यवाबला आणि अधिकाऱ्यांना म्हणाला, “इस्राएलमधील सर्व लोकांच्या मोजणीला लागा. बैरशेब्यापासून दानपर्यंत सर्व प्रदेश पालथा घाला. कोणीही वगळले जाता कामा नये. मग मला एकंदर संख्या किती आहे ते येऊन सांगा.”
यावर यवाब म्हणाला, “परमेश्वर आपले राष्ट्र आहे त्यापेक्षा शंभर पटीने वाढवो. इस्राएलमधील सर्व लोक आपले दास आहेत, तेव्हा माझे स्वामीराज, आपण ही गोष्ट कशासाठी करता? त्याने इस्राएलचे लोक दोषी आणि पातकी ठरतील.”
पण राजा दावीद काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हता. तेव्हा यवाबला राजाज्ञेप्रमाणे वागणे भाग पडले. यवाब निघाला आणि लोकांची मोजणी करत त्याने सर्व प्रदेश तुडवायला सुरुवात केली. मग यरुशलेमला परत येऊन
दावीदाला त्याने एकंदर लोकसंख्या सांगितली. इस्राएलमध्ये 11,00,000 तलवार धारी पुरुष होते आणि यहूदात 4,70,000.
यवाबाने लेवी आणि बन्यामीन यांच्या घराण्यांची मोजदाद केली नव्हती कारण राजा दावीदाचा हुकूम त्याला मान्य नव्हता.
देवाच्या दृष्टीने दावीदाची ही चूक होती म्हणून देवाने इस्राएलला शासन केले.
मग दावीद देवाला म्हणाला, “माझ्या हातून हा मूर्खपणा झाला आहे. इस्राएलमधील लोकांची मोजणी करुन मी पाप केले आहे. या अपराधाबद्दल या तुझ्या सेवकाला तू या पापाची क्षमा करावीस अशी मी विनवणी करतो.”
दावीद गादला म्हणाला, “मी भल्याच संकटात सापडलो आहे. माझ्या शिक्षेच्या बाबतीत माणूस काय ठरवणार? परमेश्वर दयाघन आहे. मला शासन कसे करायचे ते त्यालाच ठरवू दे.”
तेव्हा परमेश्वराने इस्राएलभर रोगराई पसरवली. त्यात 70,000 लोक मृत्युमुखी पडले.
यरुशलेमचा नाश करायला देवाने दूत पाठवला. पण त्याने यरुशलेमच्या संहाराला सुरुवात केली तेव्हा परमेवराला ते अरिष्ट पाहून वाईट वाटले. परमेश्वराने हा संहार थांबवायचे ठरवले. परमेश्वर त्या संहारक दूताला म्हणाला, “थांब, पुरे झाले त्या वेळी” परमेश्वराचा दूत अर्णान यबूसी याच्या खळ्याजवळ होत.
दावीदाने वर पाहिले तेव्हा त्याला परमेश्वराचा दूत आकाशात उभा असलेला दिसला. त्याने आपली तलवार यरुशलेम नगरावर उपसलेली होती. दावीद आणि पुढाऱ्यांनी नम्रपणे वाकून अभिवादन केले. या सर्वांनी दुखववड्याच्या वेळी घालतात तसे शोक प्रदर्शित करणारे कपडे घातलेले होते.
दावीद देवाला म्हणाला, “पाप माझ्या हातून घडले आहे लोकांच्या मोजणीचा हूकूम मी दिला. माझे चुकले. इस्राएल लोक निरपराध आहेत. परमेश्वरा, देवा शासन करायचे ते मला आणि माझ्या कुटुंबियांना कर. पण तुझ्या लोकांचा जीव घेणारी ही रोगाची साथ थांबव.”
मग परमेश्वराचा दूत गादला म्हणाला, “परमेश्वराच्या उपासनेसाठी दावीदाला एक वेदी बांधायला सांग. अर्णान यबूसीच्या खळ्या जवळ त्याने ती बांधावी.”
गादने हे दावीदाला सांगितले. दावीद अर्णानच्या खळ्याकडे गेला.
अर्णान तेव्हा गव्हाची मळणी करत होता. तो मागे वळून पाहतो तर त्याला देवदूत दिसला. अर्णानचे चारही मुलगे त्याला पाहून लपून बसले.
दावीद अर्णान कडे गेला. अर्णान खळ्यातून राजाजवळ गेला आणि त्याने राजाला डोके जमिनीपर्यंत लववून नमस्कार केला.
राजा त्याला म्हणाला, “तुझे हे खळे मला विकत दे. त्याची पूर्ण किंमत मी तुला देईन. तेथे मला परमेश्वराच्या उपासने करिता वेदी बांधायची आहे. म्हणजे ही जीवघेणी मरी थांबेल.”
अर्णान दावीद राजाला म्हणाला, “हे खळे मी तुम्हाला दिले. तुम्ही आमचे स्वामी आणि पोशिंदे आहात. तुम्ही त्याचे हवे ते करा. यज्ञात अर्पण करण्यासाठी मी बैलही देईन. तसेच वेदीवरील होमात घालण्यासाठी लाकडी फळ्या, आणि धन्यार्पणासाठी गहू हे ही सर्व मी तुम्हाला देईन.”
तेव्हा राजा दावीद अर्णानला म्हणाला, “मी तुला त्याची पूर्ण किंमत देईन. तुझ्याकडून काढून घेऊन मी ते परस्पर परमेश्वराला वाहणार नाही. फुकट मिळालेला होमबली मी अर्पण करणार नाही.”
आणि दावीदाने खळ्याचे मूल्य म्हणून अर्णानला 25 पौंड सोने दिले.
दावीदाने त्या जागी परमेश्वराच्या उपासनेकरिता वेदी बांधली. तेथे त्याने होम आणि शांती-अर्पणे केली. दावीदाने परमेश्वराची प्रार्थना केली. त्याला उत्तर म्हणून परमेश्वराने स्वर्गातून अग्नी पाठवला. तो दिव्य अग्नी नेमका होमार्पणाच्या वेदीवर पडला.
मग परमेश्वराने देवदूताला आपली तलवार म्यान करायला सांगितले.
अर्णानच्या खळ्यावर परमेश्वराने आपल्याला उत्तर दिलेले पाहून दावीदाने परमेश्वरासाठी यज्ञ केले.
(पवित्र निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी, त्याकाळी गिबोनमध्ये उच्च स्थानावर होती. इस्राएल लोक वाळवंटात असताना मोशेने तो पवित्र निवासमंडप बांधला होता.
परमेश्वराच्या दूताच्या तलवारीच्या धाकाने दावीद देवापुढे पवित्र निवासमंडपाकडे जाण्यास घाबरत होता.)
22
दावीद म्हणाला, “हेच ते परमेश्वर देवाचे मंदिर. इस्राएल लोकांनी होमबली अर्पण करण्याची वेदीही इथेच बांधली जाईल.”
इस्राएलमध्ये जे परदेशी लोक राहत होते त्या सर्वाना दावीदाने एक फर्मान काढून बोलवून घेतले. पाथरवटांची निवड त्याने त्यांच्यातून केली. देवाच्या मंदिरासाठी दगडाचे चिरे घडवण्याचे काम त्यांचे होते.
दरवाजांसाठी लागणारे खिळे आणि बिजागऱ्या यांच्यासाठी दावीदाने लोखंड आणवले. पितळेचाही फार मोठा साठा त्याने केला.
सीदोन आणि सोर या नगरांतील लोकांनी गंधसरुचे लाकूड दावीदाला दिले. ते ओंडके तर एवढे आले की त्यांची मोजदाद करणे कठीण.
दावीद म्हणाला, “आपण परमेश्वरासाठी भव्य मंदिर उभारले पाहिजे. पण माझा मुलगा शलमोन अजून लहान आहे. त्याचे शिक्षणही अद्याप पुरे झालेले नाही. परमेश्वराचे मंदिर मात्र उत्कृष्ट झाले पाहिजे. असे देखणे आणि भव्य की सगळ्या राष्ट्रांमध्ये त्याची कीर्ती व्हायला हवी. त्यदृष्टीनेच मी परमेश्वराच्या मंदिराची योजना आखीन.” असे म्हणून दावीदाने आपल्या मृत्यूपूर्वी मंदिर उभारणीची बरीच तयारी केली.
मग त्याने आपला मुलगा शलमोन याला जवळ बोलावले. इस्राएलचा परमेश्वर देव याच्यासाठी मंदिर बांधण्याची दावीदाने त्याला आज्ञा केली.
दावीद शलमोनला म्हणाला, “मुला, परमेश्वर देवासाठी मंदिर बांधायची मला फार इच्छा होती.
पण परमेश्वर मला म्हणाला, ‘दावीदा, तू बऱ्याच लढाया केल्यास आणि त्यात अनेक लोक मारले गेले. तेव्हा तुला माझ्सासाठी मंदिर बांधता येणार नाही.
मात्र तुझा मुलगा शांतताप्रिय आहे. मी त्याच्या कारकिर्दीत शांतता लाभू देईन. त्याचे शत्रू त्याला त्रास देणार नाहीत. त्याचे नाव शलमोन म्हणजे शांतताप्रिय असेल. इस्राएलला त्याच्या काळात शांतता आणि स्वस्थता लाभेल.
तो माझ्याप्रीत्यर्थ मंदिर उभारील. तो माझा पुत्र आणि मी त्याचा पिता होईन त्याचे राज्य मी बळकट करीन. इस्राएलवर त्याच्या वंशजा पैकी एकजण सर्वकाळ राज्य करील.”
दावीद म्हणाला, “मुला, तुला परमेश्वराची अखंड साथ लाभो. तुला यश मिळो. परमेश्वर देवाने भाकीत केल्याप्रमाणे तुझ्याहातून त्याचे मंदिर बांधून होवो.
तो तुला इस्राएलचा राजा करील. लोकांचे नेतृत्व करायला आणि परमेश्वर देवाचे नियम पाळायला तो तुला ज्ञान आणि शहाणपण देवो.
इस्राएलसाठी परमेश्वराने मोशेला जे नियमशास्त्र सांगितले ते तू कसोशीने पाळ म्हणजे तू यशस्वी होशील. घाबरु नको. दृढ राहा. हिंमत बाळग.
“शलमोन, परमेश्वराच्या मंदिराच्या वास्तूसाठी मी खूप मेहनत घेतली आहे. 3,750 टन सोने आणि 37,500 टन चांदी मी जमवली आहे. लोखंड आणि पितळ, तर मोजदाद करणे कठीण इतके आहे. दगड, लाकूड यांचाही साठा मी केलाच आहे. शलमोन, त्यात तू भर घालू शकतोस.
पाथरवट आणि सुतार तुझ्या दिमतीला आहेत. खेरीज प्रत्येक कामात कुशल अशी माणसे आहेत.
सोने, चांदी, पितळ, लोखंड यांच्या कारागिरीत ते निपुण आहेत. शिवाय हे कारागिर काही थोडे थोडके नाहीत. असंख्य आहेत. तेव्हा आता कामाला सुरवात कर. तुला परमेश्वराची साथ मिळो.”
दावीदाने मग इस्राएलमधील सर्व पुढारी मंडळींना शलमोनला सहकार्य करण्याची आज्ञा केली.
दावीद त्यांना म्हणाला, “खुद्द परमेश्वर देवच तुमच्याबरोबर आहे. त्याच्या कृपेने तुम्हाला शांतता लाभली आहे. आपल्या भोवतालच्या शत्रूंना पराभूत करण्यात परमेश्वराने मला साहाय्य केले. आता हा देश परमेश्वराच्या आणि तुमच्या ताब्यात आहे.
तेव्हा अंत:करणपूर्वक तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाला शरण जा आणि त्याचे ऐका. परमेश्वर देवाचे पवित्र मंदिर बांधा. मग मंदिरांत पवित्र करारकोश आणि इतर पवित्र वस्तू आणून ठेवा.”
23
आता दावीदाचे बरेच वय झाले होते. तेव्हा त्याने आपला मुलगा शलमोन याला इस्राएलचा राजा केले.
इस्राएलमधील सर्व पुढारी मंडळी, याजक आणि लेवी यांना दावीदाने बोलावून घेतले.
तीस आणि त्याहून अधिक वय असलेल्या लेवींची त्याने गणना केली. तसे एकंदर 38,000 लेवी होते.
दावीद म्हणाला, “यांच्यापैकी 24,000 लेवी परमेश्वरच्या मंदिराच्या कामावर देखरेख करतील. 6,000 अंमलदार आणि न्यायाधीश म्हणून काम करतील.
4,000 द्वारपाल होतील आणि 4,000 देवांची स्तुतिगीते गातील. त्यांच्यासाठी मी खास वाद्ये करवून घेतली आहेत. त्यांच्या साथीवर ते देवाची स्तुती करतील.”
लेवीचे मुलगे गेर्षोन, कहाथ आणि मरारी यांच्या घराण्यानुसार त्याने सर्व लेवींची तीन गटांमध्ये विभागणी केली.
गेर्षोन घराण्यात लादान आणि शिमी हे दोघे होते.
लादान याला तीन मुले. यहीएल हा थोरला. नंतर जेथाम व योएल.
शिमीचे मुलगे असे शलोमोथ, हजिएल व हरान. लादानच्या घराण्यांचे हे प्रमुख होते.
शिमीला चार मुलगे. यहथ, जीजा, यऊश आणि बरीया.
यरथ हा त्यांपैकी मोठा, दुसरा जीजा. यऊश आणि बरीया यांना मात्र फार संतती नव्हती त्यामुळे त्यांचे दोघांचे मिळून एकच घराणे धरले जाई.
कहाथला चार मुलगे होते: अम्राम, इसहार, इब्रोन आणि उज्जियेल.
अहरोन आणि मोशे हे अम्रामचे मुलगे: अहरोन आणि त्याच्या वंशजाची खास कामाकरता निवड केली गेली होती. परमेश्वराच्या उपासनेच्या पवित्र कामाच्या तयारीसाठी त्यांना कायमचे वेगळे काढले गेले होते. परमेश्वरापुढे धूप जाळणे, परमेश्वराचे याजक म्हणून सेवा करणे, परमेश्वराच्या वतीने लोकांना आशीर्वाद देणे अशी त्यांची कामे होती.
मोशे हा देवाचा संदेष्टा होता. त्याचे मुलगे लेवीच्या वंशातच गणले जात.
गेर्षोम आणि अलियेजर हे मोशचे मुलगे.
शबुएल हा गेर्षोमचा मोठा मुलगा.
रहब्या हा अलियेजरचा मोठा मुलगा. हा एकुलता एक होता. रहब्याला मात्र बरीच मुले झाली.
शलोमीथ हा इसहारचा पहिला मुलगा.
हेब्रोनचे मुलगे याप्रमाणे: यरीया मोठा, अमऱ्या दुसरा, यहजिएल तिसरा, यकमाम चौथा.
उज्जियेलचे मुलगे: पहिला मीखा आणि नंतरचा इश्शिया.
महली आणि मूशी हे मरारीचे मुलगे. एलाजार आणि कीश हे महलीचे मुलगे.
एलाजारला मुलीच झाल्या त्याला पुत्र नव्हता. या मुलींचे विवाह नात्यातच झाले. त्या लग्न होऊन कीशच्या घराण्यात गेल्या.
मूशीचे मुलगे: महली, एदर आणि यरेमोथ.
हे झाले लेवीचे वंशज आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची शिरगणती झाली. ते घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या नावाची नोंद झालेली आहे. जे वीस किंवा त्याहून अधिक वयाचे होते त्यांनी परमेवराच्या मंदिरात सेवा करणे हे त्यांचे काम.
दावीद म्हणाला, “इस्राएलचा देव परमेश्वर याच्यामुळे लोकांना शांती लाभली आहे. परमेश्वर यरुशलेमला कायमच्या वास्तव्यासाठी आला आहे.
तेव्हा लेवींना पवित्र निवासमंडप आणि उपासनेतील इतर उपकरणे सतत बाळगण्याची गरज नाही.”
लेवी कुळतील वंशजांची मोजदाद करणे ही दावीदाची इस्राएल लोकांना अखेरची आज्ञा होती. त्यानुसार वीस वर्षे आणि त्यापुढील वयाच्या माणसांची शिरगणती झाली.
अहरोनच्या वंशजांना परमेश्वराच्या मंदीरातील सेवेत मदत करणे हे लेवींचे काम होते. मंदिराचे आवार आणि बाजूच्या खोल्या यांची देखभाल ही त्यांच्याकडे होती. मंदिरातील सर्व पवित्र गोष्टी शुचिर्भूत ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. देवाच्या मंदिरातील हे काम ते करत असत.
मंदिरातील विशेष भाकरी मेजावर ठेवणे, पीठ, धान्यार्पण करण्याच्या वस्तू बेखमीर भाकरी यावर त्यांची देखरेख होती. याखेरीज, तव्यावर भाजलेले, मळलेले सर्व काही सिध्द करणे, मोजून मापून त्या वंस्तूची तयारी करणे हे ही काम त्यांच्याकडे होते.
ते रोज सकाळ-संध्याकाळ परमेश्वराचे आभार मानायला आणि त्याची स्तुती करायला उभे राहत.
शब्बाथच्या दिवशी, नवचंद्र दर्शन आणि सणावाराला देवाची होमार्पणे ते तयार करत. नित्य आराधनाही त्यांच्याकडेच होती. एका वेळी किती लेवींनी हे करायचे याचे नियम घालून दिलेले होते.
त्यांना नेमून दिल्याप्रमाणे ते वागत. पवित्र निवासमंडपाची देखभाल करत. पवित्र स्थानाचा संभाळ करत. आपले आप्त. याजक आणि अहरोनचे वंशज यांना ते सहाय्य करत. याजकांना ते परमेश्वरच्या मंदिराच्या सेवेत मदत करत.
24
अहरोनच्या मुलांची वर्गवारी अशी: नादाब, अबीहू एलजार व इथामार हे अहरोनचे मुलगे.
पण नादाब आणि अबीहू हे दोघे आपल्या वडीलांच्या आधीच वारले. शिवाय त्यांना मुलेही झाली नव्हती. तेव्हा एलाजार आणि इथामार हेच याजक झाले.
प्रत्येकाला नेमून दिलेली कर्तव्ये पार पाडता यावीत म्हणून दावीदाने एलाजार आणि इथामार यांच्या वंशजांची स्वतंत्र गटांत विभागणी करुन टाकली. त्यासाठी दावीदाने सादोक आणि अहीमलेख यांची मदत घेतली. सादोक हा एलाजारच्या वंशातला आणि अहीमलेख इथामारच्या
इथामारपेक्षा एलाजारच्या घराण्यात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजारच्या घराण्यात सोळा जण प्रमुख होते तर इथामारच्या घराण्यात आठ जण.
दोन्ही घराण्यातील पुरुषांनी निवड चिठ्ठ्या टाकून केली गेली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे मुखत्यार म्हणून नेमले तर काहींना याजक म्हणून सेवेसाठी नेमले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या घराण्यातलेच होते.
शमाया लेखनिक होता. हा नथनेलचा मुलगा. याचे घराणे लेवीचे होते सर्व वंशजांची नावे लिहिण्याचे काम शमायाने केले. राजा दावीद आणि इतर प्रमुख मंडळी-उदाहरणार्थ सादोक हा याजक, अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख-यांच्यासमोर त्याने या नोंदी केल्या. अहीमलेख हा अब्याथारचा मुलगा. दावेळी चिठ्ठ्या टाकून त्यातून एकाची निवड करण्यात येई. आणि शमाया त्या माणसाचे नाव लिहून ठेवी. अशाप्रकारे एलाजार आणि इथामार यांच्या कुळातील लोकांमध्ये कामाची वाटणी करण्यात आली.
यहोयारीबचा गट पहिला होता. दुसरा गट यदायाचा.
हारीमचा गट तिसरा. सोरीमचा गट चौथा.
मलकीयाचा पाचवा गट. सहावा गट मयामिनचा.
0हक्कोसाचा सातवा गट. आठवा गट अबीयाचा.
नववा गट येशूवाचा . दहावा गट शकन्याचा.
अकरावा गट एल्याशिबाचा. बारावा गट याकीमचा.
तेरावा गट हुप्पाचा. चवदावा गट येशेबाबाचा.
पंधरावा गट बिल्गाचा. सोळावा गट इम्मेराचा.
सतरावा गट हेजीराचा. अठरावा गट हप्पिसेसाचा.
पथह्याचा गट एकोणिसावा. विसावा गट यहेजकेलाचा.
एकविसावा गट याखीनचा. बाविसावा गट गामूलचा.
तेविसावा गट दलायाचा. आणि चोविसावा गट माज्याचा.
परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी या सर्वांची क्रमाने नेमणूक करण्यात आली. इस्राएलचा परमेश्वर देव याने अहरोनला जे नियम घालून दिले त्याच नियमांचे पालन त्यांनी मंदिराच्या सेवेसाठी केले.
लेवीच्या इतर वंशजांची नावे खालीलप्रमाणे: अम्रामच्या वंशातील मुलेबाळे: शूबाएल. शूबाएलचे वंशज: यहदाया.
रहब्याचे वंशज: इशिया. (हा सर्वात थोरला.)
इसहार घराण्यापैकी: शलोमोथ. शलोमोथच्या घराण्यातून: यहथ.
हेब्रोनचा मोठा मुलगा यरीया. हेब्रोनचा दुसरा मुलगा अमऱ्या. यहजियेल तिसरा आणि चौथा यकमाम.
उज्जियेलचा मुलगा मीखा. मीखाचा मुलगा शामीर.
इश्शिया हा मीखाचा भाऊ. इश्शियाचा मुलगा जखऱ्या.
मरारीचे वंशज: महली मूशी आणि याजीया.
मरारीचा मुलगा याजीया याची मुले: शोहम व जक्कूर.
एलजार हा महलीचा मुलगा. पण एलाजारला पुत्रसंतती नव्हती.
कीशाचा मुलगा यरहमेल.
महली, एदर आणि यरीमोथ हे मूशीचे मुलगे. लेवी घराण्यातील हे प्रमुख होत. आपापल्या घराण्याप्रमाणे त्यांची नोंद करण्यात आली.
खास कामगिरीकरता त्यांची निवड करण्यात आली. अहरोनचे वंशज असलेले त्यांचे याजक नातलग यांच्याप्रमाणेच चिठ्ठ्या टाकून ही निवड झाली. राजा दावीदा, अहीमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. कामाच्या नेमणुकीमध्ये घराण्यातील श्रेष्ठ आणि कनिष्ठ बांधव असा भेदभाव नव्हता.
25
दावीद आणि सैन्यातील अधिकारी यांनी मिळून आसाफच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती मुले. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरुप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी पुढीलप्रमाणे:
आसाफाच्या कुटुंबातून जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला. दावीदाने आसाफला संदेश कथनासाठी निवडले आणि आसाफने आपल्या या मुलांना.
यदूथूनच्या घराण्यातून गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण. यदूथूनने यांना आपल्या हाताखाली घेतले. यदूथून वीणा वाजवून संदेश देऊन, परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करत असे.
सेवा करायला हेमानचे वंशज होते ते असे बुक्कीया: मत्तन्या, उज्जियेल, शबएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ.
हे सर्व हेमानचे मुलगे. हेमान हा राजा दावीदाचा द्रष्टा होता. देवाने हेमानला वंशवृध्दीचे वचन दिले होते. त्यानुसार हेमानला भरपूर मुलेबाळे झाली. देवाने हेमानला चौदा मुलगे आणि तीन मुली दिल्या.
परमेश्वराच्या मंदिरात गीते गाण्यासाठी हेमानने आपल्या सर्व मुलांना हाताशी धरले. ही मुले झांजा, सतारी आणि वीणा वाजवत, आणि देवाची सेवा करत. राजा दावीदाने यांना निवडले होते.
लेवी घराण्यातील हे लोक आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत निपुण होते. परमेश्वराची स्तुती गीते गाणारी अशी 288 माणसे होती.
प्रत्येकाने कोणते काम करायचे हे ठरवायला चिठ्ठया टाकल्या जात. त्यांना एकसारखीच वागणूक मिळे. लहान थोर, गुरु-शिष्य असा त्यांच्यात भेदभाव नव्हता.
पहिली चिठ्ठी आसाफ (योसेफ) याची निघाली. त्यांची मुले आणि नातलग यांच्यातून बारा जणांची निवड झाली. दुसरी गादल्याची त्याची मुले आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले.
जक्कूरचे मुलगे आणि भाऊबंद यांच्यामधून, तिसऱ्या चिठ्ठीनुसार बाराजण घेतले.
चवथी चिठ्ठी इस्त्रीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांच्यामधून बारा.
पाचवी नथन्याची. त्याच्या मुलां-नातलगामधून बारा.
सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.
सातवी यशरेलाची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.
यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.
नववी मत्तन्याची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा.
दहावी शिमोची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
अकरावी अजरेलाची. त्याचे मुलगे आणि नातलाग यांमधून बारा.
बारवी हशब्याची. त्याचे मुलगे आणि त्याचे नातलग यांमधून बारा.
तेरावी शूबाएलाची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
चोदावी मतिथ्याची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा.
पंधरावी यरेमोथची. त्याचे मुलगे आणि नातेवाईक यांमधून बारा.
सोळावी हनन्याची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.
सतरावी याश्बाकाशाची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
अठरावी हनानीची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा.
विसावी अलीयाथची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
एकविसावी होथीरची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
बाविसाठी गिद्दल्तीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा.
तेविसावी महजियाथची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.
चोविसावी रोममती एजेरची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
26
द्वारपालांचे गट: हे पहारेकरी कोरहाच्या घराण्यातील होते. त्यांची नावे अशी: मेशेलेम्या आणि त्याची मुलेबाळे. (आसाफच्या कुळातील कोरहचा हा मुलगा.)
मेशेलेम्या याला मुलगे होते. जखऱ्या हा त्यांतला मोठा. यदिएल दुसरा, जबद्या तिसरा, यथनिएल चौथा
अलाम पाचवा, यहोहानान सहावा, एल्योवेनय सातवा.
आता ओबेद-अदोम, याची मुले. शामाया थोरला, अहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा,
अम्मीएल सहावा, इस्साखार सातवा, पउलथय आठवा. देवाची ओबेद-अदोमवर खरोखच कृपादृष्टी होती.
शमाया हा ओबेद-अदोमचा मोठा मुलगा. त्यालाही पुत्रसंतती होती. हे मुलगे चांगले कणखर योध्दे असल्यामुळे त्यांची आपल्या पितृकुळावर सत्ता होती.
अथनी, रफाएल, ओबेद एलजाबाद, अलीहू आणि समख्या हे शमायाचे पुत्र. एलजाबादचे भाउबंद सर्व प्रकारच्या कामात कुशाल होते.
हे सर्व ओबेद-अदोमचे वंशज त्याची मुले, नातेवाईक असे सर्वच पुरुष पराक्रमी होते. ते सावध पहारेकरी होते. ओबेद - अदोमचे एकंदर 62 वंशज होते.
मेशेलेम्याचे पुत्र आणि भाऊबंद मिळून अठराजण होते. ते सर्व पराक्रमी होते.
मरारीच्या वंशातले द्वारपाल पुढीलप्रमाणे: त्यापैकी एक होसा. शिम्री या त्याच्या मुलाला ज्येष्ठपद दिले होते. खरे म्हणजे हा जन्माने थोरला नव्हे, पण त्याच्या वडीलांनी त्याला तो मान दिला होता.
हिल्कीया दुसरा. टबल्या तिसरा. जखऱ्या चौथा. होसाला मुलगे आणि भाऊबंद मिळून तेराजण होते.
द्वारपालांच्या गटांवर प्रमुख नेमलेले होते. आपल्या इतर भाऊबंदाप्रमाणेच द्वारपालांनाही परमेश्वराच्या मंदिरातील सेवेचे काम नेमून दिलेले होते.
एकेका दरवाजाच्या रक्षणाची जबाबदारी एकेका घराण्याकडे दिलेली होती. एकेका दारासाठी चिठ्ठी टाकून हे काम सोपवले गेले. त्यात वयाने लहान मोठा असा भेदभाव नव्हता.
शेलेम्याच्या वाटणीला पूर्वेकडचे दार आले. त्याचा मुलगा जखऱ्या याच्यासाठी नंतर चिठ्ठी टाकण्यात आली. हा सूज्ञ मंत्री होता. उत्तरेच्या द्वारासाठी त्याची निवड झाली.
ओबेद-अदोमच्या वाटणीला दक्षिण दरवाजा आला. मौल्यवान चीजवस्तू ठेवलेल्या भांडाराचे रक्षण करण्याचे काम ओबेद-अदोमच्या मुलांकडे आले.
शुप्पीम आणि होसा यांची निवड पश्र्चिम दरवाजासाठी आणि शल्लेकेथची, चढणीच्या वाटेवरील दरवाजासाठी झाली. पहारेकरी एकमेकांलगत उभे असत.
पूर्व दरवाजावर सहा लेवी, उत्तर दरवाजावर चार लेवी, दक्षिण दरवाजावर चार जण, भांडाराच्या रक्षणासाठी दोन लेवी दिवसभर सतत पहारा देत.
पश्मिमेकडील शिवारावर चारजण पहारा देत. आणि त्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर दोन रक्षक असत.
कोरह आणि मरारी यांच्या घराण्यातील द्वाररक्षकांच्या गटांची यादी पुढीलप्रमाणे:
अहीया हा लेवी घराण्यातील होता. देवाच्या मंदिरातील मौल्यवात चीजवस्तूंच्या कोठारावर तो प्रमुख होता. पवित्र उपकरणे ठेवलेल्या जागेची जबाबदारी अहीयावर होती.
लादान हा गेर्षोनच्या वंशातील. यहीएली हा लादानच्या घराण्यातील प्रमुखांपैकी एक.
जेथाम आणि त्याचा भाऊ योएल हे यहीएलीचे मुलगे. परमेश्वराच्या मंदिरातील मौल्यवान चीजवस्तूंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर होती.
अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जियेली यांच्या कुळांमधून आणखी काही प्रमुखांची नेमणूक करण्यात आली.
अबुएल हा परमेश्वराच्या मंदिरातील भांडारावरचा नायक म्हणून नेमला गेला. अबुएल गेर्षोनचा मुलगा. गेर्षोम मोशेचा मुलगा.
अबुएलाचे भाऊबंद पुढीलप्रमाणे: अलीयेजार कडून: रहब्या हा अलीयेजाचा मुलगा. रहब्याचा मुलगा यशया. यशयाचा मुलगा योराम. योरामचा मुलगा जिख्री. आणि जिख्रीचा मुलगा शलोमोथ.
दावीदाने मंदिरासाठी जे जे जमवले होते त्या सगळ्यांवर शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद यांची देखरेख होती. सैन्यातील सरदारांनीही मंदिरासाठी वस्तू दिल्या होत्या.
यापैकी काही युध्दात मिळालेली लूट होती. ती त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या कामासाठी देऊन टाकली.
शमुवेल हा द्रष्टा, कीशचा मुलगा शौल आणि नेरचा मुलगा अबनेर, सरुवेचा मुलगा यवाब यांनी परमेश्वराला दिलेल्या पवित्र वस्तूंची देखभालही शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद करत असत.
कनन्या हा इसहार घराण्यातील होता. कनन्या आणि त्याची मुले यांना मंदिराबाहेरचे काम होते. इस्राएलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरक्षाव्यवस्था आणि न्यायदान करणे ही कामे ते सांभाळत.
हशब्या हा हेब्रोन घराण्यातला. यार्देन नदीच्या पश्चिमेकडे पसरलेल्या इस्राएलच्या भूमीवरील परमेश्वराचे कार्य आणि राज्याचा कारभार हशब्या आणि त्याचे भाऊबंद पाहात असत. या गटात 1,700 शूर वीर होते.
हेब्रोन घराण्याच्या इतिहासावरुन असे दिसते की यरीया हा त्यांचा प्रमुख होता. चाळीस वर्षे राज्य केल्यावर दावीदाने जेव्हा शूर आणि कसबी पुरुषांचा शोध घेतला तेव्हा गिलाद मधल्या याजेर नगरात त्याला हेब्रोन घराण्यांत अशी माणसे आढळली.
आपापल्या घराण्यांचे प्रमुख आणि पराक्रमी असे असे 2,700 नातलग यरीयाला होते. परमेश्वराचे कार्य आणि राज्याचे कामकाज यांसाठी, रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धावंश यांच्यावर देखरेख करणारे असे हे 2,700 जण दावीदाने नेमले.
27
राजाच्या सैन्यात नोकरीला असलेल्या इस्राएल लोकांची गणना अशी: त्यांचा प्रत्येक गट दर वर्षी एक महिना कामावर असे. राजाकडे चाकरीला असलेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या घराण्यांचे प्रमुख, सरदार, अधिकारी, सुरक्षा-अधिपती असे सर्वजण होते. प्रत्येक सैन्यगटात 24,000 माणसे होती.
पहिल्या महिन्याच्या पहिल्या गटाचा प्रमुख याशबाम हा होता. याशबाम जब्दीएलचा मुलगा. याशबामच्या गटात 24,000 जण होते.
तो पेरेसच्या वंशातला होता. पहिल्या महिन्याच्या सर्व सेनाधिकाऱ्याचा याशबाम प्रमुख होता.
अहोह इथला दोदय दुसऱ्या महिन्याच्या सैन्याचा मुख्य असून त्याच्या गटात 24,000 माणसे होती.
तिसऱ्या महिन्याचा तिसरा सेेनापती बनाया. हा यहोयादाया मुलगा. यहोयादा हा मुख्य याजक होता. बनायाच्या अधिपत्याखाली 24,000 माणसे होती.
तीस प्रसिध्द शूरांमधला पराक्रमी सैनिक तो हाच. त्यांचा नायकही हाच होता. त्याचा पुत्र अम्मीजाबाद बनायाच्याच गटात प्रमुख होता.
चौथ्या महिन्याचा चौथा सेनापती असाएल. हा यवाबचा भाऊ. असाएलचा मुलगा जबद्या हा पुढे आपल्या वडिलानंतर सेनापती झाला. असाएलचा तुकडीत 24,000 जण होते.
शम्हूथ हा पाचवा सेनापती. पाचव्या महिन्याचा हा सेनापती इज्राही होता. त्याच्या तुकडीत 24,000 जण होते.
इरा हा सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती. हाइक्के शचा मुलगा असून तको नगरातला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलेस पलोनी हा होता. हा एफ्राइमच्या वंशातला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बखय हुशाथी हा होता. त्याच्या तुकडीत 24,000 जण होते.
नवव्या महिन्याचा नववा सरदार बन्यामिनी वंशातला अबियेजेर अनाथोथी हा होता. त्याच्या गटात 24,000 सैनिक होते.
दहाव्या महिन्याचा दहावा सेनापती महरय. हा जेरह कुळातला असून नटोफा इथला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
अकराव्या महिन्याचा अकरावा सेनापती बनाया. हा पिराथोनचा असून एफ्राइमच्या वंशातला होता. त्याच्या गटात 24,000 लोक होते.
बाराव्या महिन्याचा बारावा प्रमुख हेल्दय. या अथनिएल कुळातला आणि नटोफा इथला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
इस्राएलाच्या घराण्यांचे प्रमुख असे: रऊबेन: जिख्रिचा मुलगा अलीयेजर. शिमोन: माकाचा मुलगा शफट्या.
लेवी: कमुवेलचा मुलगा हशब्या. अहरोन: सादोक.
यहूदा: अलीहू. (हा दावीदाचा एक भाऊ), इस्साखार: मीखाएलचा मुलगा अम्री.
जबुलून: ओबद्याचा मुलगा इश्माया. नफताली: अज्रिएलचा मुलगा यरीमोथ.
एफ्राईम: अजऱ्याचा मुलगा होशेथ. पश्र्चिम मनश्शे: पदायाचा मुलगा योएल.
पूर्व मनश्शे: जखऱ्याचा मुलगा हद्दो. बन्यामीन: अबनेरचा मुलगा यासिएल.
दान: यरोहामचा मुलगा अजरेल. हे झाले इस्राएलींच्या घराण्यांचे प्रमुख
दावीदाने इस्राएलमधील पुरुषांची मोजदाद करायचे ठरवले. इस्राएलच लोकसंख्या आकाशातील ताऱ्यांएवढी करीन असे देवाने आश्वासन दिलेले असल्यामुळे इस्राएलमध्ये लोकासंख्या वाढली होती. तेव्हा दावीदाने वीस वर्षे वयाचे आणि त्या पुढच्या वयाचे पुरुष गणतीसाठी विचारात घ्यायचे ठरवले.
सरुवेचा मुलगा यवाब याने मोजदाद करायला सुरुवात केली पण तो ते काम पूर्ण करु शकला नाही. देवाचा इस्राएलच्या लोकांवर कोप झाला. त्यामुळे ही गणती दावीद राजाच्या बखरीत नोंदलेली नाही.
राजाच्या मालमत्तेची जपणूक करणारे आधिकारी पुढीलप्रमाणे: अदीएलचा मुलगा अज्मावेथ हा राजाच्या भांडारांचा प्रमुख होता. शेतीवाडी, नगरे, गावे आणि किल्ले इथे असलेल्या भांडारांचा प्रमुख योनाथान हा होता. हा उज्जीयाचा मुलगा.
कलूबचा मुलगा एज्री हा शेतात राबणाऱ्यांवरचा प्रमुख होता.
रामा येथील शीमी हा द्राक्षमळ्यांवरचा अधिकारी होता. शिफम येथील जब्दी हा द्राक्षमळ्यातून निघणारा द्राक्षारस आणि त्याची साठवण यावरचा अधिकारी होता.
गेदेरचा बाल-हानान हा जैतूनची झाडे आणि पश्चिमे कडच्या डोंगराळ भागातली उंबराची झाडे याचा प्रमुख होता. योवाश जैतूनच्या तेलाच्या कोठाराचा प्रमुख होता.
शारोनचा शिमय हा शारोन भोवतालच्या गाईगुरांचा मुख्य होता. अदलयचा मुलगा शाफाट हा दऱ्याखोऱ्यातील गुरांवरचा मुख्य होता.
इश्माएली ओबील हा उंटांवरचा प्रमुख होता. येहद्या मेरोनोथी गाढवांचा मुख्य होता.
याजीज हाग्री मेंढरांचा मुख्या होता. राजा दावीदाच्या मालमत्तचे हे सर्व रक्षणकर्ते होते.
योनाथान हा सूज्ञ मंत्री आणि लेखनिक होता. हा दावीदाचा काका. हखमोनी याचा मुलगा यहोएल याच्यावर राजपुत्रांच्या लालनपालनाची जबाबदारी होती.
अहीथोफेल राजाचा मंत्री आणि हूशय राजाचा मित्र होता. हा अकर लोकांपैकी होता.
अहीथोफेलची जागा पुढे यहोयादा आणि अब्याथार यांनी घेतली. यहोयादा हा बनायाचा मुलगा. यवाब हा राजाचा सेनापती होता.
28
राजाने इस्राएल लोकांमधील सर्व पुढाऱ्यांना एकत्र बोलावले. त्यांना त्याने यरुशलेमला येण्यास सांगितले. घराण्यांचे प्रमुख, राजाचे सेनापती, अधिकारी, अंमलदार, कोठारांची गुरांची, राजपुत्रांची जबाबदारी उचलणारे राजाचे सर्व महत्वाचे अधिकारी, शूर वीर आणि लढवय्ये या सर्वांना त्याने बोलावले.
राजा दावीद त्यांच्यापुढे उभा राहून म्हणाला, “माझ्या बांधवांनो आणि लोकांनो, माझे ऐका परमेश्वराचा करारकोश ठेवण्यासाठी एक विश्रामधाम बांधावे असा माझा मानस होता. देवाच्या पादासनासाठी एक मंदिर बांधायचा माझा विचार होता. त्या मंदिराच्या इमारतीचा आराखडाही मी तयार केला.
पण देव मला म्हणाला, ‘नाही दावीदा, तू माझ्यासाठी मंदिर उभारु नयेस. तू एक लढवय्या असूत तू अनेकांना ठार मारले आहेस.’
“इस्राएलचा परमेश्वर देव याने इस्राएलच्या बारा घराण्यांची धुरा सांभाळण्यासाठी यहूदा घराण्याची निवड केली. आणि मग त्यातून परमेश्वराने माझ्या वडीलांच्या घराण्याला अग्रणी केले. आता या कुटुंबातून देवाने माझी इस्राएलचा कायमचा राजा म्हणून निवड केली. मला इस्राएलचा राजा कराचे अशी परमेश्वराची इच्छा होती.
देवाने मला भरपूर पुत्रसंतती दिली आहे. या मुलांमधून परमेश्वराने शलमोनला माझा उत्तराधिकारी म्हणून निवडले आहे. पण खरे पाहता इस्राएल हे परमेश्वराचेच राज्य आहे.
परमेश्वर मला म्हणाला, ‘दावीदा, माझे मंदिर आणि त्या भोवतालचे आवार याची उभारणी तुझा पुत्र शलमोन याच्या हातून होईल. कारण पुढे राजासनावर तो बसणार आहे. त्यासाठी मी त्याची पुत्र म्हणून निवड केली आहे आणि मी त्याचा पिता आहे.
माझ्या आज्ञा आणि नियम यांचे पालन करायला शलमोनाने सुरवात केली आहे. त्याने कसोशीने हे आज्ञापालन असेच पुढे चालू ठेवले तर त्याच्या राज्याला मी सर्वकाळ स्थैर्य देईन.”
दावीद म्हणाला, “तर आता सर्व इस्राएल बांधवांनो, परमेश्वरासमोर आणि तुमच्यासमोर मी सांगतो की परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञा काटेकोरपणे पाळा. तरच या सुपीक भूमीवर तुम्ही नांदाल. तुमच्यानंतर तुमचे वंशजही इथेच निर्वेधपणे राहू शकतील.
“आणि शलमोना, माझ्या मुला, आपल्या वडीलांच्या देवाला जाणून घे. शुध्द मनाने देवाची सेवा कर. देवाच्या सेवेत मनोमन आनंद मान. कारण परमेश्वरच सर्वांच्या अंत:करणाचा ठाव घेतो. आपले सर्व विचार त्याला कळतात. आपण मदतीसाठी परमेश्वराकडे गेलो तर आपल्याला उत्तर मिळते. पण परमेश्वराकडे पाठ फिरवली तर मात्र तो आपल्याला कायमचा सोडून जातो.
शलमोन, परमेश्वराने त्याचे पवित्र स्थान म्हणजे मंदिर बांधून घेण्यासाठी तुझी निवड केली आहे हे चांगले लक्षात ठेव. हिंमत बाळग आणि हे कार्य पूर्णत्वाला ने.”
दावीदाने मग मंदिराचा आराखडा, आपला मुलगा शलमोन याच्या स्वधीन केला. मंदिराभोवतालचे आवार, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचाही त्या आराखड्यात समावेश होता.
मंदिराच्या सर्व भागांची योजना दावीदाने केली होती, ती त्याने शलमोनाला दिली. मंदिरा भोवतीचे अंगण आणि इतर बांधकामे यांच्या योजना दावीदाने त्याला दिल्या. मंदिराच्या कोठाराच्या खोल्या आणि मंदिराची पवित्र उपकरणे ठेवण्यासाठी असलेली भांडारगृहे यांचेही नकाशे त्यात होते.
याजक आणि लेवी यांच्या गटांची माहिती दावीदाने शलमोनाला दिली तसेच मंदिरातील सेवेच काम आणि त्यात वापरायची उपकरणे याबद्दलही त्याने शलमोनाला सांगितले.
मंदिरातील सर्व वस्तूंसाठी किती सोने-चांदी वापरायची हे सांगितले.
सोन्या चांदीचे दिवे आणि दिवठणी यांचे नमुने केलेले होते. त्यातील प्रत्येक दिवा आणि दिवठण यासाठी नेमके किती चांदीसोने वापरायचे याची दावीदाने शलमोनाला कल्पना दिली. वेगवेगळ्या ठिकाणी गरजेप्रमाणे या दीपमाळा वापरायच्या होत्या.
पवित्र भाकरी ठेवायच्या मेजासाठी किती सोने - चांदी लागेल त्याचे वजन शलमोनाला दावीदाने सांगितले.
काटे, कटोरे, सुरया यांना लागणारे निर्भेळ सोने, तबकांसाठी लागणारे सोने-चांदी यांचे वजन दिले.
धूप जाळण्यासाठी जी वेदी करायची तिला लागणारे सोने किती हे ही त्याने सांगितले. परमेश्वराच्या करारकोशावर जे करुब देवदूत आपले पंख पसरुन धरत होते त्यासह असलेले दयासन म्हणजेच देवाचा रथ याचा नमुनाही शलमोनाला त्याने दिला. हे करुब सोन्यात करायचे होते.
दावीद म्हणाला, “हे सर्व नमुने परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे लिहून ठेवलेले आहेत. त्या नमुन्यांतील सर्व गोष्टी परमेश्वराने मला समजावून सांगितलेल्या आहेत.”
दावीद शलमोनाला पुढे म्हणाला, “धीर धर आणि न भिता या कामाची सांगता कर. प्रत्यक्ष परमेश्वर, माझा देव तुझ्या सोबत आहे, तेव्हा घाबरु नको. सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला साथ देईल. ही साथ तो अर्धवट सोडणार नाही. मंदिराचे बांधकाम तू पूर्णत्वाला नेशील.
याजक आणि लेवी यांचे वर्ग नेमले आहेत. ते देवाच्या मंदिराच्या कामाला सज्ज आहेत. सर्वप्रकारच्या कामासाठी कुशाल कारागिर तुझ्याबरोबर आहेत. तुझी प्रत्येक आज्ञा अधिकारी आणि सर्व लोक मानतील.”
29
राजा दावीद सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “देवाने शलमोनाला निवडले आहे. शलमोन अजून कोवळा तरुण आहे. या कामासाठी काय करायला लागेल त्याची त्याला पूर्ण कल्पना नाही. पण हे काम फार महत्वाचे आहे. हे घर काही सामान्य माणसाचे नव्हे; ते परमेश्वराचे देवाचे निवासस्थान आहे.
माइया देवाच्या मंदिराची योजना करण्यात मी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. सर्व वस्तूंसाठी लागणारे सोने-चांदी, पितळ मी दिलेले आहे. एवढेच नव्हे तर लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड, लाकडी सामानासाठी लाकूड जडावाच्या कामासाठी गोमेद, पाषाण, विविधरंगी मौल्यवाने रत्ने आणि शुभ्र संगमरमर हे ही देऊ केले आहे. परमेश्वराच्या मंदिरासाठी अशा अनेकविध गोष्टी मी दिल्या.
हे देवाचे मंदिर बांधून व्हावे असे मला मनापासून वाटते म्हणून सोन्या चांदीची माझी ठेवही मी देत आहे. पवित्र मंदिरासाठी मी हे करत आहे.
110 टन ओफीरचे शुध्द सोने, 260 टन निर्भेळ चांदी मी दिली. मंदिराच्या भिंती या चांदीने मढवायच्या आहेत.
कुशल कारागिरांनी मंदिरातील तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू कराव्या म्हणून त्यासाठी लागणारे सोनेरुपे मी दिले. आता तुम्हा इस्राएलींपैकी किती जण आज परमेश्वरासाठी काही द्यायला तयार आहात?”
तेव्हा, वडीलधारी मंडळी, इस्राएल घराण्यांचे प्रमुख सरदार, अधिकारी, राजसेवेतील कारभारी यासर्वांनी आपापल्या बहुमोल वस्तू देणगीदाखल दिल्या.
देवाच्या निवासस्थानासाठी त्यांनी दिलेल्या वस्तू पुढीलप्रमाणे: 190 टन सोने, 375 टन चांदी, 675 टन पितळ, आणि 3,750 टन लोखंड.
ज्यांच्याकडे मौल्यवान रत्ने होती त्यांनी ती परमेश्वराच्या मंदिरासाठी दिली. गेर्षोन घराण्यातील यहीएल याच्याकडे त्यांनी ती सुपूर्द केली.
या सर्व प्रमुख मंडळींनी अगदी मनापासून आणि खुशीने, मुक्तहस्ताने दिले. त्यामुळे सर्व लोकांमध्ये आनंद पसरला. राजा दावीदालाही आनंद वाटला.
त्या समुदायापुढे दावीदाने परमेश्वराचे स्तुतिगीत म्हटले. ते असे: “हे परमेश्वर, इस्राएलच्या देवा, आमच्या पित्या, सदासर्वकाळ तू धन्य आहेस.
महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि सन्मान ही सर्व तुझीच आहेत कारण स्वर्ग - पृथ्वीवर जे जे काही आहे ते तुझेच आहे. परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे. या सागळ्यांचा शास्ता आणि मुकुटमणी तूच आहेस.
वैभव आणि सन्मान यांचा स्रोत तूच. सर्वांवर तुझा अधिकार आहे. सत्ता आणि सामर्थ्य तुझ्या हातांत एकवटले आहे. कोणालाही थोर आणि बलवान करणे तुझ्याच हातात आहे.
देवा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करतो.
या सगळ्या गोष्टी देणारा मी कोण? किंवा हे लोक तरी कोण? तुझ्यामुळेच त्या आमच्याकडे आल्या. तुझ्याकडून मिळालेलेच आम्ही तुला परत करत आहोत.
आमच्या पूर्वजांप्रमाणेच आम्ही सुध्दा या भूतलावरचे तात्पुरते प्रवासी आहोत. आमचे अस्तित्व ओझरत्या सावलीसारखे. ते थांबवणे आमच्या हाती नाही.
हे परमेश्वर देवा, तुझे मंदिर उभारायला या सगळ्या गोष्टी आम्ही जमा केल्या. तुझ्या सन्मानार्थ आम्ही हे मंदिर बांधत आहोत पण ही सामग्री तुझ्यामुळेच प्राप्त झालेली आहे. जे आहे ते सगळे तुझेच आहे.
हे देवा, लोकांची तू पारख करतोस आणि त्यांच्या भलेपणाने तुला आनंद होतो हे मी जाणतो. मी शुध्द आणि प्रामणिक मनाने हे सगळे तुला सानंद अर्पण करत आहे. हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत आणि या सर्व वस्तू ते खुशीने तुला देत आहेत; हे मी पाहतो आहे.
अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल या आमच्या पूर्वजांचा, हे परमेश्वरा, तूच देव आहेस. त्यांनी उचित तेच करावे म्हणून तू सर्वतोपरी सहाय्य कर. त्यांची मने तुझ्याठायी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहावीत याची तू काळजी घे.
शलमोन तुझ्याशी एकनिष्ठ राहावा म्हणून त्याचे मन तुझ्याठायी स्थिर कर. तुझ्या आज्ञा, नियम आणि विधी यांचे पालन त्याने करावे, या सर्व गोष्टी कराव्या आणि माझ्या नियोजित मंदिराची उभारणी त्याने करावी म्हणून त्याला सात्विक मन दे.”
तेथे जमलेल्या सर्व लोकांना उद्देशून दावीद पुढे म्हणाला, “आता आपल्या परमेश्वर देवाला धन्यवाद द्या.” तेव्हा आपल्या पूर्वजांनी ज्याची उपासना केली त्या परमेश्वराला लोकांनी धन्यावाद दिले. राजाच्या आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ ते नतमस्तक झाले.
दुसऱ्या दिवशी लोकांनी परमेश्वराला यज्ञ अर्पण केले. त्यांनी होमार्पणे वाहिली. 1,000 गोऱ्हे, 1000 एडके, 1,000 कोकरे आणि त्याबरोबर पेयार्पणे त्यांनी अर्पण केली. शिवाय सर्व इस्राएलींसाठी त्यांनी आणखीही पुष्कळ यज्ञ केले.
मग परमेश्वासमोर सर्व लोकांनी खाद्यपेयांचा मनमुराद आस्वाद लुटला. दावीदाचा मुलगा शलमोन याला त्यांनी दुसऱ्यांदा राज्याभिषेक केला. राजपदासाठी शलमोनाला आणि याजक म्हणून सादोकला अभिषेक केला गेला. हे सर्व परमेश्वरासमोर झाले.
त्यानंतर परमेश्वराच्या राजासनावर शलमोन स्थानापन्न झाला. शलमोनाने आपल्या वडीलांची जागा घेतली. राजा म्हणून तो यशस्वी ठरला. इस्राएलचे सर्व लोक शलमोनाचे आज्ञापालन करत.
एकूणएक सरदार, सैनिक आणि राजा दावीदाची मुले यांना तो राजा म्हणून मान्य होता आणि ते सगळे त्याच्या आज्ञेत होते.
परमेश्वराने शलमोनाची भरभराट केली. परमेश्वराच्या कृपेने तो मोठा होत आहे हे इस्राएलींना ठाऊक होते. राजाला शोभेल असा दरारा परमेश्वराने त्याला प्राप्त करुन दिला. इस्राएलाच्या या आधीच्या कोणाही राजाच्या वाट्याला असे भाग्य आले नव्हते.
पुढे वृध्द झाल्यावर दावीदाला मृत्यू आला. त्याला सफल आणि दीर्घ आयुष्य लाभले. वैभव आणि सन्मान यांची त्याला कमतरता नव्हती. त्याच्यानंतर त्याच्या मुलगा शलमोन राजा झाला.
राजा दावीदाचे साद्यंत वृत्त संदेष्टा शमुवेल याच्या ग्रंथात, संदेष्टा नाथानच्या ग्रंथात तसेच गाद या संदेष्ट्याचा ग्रंथात नमूद केलेले आहे.
इस्राएलचा राजा म्हणून त्याने जे जे केले ते सर्व या लेखनात आलेले आहे. त्याचे पराक्रम आणि त्याची कारकीर्द, इस्राएल आणि अवतीभवतीचे सर्व देश यांच्यावर या काळात गुदरलेले प्रसंग याची हकीकत या ग्रंथांमध्ये आहे.
- Holder of rights
- Multilingual Bible Corpus
- Citation Suggestion for this Object
- TextGrid Repository (2025). Marathi Collection. 1 Chronicles (Marathi). 1 Chronicles (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. Multilingual Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A803-7