2 John (Marathi)

2 John (Marathi)

1

1:1b.2JO.001.001 वडिलाकडून, देवाने निवडलेल्या बाईना व तिच्या मुलांना, सत्यात सहभागी असलेल्या लोकांप्रमाणे ज्यांच्यावर मी प्रीति करतो, आणि तुमच्यावर प्रीति करणारा मी एकटाच नाही, तर ज्यांची सत्याशी ओळख झाली आहे असे सर्वजणसुद्धा प्रीति करतात.

1:2b.2JO.001.002 या सत्यामुळे जे आमच्यामध्ये असते, ते आमच्यामध्ये अनंतकाळपर्यंत राहील.

1:3b.2JO.001.003 देवपित्यापासून आणि पित्याचा पुत्र प्रभु येशू ख्रिस्त याजपासून कृपा, दया व शांति ही सत्यात व प्रीतित आपणबरोबर राहोत.

1:4b.2JO.001.004 पित्याने आपल्याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे तुमची काही मुले सत्यात चालतात असे मला दिसून आले म्हणून मला फार आनंद झाला.

1:5b.2JO.001.005 आणि आता, बाई, कुरिया, मी तुला नम्रपणे विनंति करतो की, आपण एकमेकांवर प्रीति करावी. मी ही तुला नवी आज्ञा करतो असे नाही, तर जी प्रारंभापासून तुला देण्यात आलेली होती,

1:6b.2JO.001.006 आणि त्याच्या आज्ञेत राहणे म्हणजेच प्रीति करणे होय. हीच आज्ञा आहे जी तुम्ही सुरुवातीपासून ऐकली आहे: की तुम्ही प्रीतीचे जीवन जगावे.

1:7b.2JO.001.007 येशू मानवी देह धारण करुन या जगात आला या गोष्टीवर विश्वास न ठेवणारे अनेक फसवे भोंदू लोक जगात निघाले आहेत. असा फसविणारा भोंदू मनुष्य हाच ख्रिस्तविरोधी होय.

1:8b.2JO.001.008 सावध असा! यासाठी की ज्यासाठी आम्ही काम केले ते तुम्ही हातचे जाऊ देऊ नये तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हांला मिळावे.

1:10b.2JO.001.010 जर एखादा मनुष्य तुमच्या घरी आला आणि ख्रिस्ताची शिकवण आचरणात आणीत नसला तर त्याला आपल्या घरात घेऊ नका. किंवा त्याला सलामही करु नका.

1:11b.2JO.001.011 कारण अशा मनुष्याला जो कोणी सलाम करतो तो त्याच्या वाईट कामांमध्ये सहभागी होतो.

1:12b.2JO.001.012 मला जरी अनेक गोष्टी तुम्हांला लिहायच्या आहेत तरी त्या तुम्हांला मी शाई व लेखणीने लिहू इच्छित नाही. तर त्याऐवजी तुम्हांला भेटावे व प्रत्यक्ष सर्व काही बोलावे अशी आशा मनात बाळगून आहे. म्हणजे आपला आनंद त्यामुळे परिपूर्ण होईल.

1:13b.2JO.001.013 देवाने निवडून घेतलेल्या तुमच्या बहिणीची मुले तुम्हांला सलाम सांगतात.


Holder of rights
Multilingual Bible Corpus

Citation Suggestion for this Object
TextGrid Repository (2025). Marathi Collection. 2 John (Marathi). 2 John (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. Multilingual Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A906-3