1
वडिलाकडून, माझ्या प्रिय मित्र गायस ज्याच्यावर मी सत्यामध्ये प्रीति करतो त्यास,
माझ्या प्रिय मित्रा, जसे आध्यात्मिक जीवनात तुझे चांगले चालले आहे हे मला माहीत आहे तसेच इतर बाबतीतही तुझे चांगले चालावे आणि तुझे आरोग्य चांगले असावे अशी मी प्रार्थना करतो.
जेव्हा काही बंधु आले आणि सत्यात तू सातत्याने कसे चालतोस याविषयी त्यांनी साक्ष दिली आणि तू सत्याविषयीच्या विश्वासूपणाबद्दल मला सांगितले तेव्हा मला फार आनंद झाला.
माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून जितका आनंद मला होतो तितका कशानेही होत नाही.
माझ्या प्रिय मित्रा, आपल्या बंधूंच्या परक्यांच्या कल्याणासाठी जे काही करणे तुला शक्य आहे ते तू विश्वासूपणे करीत आहेस.
जे बंधु आले व ज्यांनी तू दाखविलेल्या प्रीतिविषयी मंडळीसमोर साक्ष दिली, त्यांच्या पुढील वाटचालीकारिता देवाला आवडेल अशा प्रकारे
शक्य ते सर्व कर, कारण ते ख्रिस्ताच्या सेवेसाठी दौऱ्यावर निघाले आहेत व अविश्वासणाऱ्यांकडून त्यांनी काहीही स्वीकारले नाही.
म्हणून आम्ही विश्वासणाऱ्यांनी त्यांना मदत केलीच पाहिजे. यासाठी की आम्ही सत्यासाठी एकमेकांचे भागीदार होऊ.
या कारणामुळे जेव्हा मी येतो तेव्हा तो जो करीत आहे ते दाखवून देईन. तो वाईट शब्दांनी खोटेपणाने माझ्याविरुद्ध बोलत आहे व एवढ्यावरच तो समाधान मानीत नाही, तर त्यात भर म्हणून बंधूंचा तो स्वीकार करीत नाहीच उलट मंडळीतील जे लोक त्यांचा स्वीकार करु इच्छितात त्यांना अडथळा करतो, आणि त्यांना मंडळीबाहेर घालवितो!
माझ्या प्रिय मित्रा, जे चांगले आहे त्याचे अनुकरण कर. वाइटाचे अनुकरण करु नको. जे चांगले आहे ते जो करतो, तो देवाचा आहे. जो वाईट करतो त्याने देवाला पाहिले नाही.
प्रत्येक जण देमेत्रियाविषयी चांगली साक्ष देतात व सत्यदेखील तसेच सांगते. आणि आम्ही देखील त्याच्याविषयी तसेच म्हणतो, आणि तुम्हांला माहीत आहे की, आमची साक्ष खरी आहे.
मला तुला पुष्कळ गोष्टी लिहावयाच्या आहेत पण मला शाई व लेखणीने तुला लिहावे असे वाटत नाही.
त्याऐवजी, तुला लवकर भेटण्याची मला आशा आहे. मग आपल्याला समोरासमोर बोलता येईल.
- Lizenz
-
CC-0
Link zur Lizenz
- Zitationsvorschlag für diese Edition
- TextGrid Repository (2025). John the Evangelist. 3 John (Marathi). Multilingual Parallel Bible Corpus. https://hdl.handle.net/21.11113/0000-0016-A909-0